31st special
👇 हे "विषारी पांडे"नं वाचलं नाही तरी चळवळीशी आत्मीयता असणाऱ्यांनी जरूर वाचावे !
हे आहेत "रज्जाक बादशाह मुल्ला", वय वर्षे ५२, रा कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
३६ वर्षांपूर्वी (१९८४ साली) कर्मसंयोगानं त्यांनी व्यवसाय निवडला फोटो फ्रेम बनवायचा, 1/n
थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत भक्तिभावाने अनेक हिंदू बांधव त्यांच्याकडून देव-देवतांच्या फोटो फ्रेम बनवून घेऊ लागलेत
रज्जाक यांनी त्याक्षणी तीथूनपुढे आयुष्यभर शाकाहारी राहण्याचा निर्णय घेतला, 2/n
तेंव्हापासून तब्बल ३६ वर्षे कसल्याही मांसाहारी पदार्थाला त्यांनी चक्क साधा स्पर्शही केलेला नाही !
"माझ्या ग्राहकाच्या निगडित भावनांचा आदर एक व्यावसायिक म्हणून मी करायलाच हवा".. केवढा मोठा विचार ! केवढा मोठा त्याग !
3/n
"तारा फोटो अँड फ्रेम्स" चे मालक असणारे, अत्यंत साधेपणाने राहणारे "रज्जाक मुल्ला" म्हणजे भारतीय संस्कृतितल्या हिंदू-मुस्लिम एकतेच्या महान परंपरेचे सर्वोत्तम प्रतीकच !
शेतकरी आंदोलन हाताबाहेर जातंय म्हटल्यावर
4/n
आता कालपासून "नरभक्षी" शासकांनी आपले आवडते हिंदू-मुस्लिम हत्यार बाहेर काढल्यानंतर (कालची मशिदीवर हल्ला झालेली मध्यप्रदेशमधील घटना) देशाला पदोपदी या आगीपासून सावध राहण्याची जितकी गरज आहे तितकीच "रज्जाक मुल्ला" यांच्यासारख्या उदात्त उदाहरणांना सतत आठवत राहणे याचीही !
5/n
असो, "रज्जाक मुल्ला" यांच्यासारख्या अनेक महान कहाण्या मी आपल्याकडे घेऊन येतच राहीन.
द्वेषाच्या वावटळीतही माणुसकीचा दिवा आपल्या त्यागाने प्रज्वलित ठेवणाऱ्या, भारताच्या एकसंधतेचं "प्रमाण" आणि "कारण" असणाऱ्या या मातीतल्या अशा असंख्य "रज्जाक" ना कडक सॅल्यूट !
6/n
तळटीप : वर उल्लेख केलेला "विषारी पांडे" म्हणजे मागच्यावेळी आपण सर्वांनी राऊंडात घेतलेला "पांडे" नसून या देशातला तो प्रत्येक तरुण/तरुणी आहे ज्याचा/जिचा मेंदू द्वेषाच्या लागणीने सडलेला आहे !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh