मराठी 'विशुद्ध मनुस्मृती 'प्रकाशनाच्या मार्गावर
गेल्या कांही वर्षांपासून चिरप्रतिक्षेत असलेला 'विशुद्ध मनुस्मृती' हा मराठी ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. विद्वान डॉ.सुरेंद्रुमारजी यांनी संशोधित व परिष्कृत केलेल्या या विशुद्ध मनुस्मृती ग्रंथाचा सुंदर. मराठी अनुवाद
उस्मानाबादचे आर्यलेखक व अनुवादक प्राचार्य श्री गोविंद घनश्याम मैंदरकर यांनी केला असून त्याचे प्रकाशनकार्य लातूर येथील एका प्रसिद्ध मुद्रणालयात होत आहे.आजपर्यंत विशुद्ध मनृस्मृतीचे जवळपास आठ ते नऊ भाग हिंदीतून प्रसिद्ध झाले आहेत,पण मराठीत हा ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्रातील
मोठा वाचक वर्ग यापासून वंचित होता. म्हणूनच ही गरज ओळखून महाराष्ट्र सभा सर्व वाचकांची इच्छापूर्ती लवकरच करीत आहे. #मनुस्मृती ग्रंथाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरले असून महर्षी मनू हे दलित व स्त्रियांविरेधी आहेत. असा भ्रम मागील कांही वर्षांपासून देशात सर्वत्र पसरला आहे.
विशेष करून पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अनेक बहुजन संघटना व त्यांचे नेते मनुस्मृतीला दोषी ठरवतात. अशा काळात मनुस्मृतीच्या यथार्थ स्वरूपाचे दर्शन घडविणारा 'विशुद्ध मनुस्मृती' हा प्रकाशित होणे आवश्यक होते. प्रांतीय सभेने हे प्रकाशनाचे पवित्र कार्य हाती घेऊन
एका दृष्टीने क्रांतकारी पाऊल उचलले आहे. यानिमित्त अनेक दलित संघटना व पुरोगामी विचारवंत यांच्या मनात मनुस्मृतीविषयीचा निर्माण झालेला भ्रम दूर होण्यास मदत मिळेल. या विशाल ग्रंथाची मुळ किंमत रू.४५०/ - असेल. प्रकाशनपूर्व किंमत रू.३५०/ - ठेवण्यात आली आहे.
तरी इच्छुकांनी सभेच्या खात्यावर वरील रक्कम जमा करावी.
Bank account details:
Bank: state bank of India, Parali Vaijanath , District: Beed
Account name: Maharashtra Arya Pratinidhi Sabha
Account number: 11154152843
IFSC: SBIN0003406
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh