#गांधी_हत्येची_कारणे
न्यायालयात #नथुराम_गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली फक्त थोडी - थोडकी कारणेच भारत सरकारने लोकांसमोर आणली त्यातील काही प्रमुख अशी --
१) अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
२) भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशीमुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
३) ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
४) महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा
याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.

५) सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ म्हटले,
त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.

६) गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
७) गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल असूनही समर्थन दिले होते.

८) जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
९) कॉंग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला.
१०) कॉंग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
११) लाहोर कॉंग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
१२) १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
१३) जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी
यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.

१४) पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
१५) ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध करत गांधी यांनी उपोषण करून ५५ कोटी रुपये पाकिस्तानला मिळवून दिले
@bhaavipm @devharshada @Abhi_hinduwagh @GirishDoad @Mumbai_79
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यांचे अंतिम शब्द असे होते, "जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with चिंतामणी

चिंतामणी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @tolchintamani01

23 Jan
*प्रशांत दामले यांची प्रत्येक स्त्रीने ऐकावी अशी धमाल विनोदी कविता.*

पूर्वीचे ते पाहात फोटो
पुन्हा पुन्हा ती हळहळली
तारुण्याची पुन्हा पालवी
मनी एकदा सळसळली

शेंगच होते चवळीची मी
मजवर होते फिदा किती
काय वर्णू मी एकेकाच्या
प्रेमाच्या त्या अजब रिती

थांबत नाही काळ कधी पण
हा तर तारुण्याला शाप
आठवले ते जुने दिवस अन्
बसले घेऊन फोटो व्याप

चिरतरुण का कोणी झाले
कहाणीत ते फक्त असे
क्षणागणिक ते ओसरताना
फक्त मला आरशात दिसे
आरसा हा तर खरे बोलतो
कशास त्याला टाळायाचे ?
आला क्षण तो गोड समजुनी
जीवन पुस्तक चाळायाचे

आज कुणी मज म्हणता काकू
मीच मनाशी हसते रे
किती थापले लेप मुखावर
जग काही का फसते रे ?
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!