रायगडावरील मस्जिद ?
रायगडावरील मशिद मोर्चा की महादेवाचा माळ ?????
काही जण बोंब मारत सुटलेत की गडावर शिवरायांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती . पण याला कोणताच पुरावा नाही की ती मशीद शिवछत्रपतिंनी बांधली.
आता आपण पाहू मशीद खरच होती की आणखी काही …
आज रायगडावर नाणे दरवाजाच्या वरच्या बाजुस मशीद मोर्चा म्हणून एक टप्पा लागतो यालाच #मदार मोर्चा असेही म्हणतात. या सपाटीवर पूर्वी नागिण, भवानी , धाकटी व लांडा कसाब नावाच्या तोफा होत्या.
रायगडावर नाणे दरवाजा मार्गे जाताना अगदी नाणे दरवाजा,
अंधारी या ठिकाणी आजही श्री मारुतीच्या मूर्त्या दिसतात . मग मशीद मोर्चा या टप्प्यावर एखादं #शिवमंदिर अथवा #मारूतीचे मंदिर असायला हवं .
या जागेवर मध्येच #माशिद कशी असू शकेल ? #शिवकालात इथं एखादं मंदिर इथे असावं.
१६८९ च्या नोव्हेंबर मध्ये छत्रपति संभाजी महाराजांच्या बलिदाना नंतर रायगड मोगलांकड़े आणि नंतर पुढे औरंग्या मेल्यावर १७०७ ला गड #शिद्दीच्या ताब्यात देऊन मोगल परतले.
याच कालात रायगडाचा ‘किल्ले #इस्लामगड’ झाला.
आता एक प्रश्न असा पडतो की मोगलांनी आणि शिद्दीने किल्ले रायगडाचे नाव फक्त इस्लामगड केले की त्यावरील बांधकामालाही इस्लामी पद्धतीत बदलण्याचा प्रयत्न केला ?
मोगल आणि शिद्दी इतके कोमलहृदयी होते काय ?
आजही आपण जेव्हा श्री #जगदीश्वराच्या दर्शनाला जातो तेव्हा त्या मंदिराची आणि नंदीची तोड़फोड़ आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकते.
इ.स. १७३३ ला रायगड पुन्हा हिंदवी स्वराज्यात संभाजी महाराजांचे पुत्र शाहूंकड़े आला .
१७३४ ला शिद्धी ने पुन्हा रायगड घेण्याचा प्रयत्न केला . तेव्हा मराठ्यांनी शिद्धी ने वसवलेली #मदार चौकी पुन्हा उधळून लावली. आणि शिद्धी चे शीर कापले. त्यानंतर #पेशवे उत्तर कालात १७८६ ला मदार कोठी म्हणून या जागेचा उल्लेख सापडतो .
काही असेलच तर शिद्धी च्या काळात इथे त्यांनी उभारलेली कबर असेल.
कारण शिवकालात असा एकाही पुरावा सापडत नाही.
जे पुरावे आहेत ते पेशवे कालीन आणि १८१८ नंतरचे.
आपण काही काळ खोटे का असेना अस मानलं की शिद्धी ने बांधलेली कबर पेशव्यांनी तोडली फोडली नसेल (खरे नाही मी फक्त समजा असे म्हणतोय ) मग त्या श्रीमान योगी च्या सरदारांनी मनाचा इतका मोठेपणा दाखवला होता
मग त्या शिद्धी आणि मोघल च्या वंशजांनी 'जगदीश्वरची आणि त्यासमोरील नंदीची तोडफोड का केली ??
उगाच #पुरावे नसताना शिवरायांनी मशीद बांधली मशीद बांधली. यावर काहीच बोलत नाहीत. ते बागडे #हिंदु धर्माचे विरोधक यावर गप्प का बसतात ??
छायाचित्रे
क्र. १ जगदीश्वर मंदिर
क्र. २ भग्नावस्तेतील नंदीची मूर्ती
क्र. ३ शिरकाई देवी मंदिर
क्र. ४ हनुमान टाकी, हत्ती तलावाजवळ
क्र. ५ जगदीश्वर महादेव पिंड महाराज या पिंडीवर स्वतः अभिषेक करत असत
क्र. ६ गणपती शिलालेख
ही सर्व हिंदूंची प्रार्थना स्थळे / प्रतीके राजेंच्या हयातीत बांधली गेलेली आहेत.
फितुरीने १६८९ मध्ये शंभूराजे पकडल्या गेल्या नंतर झूल्फीकारखानने रायगड काबीज केला आणि मग ३२ मन सिंहासनाचे तुकडे केले, रायगड विद्रुप केला आणि त्याने रायगडावरील जमेल तेव्हढा हिंदू कालानुसार पुसण्याचा
प्रयत्न केला नंतर १७३३ मध्ये शाहू महाराजांनी रायगड स्वतंत्र केला !
रायगडावर ना कसली मशीद होती ना आहे ! खोट्या इतिहासाला बळी पडू नका ! रायगड स्वतः अभ्यास करा...!
जय भवानी
जय शिवराय
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh