*सुरेश भटांचे* शेर.
सगळी _'अ''__ पासून _'ज्ञ'_ पर्यंत अक्षरे आहेत.
(अ)
*अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा*
*गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?*
...सुरेश भट.
*
(आ)
*आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी*
*हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली*
...सुरेश भट.
*
(इ)
*इतकेच मला जातांना सरणावर कळले होते*
*मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते*
....सुरेश भट.
*
(ई)
*'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा*
*माणसांनी माणसांना मारले कोठे?*
...सुरेश भट
*
(उ)
*उरले उरात काही आवाज चांदण्याचे..*
*आकाश तारकांचे उचलून रात्र गेली*
सुरेश भट.
*
(ए)
*एक मी निःशब्द किंकाळीच होतो*
*ऐकण्यासाठी सुना बाजार होता*
सुरेश भट.
*
(ऐ)
*ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे*
*शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले*
सुरेश भट.
*
(ओ)
*ओळखीचा निघे रोज मारेकरी*
*ओळखीचाच धोका मला यार हो*
सुरेश भट.
*
(क)
*कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी*
*कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली*
सुरेश भट.
*
(ख)
*खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?*
*तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?*
सुरेश भट.
*
(ग)
*‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री*
*मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’*
सुरेश भट.
*
(घ)
*घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली*
*जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते*
सुरेश भट.
*
(च)
*चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?*
*जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!*
सुरेश भट.
*
(छ)
*छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?*
*शापितांनी काय छाकट्यांचे करावे?*
सुरेश भट.
(ज)
*जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा*
*विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही!*
सुरेश भट.
*
(झ)
*झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी*
*मातीत पावलांचे काही ठसेच होते!*
सुरेश भट.
*
(ट)
*टाकली हातातली मी सर्व पाने*
*कोण जाणे,हारलो की जिंकलो मी*
सुरेश भट.
(ठ)
*ठेवले मी तयार ओठांना*
*एकदा तू पुकार ओठांना*
सुरेश भट.
(त)
*तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू*
*घरात येतात वाटमारे अजून काही*
सुरेश भट.
*
(द)
*दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही*
*खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता*
सुरेश भट.
*
(थ)
*थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..*
*रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही....*
सुरेश भट.
*
(ध)
*धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,*
*संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?*
(प)
*पाठमोरा मी जरी झालो,तरीही*
*सूर्य येणारे मला कवळून गेले!*
*
(फ)
*फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते*
*वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते*
*
(ब)
*बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?*
*धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!*
*
(भ)
*भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले*
*एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले*
*
(म)
*मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!*
*कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !*
*
(य)
*याचेच रडू आले की जमले न मला रडणेही*
*मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते...*
*
(र)
*रडत राखायची लोचने कोरडी*
*सतत कोठेतरी भिजत धुमसायचे...*
*
(ल)
*लागले न झाडांना दोनचार शिंतोडे*
*नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा....*
*
(व)
*वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!*
*उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?...*
*
(श)
*शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या*
*हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही....*
*
(स)
*सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,*
*तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती....*