विज्ञानवादी संत तुकाराम....
संत तुकारामांनी आपल्या अभंगातून विज्ञाननिष्ठ विचारमंच समाजाची पेरणी केली आहे. आज विज्ञान युगात लोक अंगारा देवून, प्रसाद देवून आंबा देवून तुम्हाला मुलगा होईल अशा अंधश्रद्धा वाढीस लावणारा सल्ला, आशिर्वाद देतात.
त्या ढोंगी प्रवृत्तीवर संत तुकारामांनी नेहमीच हल्ला चढविला आहे. माणसाने श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा बाळगू नये. शिकलेली माणसं जेंव्हा अशा भोंदू वैद्य, बाबांच्या नादी लागतात. स्रिया आपली फसवणूक करून घेतात. त्याच विचाराला धक्का देवून महाराज म्हणतात.
‘नवसे पूत्र होती । तेणे का करणे लागे पती ।।
नवसाने जर मुलं झाली असती तर नवरे करण्याची गरजच काय? असा रोकडा सवाल ते करतात. भोळ्या भाळ्या बापड्यांना नागविणाऱ्या प्रवृतीवर महाराजांचा विज्ञान निष्ठ विचार त्यांच्या अभंगाचे वैज्ञानिक व सामाजिक उपयोजन निश्चित करतो.
#ढोंगीपणावर_हल्ला
संत तुकारामांनी समाजातील ढोंगीपणावर भोंदूगिरीवर नेहमीच हल्ला चढविल्याचे त्यांच्या अभंगावरून जाणवते. त्यांना अंधश्रद्धा व अज्ञान घालविण्यास आजही मदत होते.
‘अंगा लावुनिया राख ।
डोळे झाकुनिया करती पाप ।।
अंगाला राख लावून वैराग्य पत्करल्याने ढोंग करणारे पाखंडी लोक कसे पाप करतात याबाबत ते म्हणतात-
‘दावी अंगी नाना कळा ।
भोगी विषयाचा सोहळा’।।
आजही समाजामध्ये अनेक भोंदुगिरी करणारे बुवा कसे सामान्य भोळ्या-भावळ्या जनतेला फसवितात त्यावरच संत तुकारामांनी सावध होण्याचे सांगितले आहे.
४००-५०० वर्षांपूर्वीचे जगतगुरू तुकोबारायांचे समाज उदबोधनाचे हे क्रांतिकारी विचार आजही तंतोतंत लागू होतात.
असे विज्ञानवादी विचार मांडणाऱ्या तुकोबांना घ्यायला "देवाने विमान पाठविलं होत" असं ज्यांना ज्यांना खरंच वाटतं असेल त्यांना सुद्धा #तुकाराम_बीज च्या शुभेच्छा.
🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh