#मतभेदांमुळेनुकसान
ट्विट लिहिताना,ट्विटर अस्पष्ट पद्धतीने आपल्या मनाला विचारतो 'व्हॉट्स हॅपनिंग'.दिवसाच्या अनेक घडामोडी असतात आसपास ज्या घडतात.त्यातल्या किंवा त्यापैकी कश्यावर ट्विट करायचं ह्या विचारांनी थोडं मन गोंधळून जाते.एका बाजूला जुलुमशाही व हुकूमशाही स्वप्नांनी पिसाटलेला
एक व्यक्ती जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला संपवण्याच्या बेतात रोज ह्या ना त्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने सर्व सामान्य माणसाला पिडत आहे.
इथे सामाजिक माध्यम द्वारे तुम्हा आम्हा सारखे अनेक जण स्वतःची ‘मत’ मांडायला येतात.तुमच्या मतांना तोपर्यंत काही किंमत नसते जोपर्यंत तुम्हाला
खऱ्या आयुष्यात काही किंमत नसते.क्षणिक समाधानसाठी ट्रोलिंग नावाचा प्रकार ट्रेण्ड मध्ये जेव्हा पासून जन्माला आला त्यातून लोकंना काही वेळेसाठी आनंद मिळाला तर काही वेळेला टोकाचा वादविवाद झाला.
काही दिवसांपासून महाविकास आघाडी चे समर्थकांमध्ये काही कारणास्तव अंतर्गत असच भांडण चालू आहे
विकोपाला गेलेले ह्या भांडणात मोठा फॉलोवर असलेले हॅण्डल सामील आहेत.हे तेच मोठे हॅण्डल ज्यांना आम्ही एक आदर्श म्हणून त्यांच्या विचार त्यांच्या ट्विट मधून अनुसरत असतो.आज जेव्हा काही हॅण्डल मर्यादा सोडून एक मेकांना शिव्या देत किंवा कोण कोणापेक्षा किती वरचढ आहे हे सिद्ध करण्यासाठी
वातावरण तापवायला लागले,तेव्हा वाईट वाटलं.ज्या पक्षाची ताकद आयटी सेल आहे,त्यांच्यासाठी ही गोष्ट म्हणजे मुल जन्माला आल्यानंतर जो आनंद होतो तितकाच प्रचंड आनंद झाला असेल.माझं एक छोटस हॅण्डल आहे जेमतेम ३८० अनुसरक असलेले.हे सगळं बघून एक विनंती आहे,आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आणि लक्ष एकच
विरोधकांना मदत होईल असे कोणतेच मतभेद किंवा भांडण चालू ठेवणे हे सर्वांसाठी त्रासदायक आहे.तुम्ही सगळे सामाजिक माध्यम वर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि प्रचंड अनुसारक कमवून अस्तित्व पण तितकच निर्माण झाले आहे.जे काही झालं आहे,ज्या कोणामुळे सूरू झालं आहे,हे थांबायला हवे
एकत्र राहून आपल्या सरकारला मदत करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हेवेदावे विसरून एकत्र येऊन काम करायला हवे.आजचे वैरी उद्या मैत्री अशी राजकारण जुनी म्हण आहे.ह्यातून आयुष्यभरासाठी आपापसात कडवटपण नको यायला इतकच म्हणणं आहे माझं.पटलं तर नक्की सांगा,नाही पटलं तरीपण सांगा.
जय महाराष्ट्र!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ट्रोल्स असे पोसले जातात.
ट्रोल्सचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आणू इच्छितो मी. परंतु हे ट्रोल्स नेमके कसे पोसले जातात याबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीतीच नसते.मुळात हे पगारी ट्रोल व यांना मिळणारे मानधन आज निविदा चालू असल्यामुळे द्यायला लागतं.@Dev_Fadnavis ह्याच्या सरकारमध्ये ट्रॉलिंग
ह्या गोष्टीवर लोकंना ट्रोल्सच्या विषयानंतर "आघाडी बिघाडी" फेसबुक पेजवरून बराच हैदोस झाला होता.हे लोक अद्यापदेखील शासनाची बदनामीचे काम करत आहे.त्यांना मुसक्या घालण्यासाठी मी पुराव्यासह माहिती देत आहे,ट्रोल्स कसे पोसले जातात?हा आपला मुख्य विषय आहे.एकतर सरकारी कामांच्या किंमती
भरमसाठ असतात आणि बोटावर मोजता येईल इतक्याच काम करणार्या खासगी कंपन्या सरकारने पोसल्या आहेत.जुन्या सरकारमधे हेच लोक काम करत होते आणि आत्तादेखील याच कंपन्या काम करत आहेत.उदा.काही कामांचे शासकीय रेट बघुया.
Gif दोन तिन सेकंदाचा अॅनिमेटेड व्हिडीओ करीता सरकारी भाव प्रत्येकी ४००००/-
#पीएमकेअरफंडझोल#PMCareFundScam
सीएसआर नावाचा एक प्रकार असतो.कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करणाऱ्या अनेकांना याबाबत ठाऊक असेल.असतेच,कारण या फंडवर चालणारी एक समांतर अर्थव्यवस्था आहे.अशी अर्थव्यवस्था जीचे कायदेशीर पंजीकरण होऊन देखील ती बँकेच्या मोजणीत सापडत नाहीत.खुप मोठ्या पातळीवर
चालणारे हे व्यवहार आपल्या अनेकांच्या नजरेत नसतात.ते पडतही नाहीत.कारण सीएसआरच्या नावाखाली चालणारे चॅरिटी उद्योग त्या प्रकाराला झाकण्याचे काम करत असतात.चॅरीटी हा खुप मोठा क्राईम आहे.एखाद्या व्यक्तीची क्रयशक्ती संपवून त्यास अधोगतीला लावण्याचे मोठे काम चॅरीटी करत असते.
तर अशा या चॅरिटीच्या कामासाठी सरकारकडून या कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या निव्वळ नफ्यातील दोन टक्के रक्कम ही सीएसआर अंतर्गत येणाऱ्या कामांसाठी खर्च करायची असते.ही कामे शिक्षण, आरोग्य,पर्यावरण या क्षेत्रांत मूलभूत बदल घडवून आणणारी असावीत असा यामागचा मुख्य हेतू असतो.पण आपल्या