ताई चांगली शिकली उच्चशिक्षित झाली,
बालविवाह न करता वयाच्या पंचविशीत
२-४ पोरांना नापसंद करून ताई ने तिला आवडेल अश्या मुलाशी लग्न केलं,
एकपत्नीत्वाची तरतूद असल्याने ताईच्या जीवनाला स्थैर्य आहे,
घर सोडून सासरी आली पण आई वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क घ्यायला विसरली नाही,
उच्चशिक्षणाने ताई ला चांगली नौकरी आहे,
ताई पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून नौकरी करते व तितकंच वेतन घेते,
बोनस आणि PF मुळे ताई च बरं चाललंय,
ताई एक सुजाण कर्मचारी आहे ,
ताईला वुमन & चाईल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट फॉर वुमन लेबर्स आणि वुमन लेबर वेल्फेअर फंड
सारखे कायदे माहीत आहेत.
म्हणूनच तर ताई सध्या गर्भवती आहे आणि घरी बसून पगार घेऊन चांगल्या पद्धतीने तिची व होणाऱ्या बाळाची काळजी घेते.
ताईच्या काही मैत्रीणींनीच नवऱ्यासोबत जमत नाही तर ताई त्यांना घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाह वर चांगले सल्ले देते.
ताईला सामाजिक भान पण आहे म्हणून ताई मतदानाला पण जाते.
ताईसोबत कालच बोलणं झालं ताईने माझं स्टेटस बघितलं होत , ताई म्हणत होती " ते तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असत ना आता ? " 😑