" माझे सोन्यासारखे बाबा गेले रे..."
मित्राच्या तोंडून हे शब्द ऐकून आलेला राग कोणावर काढू? स्वतःला दोष देऊ की मी त्याची काहीच मदत करू शकलो नाही? का विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ज्यांच्यामुळे कोरोना पसरतो आहे? का आजवरच्या सर्व सत्ताधाऱ्यांना ज्यांनी पुरेशा वैद्यकीय सुविधा उभारल्या
नाहीत? का नागरिकांना ज्यांनी कधी दवाखाना, वैद्यकीय संशोधन केंद्रे ह्यासाठी कधी आंदोलने केलीच नाही? आपल्या जातीच्या महापुरुषांचा पुतळा उभारावा म्हणून प्रत्येक जातीने आंदोलने केली. पण एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे म्हणून कधी कोणी आंदोलन केले नाही. त्या फ्रान्स च्या
राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात आमच्याकडे आंदोलन झाले. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून. पाकिस्तानी हिंदूंना देशाचे नागरिकत्व द्यायचे का नाही ह्यावरून आपले लोक एकमेकांविरोधात उभे राहिले! पण मजाल कोणाची कोणी प्रत्येक जिल्हा- तालुक्यातील लोकांची सोय होईल असे इस्पितळ व्हावे म्हणून
आंदोलन करेल...
माय बाप हो,
तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहात, कोणत्या जातीचे,धर्माचे आहात ह्या कशाचाच उपयोग आजारपणात होणार नाही. ह्यांचा उपयोग फक्त राजकारण्यांना होतो, तुम्हाला भडकावून मते मिळवायला. तुमचा जीव वाचवू शकतात फक्त उत्तम भौतिक सुविधा. त्यासाठी झगडा! 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सारखेच कंटेंट असलेले एकच औषध वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. मग कंपनी बदलली की त्या औषधाची किंमत बदलते. काही कंपन्यांचे औषध 100रू ला असेल तर तेच औषध एखादी कंपनी 1000 रू ला विकते. मग डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषध प्रिस्क्रीप्शन वर लिहून द्यावे यासाठी ह्या कंपन्या डॉक्टरांना विविध
भेटवस्तू, फॉरेन ट्रीप, ई. प्रलोभने देत असतात. एवढेच काय मागे ह्या गिफ्टच्या बदल्यात शरीरसुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या एका डॉक्टरला बेड्या ठोकल्या पोलिसांनी! अशी एकदम व्यवस्थित सामन्यांची पिळवणूक सुरू असते.
काही देशांमध्ये डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन वर औषधाच्या कंपनीचे नाव
लिहायला मनाई आहे. डॉक्टरांनी फक्त औषधांचे कंटेंट लिहायचे. मग रुग्णाला ते कंटेंट असणारे औषध ज्या कंपनीचे परवडेल तो ते घेईल. डॉक्टर फार्मा कंपन्यांचे प्रतिनिधी नसतात की ते त्या विशिष्ठ कंपनीचा फायदा व्हावा म्हणून त्यांचीच औषधे लिहून देतील. हा विचार असावा बहुधा त्यामागे.