आज एका कामानिमित्त एका कोव्हिड इस्पितळात जाणं झालं, खरंतर मीडियाने सांगितलेल्या, दाखविलेल्या फुटेजनुसार आपल्याला प्रत्यक्षात असलेल्या परिस्थितीची कल्पना येतच नाही. त्या क्लिप्स पाहून आपलं मन निष्क्रिय होण्याच्या प्रक्रियेत असतं. पण प्रत्यक्षात परिस्थिती प्रचंड "भयावह" आहे.
डॉक्टर्स, नर्सेस व इतर सपोर्टिंग स्टाफ त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, कोरोना परिस्थितीचा त्यांच्यावर इतका ताण आहे की त्यांना कोणालाही सांगण्याची सोय नाही. त्यांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत.
समजा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झालात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तर..
आपलं समान पॅक करायचं, हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं, नातेवाईकांना भेटायची परवानगी नाही, मोबाईल (?) वापराची परवानगी नाहीच. दिवसभर ऑक्सिजन मास्क (लागलाच तर) तोंडावर लावलेला असेल. दिवसातून ठरलेल्या वेळेत डॉक्टर नर्सेस औषधोपचार करुन जाणार. जागेवरून हलायचं नाही. २४ तास मशिन्सचा आवाज.
डॉक्टर्ससाठी सगळे पेशंट सारखेच असल्याने, आपुलकीने विचारपूस होईल ही अपेक्षा दुर्मिळ सोबत आजूबाजूला परिस्थितीनुसार पेशंट, त्याचं दुखणं, रडणं बघत बसायचं आणि वर असलेला पंखा, धूळ, जळमटे असलेली सिलिंग पाहत रहायची. मधल्या काळात तब्येत सुधारत गेली तर लवकर सुटका होऊन घरी येण्याची शक्यता,
नाहीतर आयसीयू, व्हेंटिलेटर पर्याय आहेतच, त्यातूनही सुधारणा नाही झाली तर स्मशानात वेटिंग आहेच, शेवटचा प्रवास आणि शेवटचं जळणं देखील ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीतच, तेही तत्कालीन परिस्थितीनुसार. तुमचं समाजात नाव कितीही मोठं असलं तरी जळताना एखाद-दुसरा नातेवाईकच.
म्हणजे तुम्हाला कोरोना झाल्याचं समजलंच आणि तब्येत ढासळत गेलीच की परिस्थितीनुसार मित्रपरिवार नातेवाईक आयुष्य ऐशोआराम यांच्याशी झटक्यात संबंध तुटतो आणि तुम्ही हळू हळू या आजारात गिळंकृत होत जाता. इतकं सगळं टाळायचं असेल तर उपाय एकच #BreakTheChain आणि मास्क, सोशल डिस्टनसिंगचं पालन.
मी सहसा इतकं मोठं लिहीत बसत नाही, माझं लिखाणही तितकं चांगलं नाही, सदर थ्रेड लिहिण्याचा प्रयत्न यासाठीच की कोणाला घाबरविण्याचा उद्देश नाहीच, ते काम आपली मीडिया उत्तम प्रकारे करत आहे. माझा प्रयत्न हाच की बघा एका क्षणात कोरोना होत्याचं नव्हतं करत पूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतो
शिवाय प्रत्येक ठिकाणी अनुभव व परिस्थिती वेगळीही असू शकते. सदर परिस्थिती उदाहरणादाखल घ्या.
आणि हो, काळजी घ्या.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh