Milind Kotwal writes
—————
केंद्र सरकार ने राज्यांना ऑक्सिजन प्लँट लावण्यासाठी PM cares फंड मधून पैसे दिले अशा अर्थाच्या पोस्ट आणि मेसेजेस फिरायला लागले आहेत, त्या पाहिल्यावर त्याची शहानिशा करण्यासाठी थोडा रिसर्च केला.
वस्तुस्थिती अशी आहे:
पंतप्रधान कार्यालयाने ५ जाने. ला जाहीर केले की PMCares Fund मधून १६२ऑक्सिजनचे प्लँट निरनिराळ्या राज्यांच्या हॉस्पिटलमध्ये बसविण्यात येतील. हे प्लँट विकत घेऊन बसविण्याचे काम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील Central Medical Supply Stores तर्फे होते आहे
त्याचा राज्य सरकारशी फारसा संबंध नाही. आत्तापर्यंत १६२ पैकी फक्त ६०प्लँट कुठे बसवायचे हे नक्की झाले आहे इतर अजून ठरलेले नाही. या ६०पैकी फक्त ११चे काम पूर्ण केलेले आहे