सावता माळी हे एक मराठी संतकवी होते. अरण तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. सावता
महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी
ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. #महाराष्ट्रदिन @LetsReadIndia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh