इतिहास, परंपरा, निसर्ग, विज्ञान, औद्योगिक विकास, सहकार अशा विविध पैलूंचा वारसा लाभलेला महाराष्ट्र नेमका आहे तरी कसा? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण कधी थांबून याचा वेध घेतो का?
इतिहास, परंपरा, निसर्ग, विज्ञान, औद्योगिक विकास, सहकार अशा विविध पैलूंचा वारसा लाभलेला महाराष्ट्र नेमका आहे तरी कसा? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण कधी थांबून याचा वेध घेतो का? याच प्रश्नांचे उत्तर म्हणून येत्या 'महाराष्ट्र दिना'च्या निमित्ताने 'लेट्स रीड फाऊंडेशन'च्या
माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आपल्याच राज्याची विविधांगी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वाचकांनाच सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. आज, सोमवारपासून १ मेपर्यंत हा वाचन आणि चर्चासोहळा '@LetsReadIndia'या ट्विटर अकाउंटवर रंगणार आहे.
'अभिमान महाराष्ट्रा'चा या श्रृंखलेअंतर्गत रोज नव्या विषयाबाबत या व्यासपीठावर चर्चा होणार आहे. त्यातून करोनासारख्या चिंतेच्या काळात थोडा दिलासाही मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या वाचन आणि चर्चा सोहळ्यामध्ये २६ एप्रिलला 'इतिहास, संतपरंपरा, समाजसुधारक, आणि स्वातंत्र्यलढ्यातील
योगदान', २७ एप्रिलला 'शेती, सहकार, कामगार चळवळ, रोजगारातील तसेच शहरी आणि ग्रामीण स्थित्यंतरे', २८ एप्रिल 'विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य', २९ एप्रिल 'कला, साहित्य, क्रीडा, खाद्यसंस्कृती', ३० एप्रिल 'पर्यटन, पत्रकारिता, जगभरातील मराठी मानबिंदू' आणि १ मे, महाराष्ट्र दिनी '
औद्योगिक विकास आणि भविष्य' या विषयांवर भाष्य आणि चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र दिनाच्या चर्चेतून औद्योगिक विकास आणि भविष्यातील आपल्या महाराष्ट्राच्या वाटचालीवर, स्वप्नांवर मंथन होणार आहे.
दस्तावेजीकरण होणार -
महाराष्ट्राचा भूतकाळ, या मातीचा इतिहास, परंपरा, वर्तमानकाळ आणि
भविष्यकाळही कसा असेल, असा सर्वंकष आढावा या आठवड्यामध्ये घेण्यात येणार आहे. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी 'लेट्सरीडइंडिया'चे ट्विटर व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. यामध्ये वाचक पुस्तकांपासून स्वतःच्या लेखांपर्यंत सर्व प्रकारची माहिती देऊ शकतात. या माहितीच्या दस्तावेजीकरणाचेही काम
त्यातून होणार आहे. महाराष्ट्राशी संबंधित अनेक विषयांवरील पुस्तकांपासून या विषयांवरील विचार वाचकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास 'लेट्स रीड फाऊंडेशन'च्या टीमकडून व्यक्त करण्यात आला. या माहितीच्या आधारे नंतर एक बातमीपत्रही तयार केले जाणार असून ते एकत्रित स्वरूपात वाचकांपर्यंत
पोहोचवले जाईल. तसेच नंतर 'महाराष्ट्र दिना'च्या निमित्ताने चर्चेत आलेल्या या पुस्तकांचा समावेश 'लेट्स रीड फाऊंडेशन'च्या मोबाइल ग्रंथालयांमध्ये केला जाणार आहे. यामुळे ही पुस्तकेही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील.
#महाराष्ट्रदिन महाराष्ट्राचा इतिहास -
महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक,
इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
1.1. प्राचीनकाळ नावाचा उगम -
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर
@LetsReadIndia
महाराष्ट्राचा इतिहास - संतपरंपरा :-
महाराष्ट्राला संतपरंपरेचा अजरामर वारसा लाभला आहे. या संतांच्या नावांचा विचार केला तर मनुष्याच्या जगण्याला दिशा देण्यासाठीच संतांची नावं क्रमवारीत असावी, असं वाटतं. मनुष्यदेहाच्या जडणघडणीचा विचार करायला लावणारे संत महाराष्ट्रात
कसे घडले आणि त्यांची क्रमवारी तशीच का, याचा मागोवा घेणारा हा विशेष लेख. मनुष्यजन्म आणि संतपरंपरा यांचा संबंध
‘मनुष्यजन्म’ हा म्हणावा तितक्या सहजपणे होत नाही. परंतु मनुष्य जन्म मिळूनसुद्धा काहींना मनुष्य जन्माचं सार कळत नाही. त्यावेळी संतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्रात आजवर ५८ संत घडले असून त्यांनी समाजप्रबोधनाचं कार्य केलं आहे. विविध धर्मात अनेक संत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राला लाभलेल्या संताप्रमाणेच जगाला शिकवण्याचं, भलं-बुरं समजण्याइतपत प्रबोधन केले आहे. मनुष्य जन्माचा विचार केला तर मनुष्य जन्मात दोनच अवस्थेत सुख असते,