@LetsReadIndia
महाराष्ट्राचा इतिहास - संतपरंपरा :-
महाराष्ट्राला संतपरंपरेचा अजरामर वारसा लाभला आहे. या संतांच्या नावांचा विचार केला तर मनुष्याच्या जगण्याला दिशा देण्यासाठीच संतांची नावं क्रमवारीत असावी, असं वाटतं. मनुष्यदेहाच्या जडणघडणीचा विचार करायला लावणारे संत महाराष्ट्रात
कसे घडले आणि त्यांची क्रमवारी तशीच का, याचा मागोवा घेणारा हा विशेष लेख. मनुष्यजन्म आणि संतपरंपरा यांचा संबंध
‘मनुष्यजन्म’ हा म्हणावा तितक्या सहजपणे होत नाही. परंतु मनुष्य जन्म मिळूनसुद्धा काहींना मनुष्य जन्माचं सार कळत नाही. त्यावेळी संतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्रात आजवर ५८ संत घडले असून त्यांनी समाजप्रबोधनाचं कार्य केलं आहे. विविध धर्मात अनेक संत होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राला लाभलेल्या संताप्रमाणेच जगाला शिकवण्याचं, भलं-बुरं समजण्याइतपत प्रबोधन केले आहे. मनुष्य जन्माचा विचार केला तर मनुष्य जन्मात दोनच अवस्थेत सुख असते,
ते म्हणजे जन्म आणि मरण. इतर कालावधीत आपण जगत असतानादेखील आपल्याला म्हणावं तितकं सुख मिळत नाही. त्यामुळे संताच्या नावाचा आधार घेत त्यांनी कशी या सा-यातून आपल्या मनुष्य देहाची सार्थकता केली यांच्यावर आज आपण दृष्टिक्षेप टाकू या. संतपरंपरा आणि संतांच्या नावामागचं गूढ
महाराष्ट्राला
५८ संत लाभलेले असले तरी आपल्या वारकरी परंपरेत सातच संतांची नावं टाळघोषात घेतली जातात. त्या संतांची नावे पुढीलप्रमाणे – निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. या संतांनी महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका रोवली आणि ती जोपासलीदेखील. संतपरंपरेला निवृत्तीनाथांनी
सुरुवात केली असली तरी अभंगरूपात समाजाला ज्ञानामृत पाजण्याचं काम संत ज्ञानदेव यांनीच केलं. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरू असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात ‘म्हणे निवृत्तीदास’ अशा ओळी पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वरांनंतर सोपानकाकांनी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर
घेतली आणि समाजप्रबोधन केलं. या भागवत सांप्रदायाची पताका एका स्त्री संतानेदेखील उचलली आहे, त्या संत स्त्रीचं नाव मुक्ताबाई.
मुक्ताबाई म्हणजे ज्ञानेश्वरांची छोटी बहीण. मुक्ताबाईचं अभंगात आदिमाया, आदिशक्ती असं वर्णन पाहायला मिळतं. अशा या आदिशक्तीने आपल्या ज्ञानयोगावर ६५ वर्षीय
चांगदेवाला तिचं शिष्यत्व पत्कारण्यासाठी भाग पाडलं होतं, अशी ही मुक्ताबाई. मुक्ताबाईनंतर ही पताका एकनाथांकडे सोपवली गेली. संत एकनाथ हे जनार्दन स्वामींचे शिष्य होते. त्यामुळे त्यांच्या अभंगात ‘एका जनार्दनी’ असा उल्लेख पाहायला मिळतो. संत एकनाथांनी माऊलींचा सार समाजाला भारूडाच्या
माध्यमातून समजवला. माऊलींनी सोन्याच्या ताटात वाढलेल्या ज्ञानामृताला, संत एकनाथांनी पत्रावळीत वाढलं. पण आपल्या अज्ञानी समाजाने पत्रावळीत वाढलेलं अन्न न ग्रहण करता, जमिनीवर सांडून त्यातून बोध घेण्याचा प्रयत्नही केला नाही. भारूडाला आज काही ठिकाणी तमाशाचा रूप मानलं आहे.
परंतु एकनाथांनी भारूड का सुरू केलं होतं, या मागचं कारण आजही लोकांना समजलं नाही, याहून मोठा दुसरा शोक नाही.
एकनाथांनंतर वारकरी समाजाची पताका नामदेवांनी उचलली. नामदेवांना गुरू आधी देव भेटला होता. इतर संताच्या तुलनेत नामदेव यांना देव लवकर भेटला होता आणि देवाच्या उपदेशाप्रमाणे
नामदेवांना गुरू करावा लागणार होता. गुरूच्या शोधात पंजाबपर्यंत पोहोचणारे नामदेव हे एकमेव संत होते. गुरूचा शोध घेत असताना संत नामदेवांच्या काव्याला प्रभावित होऊन पंजाबमधील काही लोक त्यांचे अनुयायी बनले होते. पण नामदेव गुरुशिवाय अपूर्ण होते. त्यामुळे पंजाबमध्ये एका शिवमंदिरात
त्यांना ‘विसोबा खेचर’ हे गुरू मिळाले.
त्यामुळे नामदेवांनी महाराष्ट्राबरोबरच पंजाबमध्ये ही वारकरी पंथाची मुहूर्तमेढ रोवली. नामदेव निर्वाणानंतर केवळ चार कोटी अभंग करण्यासाठी नामदेवांचा तुकाराम नावाने जन्म झाला आणि नामदेवांचे कार्य पुढे तुकाराम महाराजांनी केलं, अशी ही महाराष्ट्रतली
आगळीवेगळी संताची परंपरा. या संतांच्या नावांचा बारीक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की, संतांची नावे ही मनुष्याला अभंगाप्रमाणेच दिशा देत आहेत, फक्त आपल्याकडे डोळस वृत्ती हवी.
संतांची नावे आणि मानवदिशा
संतपरंपरेतील निवृत्तीनाथ हे अग्रस्थानी मानले जातात. त्यामुळे या प्रत्येक
संतांची नावं व त्यांच्या नावांचा क्रम यामागे काय सार आहे, याचा हा आढावा.
निवृत्ती : निवृत्तीनाथाचं नावचं सांगत आहे की, काम, क्रोध, मद, मस्तर, दंभ, अहंकार या विषयापासून ‘निवृत्ती’ घ्या. ज्या गोष्टीचा भविष्यात लाभच होणार नाही अशा गोष्टीसाठी उगाचच अट्टाहास का करायचा. जन्म-मरणाच्या
फे-यातून निवृत्त व्हायचं असेल तर ज्ञान घ्या आणि ज्ञान द्या. कारण धनाचा ऱ्हास होता पण ज्ञानाचा ऱ्हास होत नाही. त्यामुळे निवृत्तीनाथांचे नावच सांगत आहे. बाबांनो, संसारातून निवृत्ती न घेता निवृत्त व्हा, म्हणजे संसार करत परमार्थ साधा, अशा अर्थाचा अभंग आपल्याला पाहायला मिळेल.
। प्रपंच करोनी परमार्थ साधावा।
। वाचे आळवावा पांडुरंग।
त्यामुळे निवृत्तीनाथांच्या नावाचं सार इतकंच आहे की, संसारातून विषयवासनेतून आणि मोह मायेपासून ‘निवृत्त’ व्हा.
ज्ञानदेव : संसार भवसागरातून निवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही ज्ञानाची उपासना करा, असा बोध करणारा ज्ञानदेव संतपरंपरेत
दुस-या स्थानावर आहेत. संसाराच्या निवृत्तीनंतर ‘ज्ञान’ घेतले पाहिजे, कारण ज्ञानदेवाच्या नावाप्रमाणे ‘ज्ञान हेच देव’ आहे. ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. कारण ज्ञानाशिवाय सोप्प काहीच नाही आणि ज्ञान हीच गोष्ट आहे, जी आपण चिरकाळापर्यंत टिकवू शकतो. त्यामुळे ज्ञान हाच देव आहे, असं सार
ज्ञानदेवाच्या नावात आपल्या संतानी करून दिला आहे. धन मिळवणं सोप आहे, पण ते टिकवणं फार कठीण त्याप्रमाणे ज्ञानाचा सोपा मार्ग संतपरंपरेत पुढील संतांच्या नावात दिला आहे.
सोपान : संतपरंपरेत सोपानकाकांचा तिसरा क्रमांक लागतो. जीवनात मनुष्याने ‘ज्ञान’ मिळवलं की, सगळाच मार्ग ‘सोपा’ होतो.
म्हणून प्रत्येक मनुष्याने ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञानामुळे जगण्याला दिशा तर मिळते त्याचबरोबर मुक्तीचा मार्गही सापडतो. ज्ञानामुळे आपलं हित काय आणि कशात आहे, हे आपल्याला कळतं. परिणामी सर्व पाश तोडून आपल्याला मुक्ती मिळते.
मुक्ताई : संतपरंपरेच्या जयघोषात आदिशक्ती मुक्ताईचा जयजयकार
केला जातो. मुक्ताई नावातून इतकंच सांगता येईल की, वरील तीन पाय-या तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडल्या की, ‘मुक्ती’ ही मिळणारच. मुक्ताई नावातून सुचित करते की, बाबांनो मुक्त व्हा.. देवभक्त व्हा..! कारण शेवटच्या घटका मोजताना संसारात काय केले, हे कामी येत नाही. तर कामी येते ते परमार्थात
काय केले. प्रपंच जनावरदेखील करतात, मग आपण जनावरांपेक्षा काय वेगळं करतो आहे, अशी मुक्ताईच्या नावाचा महिमा सांगणा-या अभंगात ओळ दिसते.
। पशु काय पाप पुण्य जाणती।
उत्तम भोग भोगिती मध्यस्थी।
पशुला पाप-पुण्याचं घेणं-देणं नसतं तरीही तो संसार करतो. पण आपण नरदेह मिळवूनही ज्याने आपल्याला
नरदेह दिला आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. याची कीव संतांना येते आणि संत म्हणतात की, जो मनुष्य देवाचं नाव घेत नाही, त्याचं तोंड हे सापाचं बिळच आहे. अशा माणसाला तिन्हीलोकात थारा मिळत नाही. संत एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात,
। नामाविण मुख। सर्पाचे ते बिळ।
त्यामुळे
ते आपल्याला सुचित करतात. उगाचच व्यर्थ बडबड करण्यापेक्षा ‘हरी’चे नाम घ्या, ज्यामुळे मुक्ती मिळेल.
। हरी बोला हरी बोला।
नाहीतर अबोला।
। व्यर्थ गलबला करू नका।
ज्या नामशक्तीमुळे आपल्याला मुक्ती मिळणार आहे, ते ज्ञान मिळवा आणि आशा, ममता, मोह, लालसा या तुटपुंज्या सुखातून मुक्त व्हा,
असं सांगणारी ही मुक्ताई.
एकनाथ : संसार सागरातून ‘निवृत्ती’ घेतली तर देवाचा शोध घेणा-याला ‘ज्ञान’ हाच देव आहे हे कळते. ज्ञानामुळे त्यांच्या मुक्तीचा मार्ग सोपा होता. त्यामुळे या चारही पाय-या जो तरून जातो, त्याला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण या जगात राम नाही, रहीम
नाही, अल्लाह नाही, मौला नाही, आहे तो फक्त एकच अनाथांचा नाथ. दिनाची माऊली, वारकऱ्यांची सावली तो म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाशिवाय भूतलावर देवच नाही. त्यामुळे त्याला अनाथाचा नाथ म्हटलं आहे. वारकरी परंपरा पाहिली तर लक्षात येईल की, स्वत: शंकर भगवानांनी वारकरी सांप्रदायाची मुहूर्तमेढ करून
दिली आहे.
। आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।
। मच्छिंद्राने बोध गोरक्षांसी केला।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती।
। गहिनीप्रसादे निवृत्ती दातार।
ज्ञानदेवा सार चोजविले।
त्यामुळे ज्याला या चारही पायऱ्यांतून चढून जाता येईल, त्याला परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय
राहणार नाही. या जगात फक्त ‘एकच नाथ’ आहे. असं सूचित करणारं संत एकनाथचं नाव वारकरी परंपरेत टाळघोषाच्या गजरात घेतलं जातं.
नामदेव : संतामध्ये गुरुशिवाय देव फक्त नामदेवांनाच भेटले होते. संत नामदेवांनी देवाच्या नावालाच देव मानलं होतं त्यामुळे संत नामदेवांना गुरुशिवाय देव भेटला होता.
संत नामदेवांच्या घरात एकूण १४ माणसं राहत होती आणि जनाबाईला या कुटुंबात गणले तर एकूण १५ जण संत नामदेवांबरोबर राहत होते. शरीरात हृदयाच्या बरगडय़ांची संख्या १४ आहे आणि त्यातील हृदय म्हणजे नामदेव.नामदेवाच्या नावातला बोध घ्यायचा म्हणाल तर नामदेवाचा हाच विश्वास होता की,‘नामातच देव’आहे.
त्यामुळे वरील पाच पाय-या संपल्यावर नामतच देव शोधावा लागतो. देवाला मंदिरात शोधण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांच्या पायापाशी नतमस्तक झालं पाहिजे. कारण त्याच्यामुळेच आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला आणि ‘देव’ ही संकल्पना मिळाली त्यामुळे आपण हेच लक्षात ठेवलं पाहिजे की, नामातच देव आहे.
‘देवाशिवाय नाम नाही’ आणि ‘नामाशिवाय देव नाही’. त्यामुळे नाम हाच देव हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तुकाराम : संत तुकारामांना वारकरी पंथाचा कळस मानला जातो. मग त्याच्या नावाचं सार काय आहे. हे आपल्या लक्षात आले असेल. वरील सर्व पाय-या आपण पार करण्यात यशस्वी झालो तर आपण देवालाही
प्रश्न विचारू शकतो की, ‘तू का राम?’ म्हणजे कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, ‘अहम् ब्रह्मांस्मी’ म्हणजे आपण ब्रह्म आहोत. पण तुम्हाला वाटेल कबीर महाराजांनी हे वाक्य चुकीचं लिहिलं आहे, असं वाटू शकेल.
पण या वाक्याचा आशय मात्र खरा आहे. कारण मनुष्यदेह मिळताना ब्रह्मस्वरूपच मिळाला होता.
फक्त त्या देहाला नामस्मरणापासून वंचित ठेवलं गेलं आणि मग ब्रह्माचा फक्त भ्रमच राहिला. कारण आपण घडताना चार अवस्थेत घडत असतो. या चारही अवस्थेत आपण आपल्यासाठी जगतच नाही. जन्म-मरणाच्या वेळेलाच आपण ब्रह्म आहोत, इतर वेळेला आपण लाचारी करत ब्रह्माचा भ्रम करत बसतो. त्यामुळे वरील सहा पाय-या
लक्षात घेऊन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वात आधी मोह, माया आदी षड्रिपु आणि विकृत मानसिकतेतून ‘निवृत्ती’ घेतली पाहिजे.
जे योग्य आहे त्यांचं ‘ज्ञान’ ग्रहण केलं पाहिजे. तीन ‘सोपा’ मार्ग आहे. फक्त नीट चालता आलं पाहिजे, म्हणजेच ज्ञानाचा अहम् भाव निर्माण न करता मुक्तीकडे वाटचाल
केली पाहिजे. चार म्हणजे ज्या ‘मुक्ती’साठी धडपडत आहोत त्या मुक्तीसाठी ‘एकाच नाथां’वर श्रद्धा ठेवली पाहिजे. पाच म्हणजे या जगाचा पालनहार एकच आहे, सोयीस्कर जगण्यासाठी माणसांनी जातधर्म निर्माण केली आहे. या जगात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत, कारण भगवंत कोणालाही जन्माला घालताना
जात ठरवून जन्माला घालत नाही.
त्यामुळे उगाचच रंगीबेरंगी चष्मे घालून ‘हा आमचा देव’, ‘ये हमारा अल्लाह’ असं म्हणण्यापेक्षा एकावर विश्वास ठेवला पाहिजे. सहा म्हणजे ‘नाम हाच देव’ आहे आणि ‘देव हेच नाम’ आहे. जर या सहाही क्रियांचा अवलंब आपण जीवनात केला तर आपण देवालाही खडसावून विचारू शकतो
की, या सहांचाही मी नाश केला आहे, मग ‘तू का राम?’ जो सहाचा अंत करतो, तो संत आणि सहा धुवून टाकतो, तो साधू. आपल्याला साधू-संत बनायचे नाही, फक्त मनुष्य जन्माचं सार्थक करायचं आहे, हे लक्षात ठेवून तसं जगलं पाहिजे. असा हा संताच्या नावातही अभंगासारखा बोध आहे. त्यामुळे संत बनता आलं नाही
तरी चालेल, पण संताच्या नावाचं अनुकरण करत धड मनुष्य तरी बनता आलं पाहिजे.
तुकाराम या शब्दाचा अर्थ म्हणजे देवाला खडसावून विचारायचं की, आता सहाचा अंत करून मला तुकारामांसारखे संसाररूपात कळस बनवं.
। तुका झालासे कळस।
भजन करा रे सावकाश।
म्हणजे तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे त्यांना
वारकरी सांप्रदायाचा कळस मानलं गेलं आहे, पण संत तुकाराम महाराजांच्या जन्माविषयी थोडक्यात.
संत तुकाराम महाराजांची जन्मकथा
संत तुकाराम महाराजांचा जन्म हा नामदेवांचं अर्ध राहिलेलं कवित्वाचं काम पूर्ण करण्यासाठी झाला होता. संत नामदेवांच्या घरात १५ जण राहत होते. या पंधरा जणांनी
वेगवेगळे अभंग केले आहेत. पण अंतकाळी संत नामदेवांचे चार कोटी अभंग राहिले असल्यामुळे नामदेवांना तुकाराम नावाने जन्म घ्यावा लागला. त्याचं प्रमाण देणारी ही ओळ
। अभंग राहिले चार कोटी।
म्हणून तुका कणकाईच्या पोटी।
त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी देखील त्यांच्या गाथ्यात कबूल केले आहे की,
संत नामदेवांचे कार्यच मी पूर्ण करत आहे. त्याचं कवित्व जे अर्धवट राहिलं आहे. ते पूर्ण करण्याचं काम मी करत आहे, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी ग्वाही देतात.
। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी।
उरले शेवटी ते लावी तुका।
तुम्ही म्हणाल, हे सर्व सांगितलं ते खरं आहे. पण देव कोणाचा दास आहे?
देव मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे?
। चित्ती नाही आस। त्याचा पांडुरंग दास।
ज्याच्या चित्तात आस नाही अशा भक्तांचा पांडुरंग दास आहे, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी लिहून ठेवतात संताचा अभ्यास करणं, हा गहन विषय असला तरी त्यांच्या प्रत्येक कृतीतून समाजाला बोधच मिळाला आहे. त्यामुळे
शेवटी
राहून राहून सांगाविशी वाटणारी ओळ म्हणजे,
। संताचिया पायी खर्चावे शरीर। #महाराष्ट्रदिन
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#महाराष्ट्रदिन महाराष्ट्राचा इतिहास -
महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक,
इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
1.1. प्राचीनकाळ नावाचा उगम -
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर
इतिहास, परंपरा, निसर्ग, विज्ञान, औद्योगिक विकास, सहकार अशा विविध पैलूंचा वारसा लाभलेला महाराष्ट्र नेमका आहे तरी कसा? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण कधी थांबून याचा वेध घेतो का?
इतिहास, परंपरा, निसर्ग, विज्ञान, औद्योगिक विकास, सहकार अशा विविध पैलूंचा वारसा लाभलेला महाराष्ट्र नेमका आहे तरी कसा? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण कधी थांबून याचा वेध घेतो का? याच प्रश्नांचे उत्तर म्हणून येत्या 'महाराष्ट्र दिना'च्या निमित्ताने 'लेट्स रीड फाऊंडेशन'च्या
माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आपल्याच राज्याची विविधांगी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वाचकांनाच सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. आज, सोमवारपासून १ मेपर्यंत हा वाचन आणि चर्चासोहळा '@LetsReadIndia'या ट्विटर अकाउंटवर रंगणार आहे.