दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. 1/n
त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. 2/n
मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला
पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला
3/n
ते काही ऐकूनच घेईनात. बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गी लावले.त्यादिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते जिथे गृहमंत्री काही करू शकत नाही तिथे दुसरं कुणी काही करेल याची काहीच शक्यता नव्हती तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले 4/n
त्यांना त्यांनी सगळे सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले.
हे ऐकून पवारसाहेबही " अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मीही यात काही करू शकत नाही. 5/n
उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका,त्याला पार घाला,खतपाणी घालून वाढवा. झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा. मी सगळीकडे हेच सांगत असतो पण लोक ऐकत नाहीत आमच्या बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते 6/n
मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही. पण त्यामुळे किती नुकसान होते हे लोकांना कळत नाही. तीअडाणी आहेत . आपण शिकलेली माणसं आहात तुम्ही झाड जपलं पाहिजे.
हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का ?" असे सुनावून आलेल्यांना चहापाणी देवून कटवले ......7/n
पदाधिकार्यांनी पवारसाहेबांचे बोल ध्यानदेवून ऐकले होते त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला त्याला ते रोज पाणी घालू लागले.अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले,पदाधिकार्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेले झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली. 8/n
पदाधिकार्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले..
धन्य ते साहेब, आणि धन्य ते राजकारण..
महाराष्ट्रातही एका पक्षरुपी झाडाला साहेबांनी नुकत्याच मोरचुदाच्या पुड्या घातल्या आहेत. कुणाला काय पण त्या झाडाला पण हे अजुन कळालेले नाही. 9/9
😄WA
देशद्रोह्यांना हेरून त्यांचे संघटन करून त्याला ब्रिगेड हे नाव द्यायचे व खरे रूप उघडे पडू नये यासाठी समाजाला आदर्श असलेल्या कट्टर धर्मभक्तांची नावे त्याला द्यायची...
याचेच उत्तम उदाहरण म्हणजे...
संभाजी ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेड
शिवाजी मुस्लिम ब्रिगेड 1/n
एका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून देऊन अख्ख्या महाराष्ट्राला ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत.
2/n
हिंदू सण व उत्सव यांच्यावर टीका किंवा विरोध मात्र मुस्लिम उत्सव यांना चालतात
गणपती मूर्तीच्या स्थापनेला विरोध पण पीरच्या उर्सात पाळणे बसवण्यासाठी पत्र ...👇🏼3/n