ये हार नही आगाज है!
मला हसायला येतं जेव्हा मोठे मोठे पॉलिटिकल पंडित (मोदीजी च्या भाषेत🙂) म्हणताना दिसतात की एवढी ताकद बीजेपी नी लावली प्रधानमंत्री,गृहमंत्री पासून तर सगळे heavy weight leaders, संपूर्ण कॅडर कामाला लावलं पण तरी इलेक्शन मात्रं हरले.अरे पंडितानो इलेक्शन हे संपूर्ण
ताकदीने च लढायचे असते मग ते कुठलाही इलेक्शन असो (ह्याची प्रचिती हैद्राबाद municipal corporation इलेक्शन मध्ये आली आहे)आणि हाच फरक मोदी-शहाना इतरांन पासून वेगळे करतो. कुठलीच गोष्ट ते half-heartedly करत नाही आणि इलेक्शन तर नाहीच म्हणुनच त्याचे परिणाम दिसून पण येतात.आज जी देशभरात
पार्टी पसरली आहे त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. सगळ्या गोष्टी ह्या केवळ हारजीत ह्या परिमाणात बघायचा नसतात. बंगाल मध्ये जो काही निवडणुकांचा निकाल आला आहे तो इलेक्शन जिंकण्या पेक्षा काही कमी नाही.3 सीट ते 75+ सीट हा फरक केवळ 5 वर्षांत पार्टी ने केलाय हे खुप महत्वाचं आहे.
कॉंग्रेस आणि communist वर्षानुवर्ष तिथल्या राजकारणात आपला घट्ट पाय रोऊन उभे होते बंगाल तर communist चा गड च पण आज सगळ्यात मोठी opposition party म्हणून कोण उदयाला आला आहे आणि हे केवळ 5 वर्षांत केलाय, हे का शक्य झालं कारण इलेक्शन संपूर्ण ताकदीनिशी लढल्या गेलं.
आणि तसं केलं नाही तर काय होतं हे कॉंग्रेस कडे बघून कळतं 44 वरुन शून्य वर आलेत इलेक्शन to इलेक्शन जनता त्यांना नाकारते आहे पण ह्याना आनंद एवढाच बीजेपीला सत्ता मिळवता आली नाही. राजकारण हा काही partime जॉब नाही झोकून देऊन च काम करावं लागतं तर आणि तरच तुम्ही टिकून राहता.
आता ह्या इलेक्शन मधून काय मिळवले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्टी बंगाल मध्ये तळागाळापर्यंत पोहोचली जे इतके वर्ष अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती.ह्या result मुळे किमान 2-3 राज्य सभा सीट मिळणार अर्थातच राज्यसभेत तुमची ताकद वाढणार, नेक्स्ट इलेक्शन ला तुमचा starting point हा 75+असणार
जो तुमचा ह्या इलेक्शन मध्ये 3 होता अर्थातच ह्याचा फायदा लोकसभा इलेक्शन ला पण होणार आणि ह्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं काय मिळवलं तर पार्टी ला बंगाल मध्ये शुभेंदू अधिकारी च्या रुपाने चेहरा मिळाला.
किती आणि कुठे कुठे केवळ मोदींचा चेहरा वापरणार पार्टी जवळ विश्वासातमक चेहरा नसल्याने पंजाब दिल्ली (काही प्रमाणात बिहार) सारखी महत्त्वाची राज्य नाहीत.
त्यामुळे बंगाल निवडणूक ही हार नसून एक आश्वासक परिणाम आहे. ये हार नही आगाज है..!!
फक्तं एकाच गोष्टीची काळजी आहे ती तिथल्या कार्यकर्त्यांची, शेकडो कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे आता शीर्ष नेतृत्व तिथल्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहतील आणि त्यांना भक्कम आधार देतील हीच अपेक्षा. #बंगाल_निवडणूक#भाजप
श्रीरंग
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh