अभाविपच्या कोलकता कार्यालयावर ममता बॅनर्जीच्या गुंडांनी हिंसक हल्ला केला
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच तृणमूल कॉंग्रेसची हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी सर्व बंगालमध्ये उघडपणे दिसून आली आहे.
रविवारी (काल) पासून ममता बॅनर्जी यांचे गुंड विरोधकांवर निशाणा साधून आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यापासून ते हल्ला करण्यापर्यंत सर्व प्रकारे अराजकतेचे वातावरण निर्माण करीत आहेत.
आज, तृणमूलच्या १५-२० गुंडांनी कोलकाताच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम बंगाल प्रांताच्या कार्यालयावर हल्ला केला आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना शिवीगाळ, मारहाण आणि तोडफोड केली.
कार्यालयामध्ये उपस्थित राष्ट्रीय सह-संघटन मंत्री श्री. श्रीनिवास, क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. गोविंद, सह-क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. अंशु शेखर शील, केंद्रीय कार्यसमिती सदस्य श्री. सुमनचंद्र दास आणि ५ ते ६ इतर कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला
तसेच कार्यालयामध्ये ठेवलेल्या देवी काली आणि हनुमान यांच्या मूर्ती फोडल्या. यासह या गुंडांनी रवींद्र नाथ टागोर, श्यामा प्रसाद मुखर्जी, सुभाषचंद्र बोस आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमा लाथामारून फोडल्या आणि कार्यालयाचे नुकसान केले.
यावेळी ते जोर जोरात धमकी देत म्हणत होते की 'ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे त्या अस्वस्थ झाल्या आहेत आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांना आता बंगाल मध्ये राहू देणार नाही.'
साधारण दुपारी १ वाजताच्या या १५-२० मिनिटांच्या हल्ल्याची काल पासून तृणमूल कॉंग्रेसचे गुंड तयारी करत होते
आणि रात्री जवळपास १५० गुंड अभाविप प्रांत कार्यालयाच्या बाहेर दुचाकी घेऊन आसपास वावरताना दिसले. या घटनेचे प्रसिध्दी पत्र लिहिण्यापर्यंत अभाविप कार्यालयाभोवती १०० हून अधिक ममताच्या गुंडांकडून वेढा घालता जात होता अशी माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली.
अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी म्हणाल्या, ''तृणमूलच्या गुंडांनी केलेल्या आमच्या कार्यालयावर हिंसक हल्ल्यामध्ये आमचे प्रमुख कार्यकर्ते सुरक्षित आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मुख्यमंत्री आणि त्यांच्या गुंडांनी ज्या प्रकारचे हिंसक वर्तन दर्शविले आहे
ते अत्यंत निंदनीय आहे. आगामी काळात आपल्याला एकजूट राहून आपली सुरक्षा ध्यानात ठेवून राष्ट्रवादाची मशाल ज्वलंत ठेवायची आहे. येणाऱ्या काळात बंगालमध्ये परिस्थिती कशी होणार आहे याचे उदाहरण ममता आणि तिच्या गुंडांनी दाखवलेच आहे म्हणून आपल्याला आता दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे लागेल."
अभाविप कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या, '' एकीकडे निवडणूक निकाला नंतर लोकशाहीच्या बाता मारायच्या आणि निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अभाविप कार्यालयावर हल्ला करत गुंडाराज दाखवून द्यायचा. ममता दीदी ने हे असले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे बंद करावं.''
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh