#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.
१/७
'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
२/७
ह्याच डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी दै प्रत्यक्ष @NewscastGlobal ह्यात तिसरे महायुद्ध ह्या विषयावर दीर्घ लेखमाला लिहिली जी आता पुस्तक रुपात उपलब्ध आहे. २००६ पासून तिसरे महायुद्ध अतिशयोक्ती वाटणाऱ्यांना आता ह्यापुस्तकाच महत्त्व पटू लागलय. जगात स्थित्यंतरे घडवणारी २ महायुद्ध आणि
३/७
आता सुरू झालेले तिसरे महायुद्ध म्हणजे सूज्ञास अधिक सांगणे न लगे. ह्या पुस्तकात भविष्य सांगितलंय का? #नाही. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने घडून गेलेल्या घटना, घडत असलेल्या आणि त्या निकषांवर होणाऱ्या घटना ह्यांचा परिपक्व आणि परिपूर्ण अभ्यास म्हणजे हे पुस्तक.
४/७
इन्स्टाग्रामवर नवीन फिल्टर कुठला आला हे आजकाल माहिती असत पण आपल्या शत्रूराष्ट्रांनी काय प्रगती केली ह्यांच्यावर पण आपलं लक्ष असलं पाहिजे. आज इस्राईलचा प्रत्येक नागरिक लढतोय देशाच्या बाजूने म्हणून आज पॅलेस्टाईन गुडघे टेकतोय.
५/७
ओसामा, हमाझ, जवाहिरी ह्यांच्यासारखे आतंकवादी तसेच प्रिन्स चार्ल्स, कोंडोलीजा राईस,जॉर्ज बुश, १६ वे पोप ह्यांसारख्या महत्वाच्या व्यक्ती ह्यांच्याबद्दल देखील माहिती ह्यात दिली आहे. जैविक युद्ध, अंतराळ युद्ध वगैरे ह्यात दिलेलं आहे.
६/७
ह्याकाळात भारताची भूमिका काय असू शकते काय असायला पाहिजे राजकीय, सामरिक सर्व दृष्ट्या हे ह्यात मांडलं आहे तसेच एक भारतीय नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे हे देखील ह्यात उत्तमरीत्या मांडलं आहे. पुस्तक वाचल्यावर फक्त आज जगात घडणाऱ्या घडामोडी ह्यांचा संबंध जोडून पहा
७/७
पुस्तक अमेझॉन इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहे. पण एक भारतीय नागरिक म्हणून सर्व भारतीयांना विनंती आहे की एकदा फक्त हे पुस्तक वाचा. किंडल उपलब्ध आहे. (Pdf मागू नये).