१९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले.
यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वापरात असलेले २० व्हेंटिलेटर गुपचूप एमजीएम रुग्णालयात लावले गेले.
एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर लावताना उत्पादक कंपनीला कसलीही कल्पना दिली गेली नाही.
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी गुपचूप एमजीएम खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर नेऊन लावले.
एमजीएम संस्था एका काँग्रेस नेत्याच्या आशीर्वादाने चालवली जाते.
वरील १०० पैकी आणखी ३ व्हेंटिलेटर सिग्मा खासगी रुग्णालयात लावले गेले. औरंगाबाद वैद्यकीय रुग्णालयात वापरात असलेले व्हेंटिलेटर हटवून ते सिग्मा रुग्णालयात लावले गेले.
सरकारी रुग्णालयात सुस्थितीत आणि वापरात असलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात वळवले गेले, हे विशेष.
चौकशी अहवाल सांगतोय की, औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त नाहीत. व्हेंटिलेटर उत्पादकाच्या सल्ल्याशिवाय संयंत्र वापरण्याचा प्रयत्न झाला. योग्य पद्धतीने व्हेंटिलेटर न वापरता आल्याने ते बिघडल्याच्या तक्रारी आल्या.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात १९/४/२१ रोजी १०० व्हेंटिलेटर पाठवले. या १०० पैकी ४५ व्हेंटिलेटर उत्पादकाच्या कर्मचाऱ्यांनी बसवून सुरू करून दिले.
उरलेले ५५ व्हेंटिलेटर बीड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली इथं पाठवण्यात आले. त्यापैकी ५० व्हेंटिलेटर सुस्थितीत आणि कार्यरत आहेत. मात्र, ५ व्हेंटिलेटर बीड रुग्णालयात अजूनही आदेशाविना पडून आहेत.
२३/एप्रिल/२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला आणखी ५० व्हेंटिलेटर पाठवले गेले.
त्यापैकी, ४८ व्हेंटिलेटर अद्यापही स्थानिक प्रशासनाकडून सूचना न मिळाल्याने पडून आहेत.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh