गिरीश कुबेर यांच्या वादग्रस्त पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल खोडसाळपणे लेखन केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या सत्य इतिहास संदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. खर म्हणजे उत्तरकालीन बखरी, तसेच कादंबरी, चित्रपट, नाटक या
१/
माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे अनैतिहासिक पद्धतीने चरित्रहनन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विविध इतिहासकारांनी अनेक अडीअडचणीना तोंड देत अपार कष्ट घेऊन आपल्या संशोधनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला त्याचा उपयोग
२/
आता इतिहास अभ्यासकांना होतोय, त्याच काही संदर्भग्रंथांची नामओळख इतरांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
१) छत्रपती संभाजी महाराज चरित्र - वा.सी.बेंद्रे
२) शिवपुत्र संभाजी - डॉ.कमल गोखले
३) छत्रपती संभाजी स्मारकग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार ( संपादन )
३/
४) ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
५) राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख
६) संभाजीकालीन पत्रसार संग्रह- शं. ना. जोशी ( संपादन )
७) बुधभूषण
८) छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य - प्रा. रामकृष्ण कदम
९) अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज - अनंत दारवटकर
४/
ह्या संदर्भ ग्रंथाशिवाय इतर समकालीन कागदपत्रे, परकीय नोंदी तसेच फारसी साहित्य देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्याच्या सखोल अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहेत. इतिहास अभ्यासकांनी आपल्या चिकित्सक बुद्धीने उपरोक्त संदर्भग्रंथाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा