१. श्रीलंका सरकारने चीन ला राजधानी जवळील हंबनटोटा बंदर ९९ वर्षे करारावर १.१२ बिलियन डॉलर्स वर भाड्याने दिले आहे.
चीन हा प्रशांत महासागरात भारत आणि जपानची कोंडी करू पाहत आहे, असं मत आंतरराष्ट्रीय समुदाय आणि अमेरिका सरकारने व्यक्त केलं आहे.
सदर ५४० एकर जागेचा उपयोग चीन लष्करी कारवाया करण्यासाठी करू शकतो.
२. चीनने बांगलादेशी सरकारला क्वाड मध्ये सामील होऊ नये अशी ताकीद दिली आहे.
३. काही दिवसांपूर्वी चीनने Xian H-20 या आपल्या stealth bomber विमानाची चाचणी केली असून, हे लढाऊ विमान अणुबॉम्ब नेण्यास सक्षम आहे.
सदर घटना ह्या निव्वळ योगायोग नसून, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि भारताला काळजीत टाकणाऱ्या आहेत.