वडिलांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे आपल्याला वाढवले. दुसऱ्याना दोष देताना आपण आपली जबाबदारी टाळत असतो. लहानपणी आपल्याला जशी वाईट वागणूक त्यांनी दिली, तशीच त्यानासुद्धा त्यांच्या लहानपणी मिळाली होती. ते आपल्यासारखेच सतत घाबरलेले आणि दडपणाखाली असायचे, ते सुद्धा असेच
तुमच्यासारखे असहाय्य असायचे, ते जे शिकले तेच त्यांनी तुम्हाला शिकवलं. तुमच्या आई - वडिलांच्या लहानपणीची तुम्हाला कितपत माहिती आहे विशेषतः वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधीची ? शक्य असेल, तर अजूनही विचार किंवा शोधून काढा. ते जर शोधून काढलं, तर ते तुमच्याशी असं का वागले तुम्हाला
समजेल आणि तुम्हाला त्यांची दया येईल. तुम्हाला नाही शोधून काढता आलं, नाही विचारता आलं, तर त्यांचं बालपण कसं गेलं असेल, ते कोणत्या वातावरणात मोठे झाले असतील, याची कल्पना करा. हे तुम्हाला तुमच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे. त्यांना मुक्त केल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही.
त्यांना माफ केल्याशिवाय तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत असाल, तर तुम्हालासुद्धा परिपूर्ण व्हावं लागेल. नाहीतर आयुष्यभर तुम्ही दुःखी, कष्टीच राहाल. #वाचलेलं
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh