214 एकर जमीन

कारखान्याची भलीमोठी इमारत

करोडो रुपयांची मशिनरी

अधिकारी, संचालकांचे बंगले आणि गाड्या

कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स

आणि बरीच इतर मालमत्ता..

या सगळ्याची किंमत झाली केवळ 40 कोटी
#ED #Maharashtra 1/1
लिलाव सुरु झाला

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जवळपास 10 हून अधिक कारखाने, कंपन्यांनी निविदा भरल्या..

पण अचानक तिसऱ्या फेरीत एक कंपनी अवतरली आणि तिला कारखाना अवघ्या 65 कोटीत मिळाला..

कारखान्याचं नाव जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना..
#ED #Maharashtra 2/2
विकत घेणारे गुरु कमॉडिटीज..

कंपनीची वार्षिक उलाढाल 63 लाख आणि निव्वळ नफा केवळ 10 हजार

तरीही गुरु कमॉडिटीजनं 65 कोटीचा कारखाना विकत घेतला..

अर्थात हे सगळं होत असताना शिखर बँकेचे चेअरमन होते अजित पवार. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री.
#ED #Maharashtra 3/3
कारखाना मिळाला कुणाला? तर गुरु कमॉडीटीजला

चालवायला दिला कुणाला..? जरंडेश्वर कंपनीला

जरंडेश्वर कंपनीत गुंतवणूक कुणाची..? तर स्पार्कलिंगची

या स्पार्कलिंगमध्ये शेअर्स कुणाचे...? तर ईडीच्या म्हणण्यानुसार अजित पवारांच्या कुटुंबियांचे आणि निकटवर्तीयांचे
#ED #Maharashtra 4/4
मग कारखाना मिळाला कुणाला...? उत्तर तुम्हाला समजलं असेल..

हे इथंच संपतं का..? तर नाही..

ज्या जरंडेश्वर कंपनीला कारखाना चालवायला दिला त्यांना पुणे जिल्हा सहकारी बँकेनं कर्ज दिलं..

किती कर्ज दिलं..? तर जवळपास 400 कोटीहून अधिक..
#ED #Maharashtra 5/5
त्याला तारण काय ठेवलं..? तर कारखान्याची जमीन..

ती किती आहे..? तर 200 एकरपेक्षा जास्त..

आता गंमत बघा..
#ED #Maharashtra 6/6
ज्या कारखान्याची जमीन 200 एकर आहे. ज्या कारखान्याची भलीमोठी इमारत आहे. ज्यातली मशिनरी करोडोंची आहे. अधिकारी, संचालकांचे बंगले, कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स, गाड्या इतर मालमत्ता यांची व्हॅल्युएशन कारखाना अवसायानात काढताना किती केली होती तर केवळ 40 कोटी..
#ED #Maharashtra 7/7
आता हा कारखाना गुरु कमॉडीटीज अर्थात जरंडेश्वर कंपनी अर्थात स्पार्कलिंगकडे आल्यावर अवघ्या काही महिन्यात त्याची व्हॅल्यू एवढी वाढली की या मालमत्तेवर 400 कोटीहून अधिकचं कर्ज मिळालं..
#ED #Maharashtra 8/8
हे सगळं होत असताना शिखर बँकेवर संचालक कोण होते..?
अर्थात अजित पवार होतेच, पण काँग्रेसचे बडे नेते, भाजपचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे माजी खासदारही होते..
#ED #Maharashtra 9/9
मोडस क्लीअर होती

कारखाने आधी कर्जबाजारी करायचे

नंतर ते अवसायानात काढायचे

त्याची व्हॅल्यूएशन कवडीमोल करायची

मग आपल्याच कच्च्याबच्च्यांना हाताशी धरुन ते पुन्हा विकत घ्यायचे

काहीशे कोटीची मालमत्ता अवघ्या काही कोटीत खिशात.

हे आघाडी सरकारच्या काळात सऱ्हास चालू होतं.

#ED 10/10
2005 ते 2015 या काळात जवळपास 43 कारखाने अशाच पद्धतीनं विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्याविरोधात अण्णा हजारे, माणिकराव जाधव, राजू शेट्टी, शालिनीताई पाटील यांनी कोर्टापासून ईडीपर्यंत सगळ्यांचे उंबरे झिजवले. पण तेव्हा ईडी अभ्यास करत होती..
#ED #Maharashtra 11/11
हा अभ्यास महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि ते पडत नाही म्हटल्यानंतर पूर्ण झाल्याचं दिसतंय. त्यामुळेच एका फटक्यात जरंडेश्वर जप्ती आली.
#ED #Maharashtra 12/12
27 हजार सभासदांनी 10 कोटीचं भांडवल उभं केलं. पोरांच्या तोंडचा घास काढून पैसे शेअरमध्ये गुंतवले. कुणी जमिनीचा तुकडा विकला,कुणी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कुणी घर बांधायचं थांबून शेअर्स घेतले. या सगळ्या शेतकऱ्याच्या हक्काच्या कारखान्यांवर आघाडीच्या काळात दरोडे घातले. #ED 13/13
आता जरंडेश्वरचं म्हणाल तर खटाव,कोरेगाव,साताऱ्याच्या काही भागातून ऊस जायचा. या सगळ्या भागावर राष्ट्रवादीचंच वर्चस्व. मतदारांनी यांचा उमेदवार 2019 च्या आधी अपवाद वगळता पडू दिला नाही. पण तरीही आपल्याच समर्थकांचे, मतदारांचे कारखाने खिशात घालताना यांना किंतुपरंतु वाटला नाही. #ED 14/14
तांत्रिकदृष्ट्या व्यवहार कायद्याच्या चौकटीत दिसत असतील. पण एन्ड रिझल्ट हाच आहे की शेतकऱ्यांचे कारखाने खासगी मालकीचे केले.
एवढं सगळं धडधडीत दिसत असूनही कालपासून सगळीकडे महाविकास आघाडीवर दबाव आणण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचे आरोप केले जातायत. त्यात तथ्य नाही असं नाही. #ED 15/15
भाजपची सत्तेची अघोरी भूक आणि लोकांची, लोकशाही मूल्यांची मुस्कटदाबी यापेक्षा सध्या महाराष्ट्रातील अनेक सुज्ञ लोक वाटमाऱ्या सहन करताना किंवा त्याचं समर्थन करताना दिसतायत..
#ED #Maharashtra 16/16
हे म्हणजे मोठ्या दरोड्यांपेक्षा छोट्या वाटमाऱ्या करणारे परवडले असं झालंय.

थोडा विचार केला तर गोरगरीब शेतकऱ्यांच्या नशिबात दुर्दैवानं छोटे किंवा मोठे पण दरोडेखोरच असल्याचं दिसतंय.

तिसरा चॉईस नाही!
#ED #Maharashtra 18/18

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Abhijit Karande

Abhijit Karande Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @abhiasks

1 Jul
देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायलं
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायच

पायावर ठेवलेलं डोकं
काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
#पुस्तकवारी 1/1 Image
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही

#पुस्तकवारी #वारी #तुकाराम 2/2
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधी कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण
#पुस्तकवारी 3/3
Read 4 tweets
21 May
म्युकरमायकॉसिस.. अर्थात ब्लॅक फंगस. अत्यंत जीवघेणा आजार.
महाराष्ट्रात 1500 हून अधिक रुग्ण. यावरचा उपचार अत्यंत महागडा. एका रुग्णाला 100-150 किंवा त्याहूनही जास्त इंजेक्शन्स लागतात. एकाची किंमत 7800 इतकी आहे. सरकारी नव्हे खुल्या बाजारातली. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेर. #BlackFungus
एखाद्या रुग्णाला 100 इंजेक्शन लागली तर किमान 7 लाख 80
हजार खर्च. डॉक्टरांची फी, शस्त्रक्रिया असं सगळं मिळून 15 ते 20 लाखाचा खर्च. अख्खं कुटुंब रस्त्यावर आणणारा आजार आहे. त्यातही डोळा, दात आणि इतर अवयव गमावण्याची किंवा त्यांना इजा होण्याची भीती वेगळीच. #BlackFungus
सरकारनं म्युकरमायकॉसिस म.फुले जनआरोग्य योजनेत घेतलंय. त्यात किमान 10 हजार आणि कमाल 70 हजार रु. मिळतात. सरकारी रुग्णालयात म.फुले योजना लागू आहे. पण खासगी रुग्णालयं आर्थिक फायद्यासाठी रुग्णांना उभं करतात? त्यामुळे सगळं गहाण ठेऊन रुग्णालयाच्या दारात उभं राहावं लागतं. #BlackFungus
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(