#माहीम ग्रामस्थ आणि श्रीधर फाउंडेशन माहीम यांच्या सहयोगातून माहीम - वडराई समुद्रकिनारी आयोजित केलेल्या आजच्या #कांदळवन संवर्धन मोहिमेची सुरुवात खूपच आश्वासक झाली.
आजच्या या कार्यक्रमात
यसवंत सोनटक्के, सह संचालक, पाणी विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन;
1/n
राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, #महाराष्ट्रप्रदूषणनियंत्रणमंडळ, ठाणे;
दीपक बनसोड उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बोईसर;
गजानन पवार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बोईसर;
असे #शासनाच्या विविध विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण २५ कर्मचारी जातीने उपस्थित राहिले तसेच त्यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमादरम्यान प्रत्येक विभागाच्या अधिकारींनी ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन केले.
तसेच हे #प्रदूषण कसे रोखता येईल याबाबत काही सूचनाही केल्या. ग्रामस्थांच्या पुढाकारा शिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नसल्याने आज उपस्थित असलेल्या सर्व माहीम ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले व आभारही मानले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित असल्याने #पाणेरी#नदी प्रदूषणाबद्दलही चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका मांडून लवकरच याबाबत ठोस पाऊल उचलण्याबद्दल आश्वासन दिले.
आजच्या या उपक्रमात एकूण ६३ ग्रामस्थ सहभागी झाले होते. यामध्ये माहीम ग्रामपंचायतीच्या काही आजी माजी सदस्यांचाही सहभाग होता. तसेच गोळा केलेला कचरा उचलण्यासाठी माहीम ग्रामपंचायतीने कचरा गाडी पाठवून सहकार्य केले.
तसेच वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समितीच्या चार कार्यकर्तेही वरोरहून खास आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.