पंक्चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान
फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे.‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात,हे पाहण्याची गरज आहे. #कोल्हापूर
कोल्हापूर - ‘हे पंक्चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी’, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे.. पंक्चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे. पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, शांतपणे काम करत राहायचे. एकजण पंक्चर झालेले चाक काढायचा.
दुसरा पंक्चर शोधायचा. तिसरा पंक्चर काढायचा. चौथा हवा भरायचा. सुरुवातीला ते थोडे गोंधळायचे. हळूहळू त्यांचा जम बसला आणि आज पंक्चर काढायचे हे दुकान एकदम फास्ट आहे. विशेष हे की, येथे काम करणारे हे आठही जण मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आहेत.
#कोल्हापूर#kolhapur#मिसळ
कोल्हापुरातील खास मिसळ ठिकाणं
१ फडतरे मिसळ,उद्यमनगर
२ लक्ष्मी मिसळ,उद्यमनगर
३ ठोंबरे मिसळ,भोई गल्ली
४ बावडा मिसळ,कसबा बावडा
५ विजय मिसळ,राजारामपुरी
६ पुरंदर मिसळ,राजारामपुरी
७ कोल्हापुरी वाडा मिसळ,राजारामपुरी
८ शाहू मिसळ,राजारामपुरी
९ भगत मिसळ,उद्यमनगर
१० करवीर मिसळ, मंगळवार पेठ
११ कळंबा मिसळ, कळंबा
१२ शाही मिसळ, राजारामपुरी
१३ खासबाग मिसळ, बालगोपाल तालीम
१४ मिसळ स्टेशन , खरी कॉर्नर
१५ चोरगे मिसळ , रंकाळा
१६ तात्याचा ढाबा मटका मिसळ, कळंबा
१७ गावरान मिसळ, राजारामपुरी
१८ न्याहारी मिसळ , राजारामपुरी
१९ तडकोड मिसळ, राजारामपुरी
२० कोल्हापूर मिसळ , सुभाष रोड
२१ पांडुरंग मिसळ , राजारामपुरी
२२ जय भवानी मिसळ, सिध्दाळा गार्डन
२३ गायकवाड मिसळ , महालक्ष्मी मंदिर
२४ शिवशाही मिसळ , आर के नगर
२५ खमंग मिसळ , टाकाळा
२६ श्रीमंत मिसळ ,के डी सी सी बँके समोर
२७ मिसळ कॅफे, बागल चौक. #मिसळप्रेमी#कोल्हापूर#kolhapur