आपलं कोकण पाण्याखाली आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसलाय. एसटीचा बस डेपो पाण्याखाली गेलाय इतका पाऊस तिथे होतोय. कित्येक घरं पाण्याखाली आहेत, कित्येक संसार पाण्याखाली आहेत.
(१/५)
याक्षणी तिथले स्थानिक लोक,प्रशासन,NDRF वगैरे पुरातून लोकांना बाहेर काढावे म्हणून काम करतायत.पण चिपळूणकरांची लढाई सोपी नाहीये.पूर ओसरल्यावर त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
अश्यावेळी,आपणच त्या अडचणी वाटून घ्यायच्या आहेत.आपणच पुढे येऊन त्यांना हात द्यायचा आहे. (२/५)
संकटात महाराष्ट्र एकदिलाने उभा राहतो ही आपली परंपरा आहे.
तेव्हा या चिपळूणकरांच्या संसाराला हात देऊया. 'युथ फॉर डेमोक्रॅसी' हे अवाहन करतेय की सोबत दिलेल्या ग्राफिक्समध्ये ज्या ज्या वस्तू तुम्हाला देणं शक्य होईल त्या त्या द्या. आम्ही मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद (३/५)
सहित अनेक शहरांमध्ये ही मदत गोळा करत आहोत. सोबत ग्राफिक्स मध्ये सहकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देत आहोत. त्यांना संपर्क करून जास्तीत जास्त प्रमाणात मदतीचा हात देऊयात आणि चिपळूणला, कोकणाला या अस्मानी संकटातून बाहेर काढू या!
(४/५)
सप्टेंबर २०२० ला संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारत आपल्या लस निर्मिती व निर्यात क्षमतेच्या माध्यमातून ह्या संकटकाळात जगाचे लसीकरण करण्यासाठी भारत कशी मदत करेल या बाबत पंप्र मोदी यांनी भाष्य केले.
या पूर्वीच सिरम इन्स्टिटयूट इंडिया यांनी अॅस्ट्रॅजेनेका व नोवावाक्स सोबत मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी (यात भारताचा देखील समावेश आहे) १ अब्ज डोस प्रत्येकी देण्याचा करार केला. याचवेळी भारतातील इतर कंपन्या देशी लस निर्मिती करण्यात महत्वाच्या टप्प्यावर होत्या.
सत्ताधीशांचा उदोउदो करण्यात मश्गुल असलेल्या आपल्या चियरलिडर्स रुपी माध्यमांनी एव्हाना पंप्र यांचा व्हॅक्सिन गुरु म्हणून गवगवा करायला सुरुवात केली होती. याला जोड म्हणून की काय मोदींनी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्याना भेटी देखील दिल्या.
आज संबंध भारतात भयाण परिस्थिती आहे. RTPCR टेस्ट केली तर रिपोर्ट यायला ४८ तासाहून अधिक वेळ लागतोय. रिपोर्ट +ve आला आणि ऍडमिट होण्याची वेळ आली तर बेड मिळत नाहीये, बेड मिळाला तर injection मिळत नाहीये, ऑक्सिजन नाही ventilator नाही, स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत
(१/n)
मृत व्यक्तीच्या नशिबी शेवटचे संस्कारही नीट नशिबी नाहीत. एवढी सगळी अंदाधुंदी माजली असताना आपले आली बाबा अर्थात पंप्र आणि त्यांची टोळी काय दिवे लावत आहेत? राहुल गांधींनी येणाऱ्या त्सुनामीचा अंदाज घेऊन यांना वैद्यकीय सुविधा वाढवायचा सल्ला दिला तर यांनी त्यांची टिंगळ केली (२/n)
पीएम केयर्सचे खाते चालू करून हजारो कोटींचा गल्ला जमा केला, या रकमेतून ज्या कंपन्यांना व्हेंटिलेटर बनवायचे कंत्राट दिले त्यांच्या कडून आजतागायत एकही व्हेंटिलेटर मिळालेले नाही. केंद्र सरकारने तर सप्टेंबर महिन्या पासून राज्यांना पीपीई किट देण्याचे देखील बंद केले आहे. (३/n)