#MPSC ते चहावाला
जवळपास 2013 ला D.ed(HI) पूर्ण झालं. नंतर 2 वर्ष command hospital pune येथे 2 वर्ष नौकरी केली.पण कुठे तरी मनामध्ये काही तरी वेगळं करावं असं वाटत होतं. पण अचानक मनात MPSC करायचं खूळ मनामध्ये घुसल.
2014-15 ला MPSC चे Class join kele. आणि सर्व दुनियादारी सोडून MPSC चा अभ्यास
चालू केला.2,3 वर्ष कसे गेले कळलं नाही.
अचानक घरून कॉल आला तुझे वडील नाही राहिले आता .नंतर कळलं की पुतण्याने माझ्या वडिलांचा खून केला. माझी सर्व life तेव्हा शून्य झाली अस वाटलं. नंतर कोरोना आला. घरचे बोलत होते तू पुण्यात आहे आता वडील नाहीत लहान भाऊ बहीण आहेत ते काय करतील तू बग काही आता.
अभ्यास करून तुला किती वर्ष होत आहेत अजून पोस्ट नाही. या सर्व गोष्टी मुळे मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो. वाटलं आता सर्व गेलं काय करू कधी वाटलं फाशी घेतो आणि मरून जातो वडील नाहीत तर कोण नाही आता पण नंतर विचार केला की
वडीलानंतर पण आपल कुटुंब आहे तू मोठा आहे काही तरी चांगलं कर आणि तुझी फॅमिली पुढे घेऊन जा .परत वाटलं आता की शिक्षण पण खूप झालं नौकरी नाही काही नाही काय करावं आता
PG पण मी 2 Sub मध्ये केली तरी कुठेच काही नाही कारण MPSC च मायाजाल माझ्या मनातून जात नव्हतं.कारण माझे पण बरेच मित्र अधिकारी झालेत आणि काही अजून असेच आहेत.
पण अशा वातावरणात मी न डगमगता option A आणि option B सोबत ठेऊयात. अस वाटलं
म्हणून मी MPSC चा अभ्यास करत करत पुण्यामध्ये नारायण पेठ येथे सेंद्रिय गुळाचा चहा हे हॉटेल चालू केले.
कारण आजकाल खूप MPSC ची मुले डिप्रेशन मध्ये आहेत.परीक्षा पास नाही झाले तरी त्यानी काही तरी वेगळा मार्ग निवडावा पास होत नसेल तर काही तरी ऑप्शन बगावे. चुकीचा मार्ग निवडू नये.