पुणे महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या 'व्हॅक्सिन ऑन व्हील’ उपक्रमांतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण, वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम.
झोपडपट्टी एरियात लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे १० संघ आणि सीएसआर चे १५ असे एकूण २५ संघांनी ६५० शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत. #PMC
(१/५)
ज्यात १.५० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले.
त्यामध्ये अंथरुणाला खिळलेले रुग्ण, एकटे राहणारे वृद्ध नागरिक, विकलांग व्यक्ती/ मानसिकदृष्ट्या अपंग, विशेष मुले, कुष्ठरोग रुग्ण, ट्रान्सजेंडर, व्यावसायिक वेश्या, रात्र निवारामधील लोक ज्यांची कोणतीही ओळख नाही, मोलकरीण, पथारीवाले,
(२/५)
फळे व भाजी विक्रेते, दुकानदार, फेरीवाले, घरेलू कामगार महिला, बांधकाम मजूर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी मोठ्या संख्येने शिबिरे आयोजित केली. त्याचप्रमाणे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि परदेशी नोकरी करणाऱ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली गेली. या सोबतच जिम मधील
(३/५)
लोक, UPSC परीक्षा इच्छुक विद्यार्थी, कलाकार, यांच्या साठी देखील शिबिरे भरवली गेली. पुणे येथील सर्व सरकारी कार्यालये, मीडिया व असोसिएशन कार्यालयांना देखील कार्यस्थळी लसीकरण केले जाते. याचा चांगला फायदा लोकांना होत आहे.
(४/५)
हे सर्व उपक्रम मा. विक्रम कुमार, आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
(५/५)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh