"आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. तिचा मान राखा."
"आपल्याच देशाची भाषा आहे. परक्या इंग्रजीपेक्षा हिंदी तुम्हाला का परकी वाटते?"
"तुम्ही हिंदीचा द्वेष का करता?"
"मराठी भाषा दिवस साजरा करतो तसा हिंदी भाषा दिवस आहे." #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही #मराठीबोलाचळवळ #StopHindiImposition
तर त्याची उत्तरे पुढीलप्रमाणे
१) भारत देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. घटनेतील ३४३ अ कलमानुसार भारत देशाला २२ अधिकृत भाषा आहेत पण कोणतीही राष्ट्रभाषा नाही.
२) भारत हे भाषिक आधारावर बनवलेले संघराज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी, बंगालमध्ये बंगाली पंजाबमध्ये पंजाबी.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यभाषा अधिनियमानुसार मराठी आणि वर्जित प्रसंगी इंग्रजी या भाषा वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदी ही आपल्यासाठी परक्या राज्याची भाषा आहे. अगदी गुजरात उच्च न्यायालयाने सुद्धा हाच निर्णय दिला होता. #काळादिवस #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही #StopHindiImposition
३) मराठी दिवसाप्रमाणे हिंदी दिवस हा एका भाषिक समूहापुरता मर्यादित दिवस नाहीये. खरंतर हिंदी भाषिक समूह ही सुद्धा राष्ट्रभाषेसारखी एक अंधश्रद्धा आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही #मराठीबोलाचळवळ #StopHindiImposition
मग हिंदी दिवस साजरा का करतात?
तर हा दिवस साजरा करण्याचं निमित्त हे आहे कि आजच्याच दिवशी १९५० साली भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदी स्वीकारण्यात आली होती. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा सरळसरळ अर्थ असा होतो की इतर २१ अधिकृत भाषा दुय्यम ठरतात. #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही
जर तुम्ही गेल्या सत्तर वर्षातील या निर्णयाचे परिणाम पाहिले तर लक्षात येईल की या निर्णयामुळे भारतभर एकाच भाषिकांना नोकरी व्यवसायासाठी प्रचंड फायदा झाला. रेल्वे टपाल आणि इतर सरकारी खाती ही त्याची महत्त्वाची उदाहरणे. #मराठीबोलाचळवळ #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही #StopHindiImposition
सरकारची अधिकृत भाषा मग राष्ट्रभाषा या गोंडस अंधश्रद्धेच्या रुपात फोफावली आणि त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली तिने इतर अहिंदी राज्यांत पाय पसरले. पण इतरांना त्रिभाषा सूत्र स्वीकारायला लावणाऱ्या उत्तर भारतातील राज्यांनी मात्र कोणतीच तिसरी भारतीय भाषा न स्वीकारता इंगजीला जवळ केलं.
अर्थातच तो निर्णय म्हणजे प्रत्येक अहिंदी भारतीयावर हिंदी लादण्याची सुरुवात होती.
हा दिवस साजरा करणे म्हणजे अहिंदी भाषिकांवर आणि त्यांच्या भाषिक अधिकारांवर हिंदी वर्चस्वाच्या विजयाचा आनंदसोहळा आहे.
म्हणूनच अहिंदी भारतीयांसाठी हा #काळादिवस आहे. #StopHindiImposition
त्यामुळे २२ अधिकृत भाषा असताना एकाच भाषेला असं झुकतं माप देणं हे राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाला मारक आहे हे ज्या ज्या लोकांना पटतं त्या प्रत्येक शहाण्या माणसाने आजच्या दिवसाला विरोध करणे महत्त्वाचे आहे आणि ते आपले आद्य कर्तव्य आहे #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही #StopHindiImposition
म्हणूनच राष्ट्रभाषा, संपर्कभाषा, भारतीय भाषा वगैरे सगळे गोड गैरसमज दूर करून आपल्या राज्यात आपल्या भाषेला पर्याय देणाऱ्या आणि दुय्यम स्थान देणाऱ्या भाषेचा प्रसार करणाऱ्या दिवसाला विरोध व्हायलाच हवा. #हिंदी_राष्ट्रभाषा_नाही #StopHindiImposition #मराठीबोलाचळवळ #काळादिवस
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh