देवपुजा, स्तोत्रपठण छे छे....वेळ कुणालाय इथे एवढा, मी तर सकाळी घर सोडताना देवघरात ठेवलेल्या फोटो समोर हात जोडतो व निघतो आणि सौं च विचारायला गेलात तर तिला काही देवादिकांची अथवा स्तोत्रांची अजिबात आवड नाहीये त्यामुळे ती सकाळी लावला देवापुढे दिवा तर लावते नाहीतर काय...
चालतय रे आणि तसही तिला वेळ कुठे असतो आणि मुलांचा तर विषयच सोडून दे...काय करायचं त्यांना हे देव देव करून ही असली Hard Wording ची lengthy स्तोत्र पाठ करून उगाच ह्या नादात ते त्यांचाच अभ्यास विसरून जायचे....ए चल सोड हा विषय निघतो मी...
हा कोणताही काल्पनिक संवाद नव्हे तर ही आजची वास्तविकता आहे.आज दुर्दैवाने इतकी घरं व कुटुंब अशी आहेत की जिथे अनेक दिवस देवपुजाच काय तर दिवसातून एकदा देवाला दिवा देखील लावला जात नाही.घरात शुभं करोती, अथर्वशीर्ष, भीमरूपी ह्या गोष्टी तर दुरचं.असो पूजाअर्चा,
देवदेव हा सगळा श्रद्धेचा अथवा आस्तिक नास्तिकतेचा विषय असला म्हणून सोडून देऊ पण.....वाचशुद्धी, भाषाशुद्धी, व्याकरण अभ्यास ,मनःशांती म्हणून वेदांमधील विविध अध्याय, मन्त्र अथवा स्तोत्र पाठ करण्यास फरक काय पडतो.
आज जर विचार केला तर सर्वज्ञात असणाऱ्या स्तोत्रांपैकी जवळजवळ
सगळीच म्हणायला हरकत नाही, ही सगळी स्तोत्र मनुष्याच्या जीवनपद्धतीवर , विचारसरणीवर, कर्मावर तसेच त्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवांवर तसेच निसर्गावर व निसर्गनिर्मित गोष्टींवर अवलंबून आहेत म्हणून ह्या स्तोत्रांपासून मिळणारा अर्थ अंगिकरण्यास काहीच हरकत नाही.
ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर रोज सकाळी खड्या आवाजात
ओं... हिरण्यवरणांम हरिणीं अथवा
सहस्त्रशीर्षा पुरुष:......
म्हणणाऱ्या मनुष्याला विचारा की हे सर्व म्हणून झाल्यावर शरीरा मध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते किंवा मोठया आवाजात मनाचे श्लोक,
भीमरूप, अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या बालकाला विचारा किंवा रोज संध्याकाळी न चुकता रामरक्षा म्हणून घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून टाकणाऱ्या आजोबांना विचारा. ह्या सर्व गोष्टींमधून निर्माण होणाऱ्या Spiritual Enviorment ची खरंच आजच्या Hard N Fast झालेल्या generation ला खूपच गरज आहे.
खरंतर ह्या सर्व गोष्टींचे संस्कार अथवा सवय ही लहानपणी नकळतपणे होत असे. आजीआजोबां कडून ह्या गोष्टी नातवंडकडे संक्रमित होत होत्या तसेच शाळांमध्ये देखील हे संस्कार होत होते मात्र आज बदललेल्या शिक्षणपद्धतीने ह्या सर्वगोष्टी इतक्या नकळतपणे बंद केल्या की त्यांना
सहजासहजी पुन्हा आणणे हे खूपच वेळखाऊ असणार आहे.त्यामुळे कृपया ह्या सर्व गोष्टींना कर्मकांड किंवा अंधश्रद्धा ह्या माध्यमातून न पाहता आपली पुढची पिढी खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची खूप गरज लागणार आहे.
कारण देशाच्या सीमा तलवारीने आखून देशाला सुरक्षित केले जाते मात्र देशाच्या वैचारिक प्रगतीसाठी व जडणघडणी साठी धर्माचे,राष्ट्रप्रेमाचे व मानवतेचे संस्कारच उपयोगी पडतात...
जय हिंदु संस्कार...
मंदार खळदकर गुरुजी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh