आई श्रीतुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही
कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून
येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही.
त्याचे कारण म्हणजे सेवा बजावण्याच्या मानपानातील असणारी गुंतागुंत.
तसे पाहिले तर देवाचा पलंग असो की पालखी या दोन्ही धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरातच कुठे तरी व्यवस्थितपणे सांभाळून
ठेवून पुन्हा त्याचा वापर केला जातो. याच्या उलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या सन्मानपूर्वक तोडून होमात टाकून जाळून टाकल्या जातात.
तसे पाहता श्रीतुळजाभवानीच्या सर्वच प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. कारण हिंदू धर्मात तुळजाभवानीच्या मूर्तीशिवाय इतर कुठलीही मूर्ती नसेल जी प्रत्यक्षपणे काढून मूळ मूर्तीलाच पालखीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. शिवाय वर्षातून तीन वेळा मूळ मूर्तीला
सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. तुळजाभवानीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूरमध्ये तेलाचा घाणा चालवायला पूर्वापार परवानगी नाही. मात्र याच तुळजाभवानीला लागणारा पलंग आणि पालखी घेऊन येण्याचा मान नगर जिल्ह्यातील तेल्याचा आहे.
आपण तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर उजव्या हाताला एका ओवरीत देवीचा पलंग दिसतो. त्या पलंगावर देवीची मूळ मूर्ती काढून भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा व पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत झोपविली जाते. याला देवीची ' घोर निद्रा,' '
श्रमनिद्रा ' व ' भोगनिद्रा ', म्हटले जाते.तत्पूर्वी सीमोल्लंघनासाठी हीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरविली जाते. विशेष म्हणजे पालखी सीमोल्लंघनानंतर लगेचच तोडून होमात टाकली जाते. तर दसऱ्यानंतरच्या पौर्णिमेदिवशी जुना पलंग होमात टाकून नवा पलंग ठेवला जातो. तुळजापुरातील
मराठा समाजातील एका घराण्याकडे या पलंगाची सेवा करण्याची परंपरा असल्याने त्याचे आडनाव 'पलंगे' पडले आहे. पलंग व पालखी या दोन्ही वस्तू देवीसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्या आणण्याचा मान हा अहमदनगरच्या तेली समाजाचा आहे. यातही पुन्हा वेगळेपण म्हणजे तेली मानकरी असले तरी त्या वस्तू
वेगवेगळ्या जागी तयार होउन कशाप्रकारे तुळजापूर पर्यंत पोचतात हा सर्व प्रवास अनोखा आहे. तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने अहमदनगर शहरातील तेली समाजातील पलंगे घराण्याला आहे. सध्या बाबूराव अंबादास पलंगे याचे मुख्य मानकरी असून नगर शहरातील तुळजाभवानी मंदिराचे ते पुजारी
आहेत. तुळजापूरप्रमाणे इथेही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. देवीचा पलंग तुळजापूरला घेऊन येण्याचा मान भलेही पलंगे घराण्याला असला तरी तो तयार करण्यासाठी राबणारे हात दुसरेच आहेत. प्रत्यक्षात देवीचा पलंग तयार करण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर घराणे परंपरेने
करते. श्रद्धापूर्वक पलंग तयार करून दिल्यानंतर पुन्हा ठाकूर यांचे काम संपले. बिचाऱ्यांना तुळजापुरात आल्यानंतर त्या पलंगापर्यंत जायचे म्हटले तर त्यांना परवानगी नाही. कारण पलंग तयार केल्यानंतर तो नगरच्या पलंगे नावाच्या तेली समाजातील मानकऱ्याच्या ताब्यात देतो. तेथून तो तुळजापूरच्या
दिशेने रवाना होतो. घोडेगावावरून वाजत-गाजत पलंगाचा प्रवास महिनाभर सुरू असतो. या दरम्यान तो जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेरमार्गे नगरपर्यंत प्रवास करत असतो. अगदी घटस्थापनेच्या दिवशी पलंग अहमदनगरमधील तुळजाभवानी मंदिरात
दाखल होतो. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तिसऱ्या माळेला तो नगरजवळील भिंगारच्या मंदिराकडे प्रस्थान करतो.
याचवेळी राहुरी येथे तयार झालेली देवीची पालखी भिंगारमध्ये दाखल होते. अतिशय नयनरम्य सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा
सोहळा संपन्न होतो. तेथून पुढे तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुंटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपीर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. अशारीतीने नगर, भिंगार, जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामार्गे दसऱ्याच्या आदल्यादिवशी तुळजापुरात दाखल होतो.
ज्याप्रमाणे तुळाजाभवानीची मूळ मूर्ती काढून पलंगावर झोपवली जाते त्याचप्रमाणे दरवर्षी सीमोल्लंघन खेळण्याकरिता मूर्तीला पालखीतून मुख्य मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढून मिरवले जाते. ही पालखी आणण्याचा मान अहमदनगर शहरालगत असणाऱ्या भिंगार ( बुऱ्हानगर ) गावातील भगत
नावाच्या एका तेली घराण्याकडे आहे. पलंगाप्रमाणे पालखी तयार करण्याची कथाही काही वेगळीच आहे. त्यानुसार तुळजाभवानीच्या दरबारात पालखी आणून ती मिरविण्याचा मान जरी भिंगारच्या तेली घराण्याला असला तरी प्रत्यक्षात वेगळ्या ठिकाणी तयार होते. पालखीच्या तयारीची कथाही फारच आगळी आहे.
फार पूर्वी तुळजाभवानीची पालखी नगरजवळील हिंगणगावला तयार व्हायची. पुढे अहिल्यादेवी होळकरांच्या घोगरे नावाच्या सरदारांनी पालखी तयार करण्याचा मान स्वत:कडे घेऊन आपले जहागिरीचे ठिकाण असणाऱ्या राहुरीत ती तयार करण्याची प्रथा सुरू केली. पालखीच्या तयारीतही फारच मानकरी आहेत.
त्यानुसार दरवर्षी भाद्रपद प्रतिपदेला पालखीसाठी लागणारे लाकूड राहुरीच्या म्हेत्रे म्हणजे माळी घराण्याकडून येते. कदमांकडून पालखीसाठीचे उभे लाकूड ज्याला शिपाई म्हटले जाते तेच फक्त देण्यात येते. पालखीच्या खालच्या बाजूला बोरीचे लाकूड तर इतर लाकूड पूर्णपणे सागवानाचे असते.
ते राहुरीतील पटेल सौमीलवाले द्यायला लागले. खांद्यासाठीचा मोठा दांडा असतो तो जुनाट वापरला जातो. पालखीचे लाकूड मिळाल्यानंतर ती तयार करण्याचा मान राहुरीतील कै. उमाकांत सुतारांच्या घराण्याला आहे.
या वेळी लाकडाची कतई करण्याचे काम धनगर समाजातील भांड घराणे करते. तर लोहाराचे रणसिंग
घराणे खिळेपट्टी करते. अशा रीतीने पालखी तयार झाली की तिची सुताराकडून विधिवत् पूजा करून तेली समाजातील धोत्रे घराणे पालखीला राहुरीतील तुळजाभवानी मंदिरात घेऊन जातात. या वेळी दिवे कुंभार पुरवितो तर तेली तेल देतो. खाली घोंगडी अंथरण्याचे काम धनगर करतो. राहुरीतील तुळजाभवानी मंदिराकरिता
धोंडी घोगरे यांनी स्वत:ची जागा दान केलेली आहे. देवीचे पूजारीपण धोत्रे नावाच्या तेल्याकडे आहे. भाद्रपद पौर्णिमेला पालखी नगरजवळील भिंगार गावाकडे रवाना होते. ती नदीपार करून देण्याचा मान कोळी समाजाला आहे. या वेळी ढोर आणि चांभार समाज मशाल धरतात. सुपा, पारनेर, हिंगणगाव, नगरमार्गे ४०
गावांतून तिसऱ्या माळेला पालखी भिंगारगावात दाखल होते.
त्या ठिकाणी घोडेगावावरून बनविण्यात आलेला पलंग दाखल होतो. घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी भिंगारमध्ये पलंग-पालखीची अभूतपूर्व भेट झाल्यानंतर ते दोघे तुळजापूरच्या दिशेने रवाना
होतात. जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, अपसिंगामार्गे सतत २४ तास पलंगाचा प्रवास पूर्ण होऊन दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी पलंग तुळजापुरात दाखल होतो. पूर्वी पालखीही याच पद्धतीने यायची, मात्र अलीकडे ती गाडीतून थेट दाखल होते. पलंग आणि पालखी टेकविण्याकरिता
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
घर म्हणजे चार भिंती नाही, ते असता निवारा आपुलकी जपणारा आपल्या सुख आणि दुःखच साक्षीदार पण काय होईल जेव्हा राहता घर बनेल मृत्यचा सापळा.
हिवाळ्याचे दिवस होते, खुप थंडी आणि धुकं पसरला होता. रात्रीचा वेळी थंडी अधिक जाणवत होती.त्या अंधाऱ्या रात्री मध्ये एका पुरुषाची किंकाळी घुमते. हॅलो समर्थ नगर पोलीस स्टेशन, सब इन्स्पेक्टर जगदाळे बोलतो आहे. काय? पत्ता सांगा ठीक आहे. तिकडे कोणी कशाला हात लावू नका. आम्ही पोचतोच
सांगून जगदाळे नि फोन ठेवला. जाधव गाडी काढा 03 खून झाले आहेत आपल्यला ताबडतोप तिकडे जायचा आहे. आपली टोपी आणि मोबाईल घेत जगदाळे बोले.जगदाळे अंतर कापत गावाबाहेर चा माळ जिकडे खुप लोकांची शेती आणि घरे होती तिकडे पोचले.
काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्यांशी सल्लामसलत करताहात. मला कायमची घालवण्याचे बेत रचताहात. तुमच्या चोरून चाललेल्या हालचाली मला समजत नाहीत असं
का वाटतं तुम्हाला?
पंचवीस - तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात? आपली ओळखदेख नव्हती. पण तुम्हाला नोकरी लागली. तुमच्या आईवडिलांनी तुमचे दोनाचे चार हात केले. संसार सुरु झाला. आणि अवघ्या दीड दोन वर्षात ती जादू झाली. कधीही कुठेही आपण फिरायला गेलो आणि तुमचे मित्र, नातलग भेटले की
आपल्याकडे निरखून बघत आणि कौतुकाने म्हणत, “बेट्या, लग्न मानवलं बरं का तुला.” तुम्ही देखील मनापासून हसून होकार द्यायचा.
तुम्हाला प्रमोशन मिळालं. तुम्ही सुटाबुटात फिरू लागला. तुमचे विविध रंगी नेकटाय खूप आवडायचे. तुमचं लक्ष नसताना त्या नेकटायचं टोक गालांवरून फिरवताना अगदी मोरपीस
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बरीच मंडळी पर्बोधनकार आजोबांच्या पोस्ट्स घेऊन आभाळ हेपलत आहेत अश्या समस्त मंडळींना उत्तर..
गणपती चौसष्ट कलांमध्ये निपुण आहे. या चौसष्ट कला कोणत्या ?
चौसष्ट कला पुढीलप्रमाणे.
१. पानक रस तथा रागासव योजना – मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
*2 सप्टेंबर* च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय *3 सप्टेंबर* ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत जन्म घेता घेता ऐन टाईमला
महाराष्ट्रातील *बारामती* येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच फोटो काढण्याचा ♀♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन सेल्फि काढणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेड वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या
तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे *बारामती* वर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ#जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे *श्री श्री श्री संकेत जगताप* यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम ,5 छोटा हत्ती
जर्मन फौजांनी एजियन समुद्राच्या तोंडावर, नेव्हरॉन बेटावर दोन अत्याधुनिक, अजस्त्र, महाकाय तोफा वसवल्या होत्या ज्या समोर येणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या प्रत्येक युद्धनौकेचा घास गिळत होत्या.
त्यातच जवळच्या बेटावर असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या २०००
सैन्यावर हल्ला करण्याचे जर्मन फौजांचे बेत सुरू होते. दोस्त राष्ट्रांच्या विमानदलाने ह्या घातकी तोफांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्यात हल्ला करणारी विमानेच गमावली.
अश्या बिकट परिस्थितीत जर त्या तोफा निकामी केल्या तर २००० सैनिकांना कुमक पोहोचवली जाईल आणि अशी परिस्थिती निर्माण
झाली आणि हाती होता जेमतेम आठवडा!
दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या काही कमांडोनाह्या तोफा निकामी करण्याची कामगिरी सोपवली. ह्या कमांडो गॅंग मध्ये मेजर रॉय( अँथनी क्वेल), कॅप्टन किथ( ग्रेगरी पेक), तूर्की आर्मीचा कर्नल आंद्रिया ( अँथनी क्वेन), स्फोटक तज्ञ कॉर्पोरेल मिलर( डेव्हिड निवेन),
रिमेकचं भूत
जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आमिर खानचा 'गजनी', सलमानचा 'वॉन्टेड' आणि अक्षय कुमारचा 'रावडी राठोड' आला होता. त्या काळात रिमेक म्हणजे काय हे कितीतरी लोकांच्या गावी नव्हतं. त्यामुळे सीन टू सीन कॉपी केलेला चित्रपट आम्ही
बघायचो आणि अचंबित व्हायचो. त्या चित्रपटांनी जवळपास 100 करोड गल्ला जमवला. ही झाली 2011-12 पर्यंतची गोष्ट. नंतरसुद्धा हॉलिडे सारखे चित्रपट रिमेक होऊन येतच होते. हिटसुद्धा व्हायचे.
गोष्ट अशी झाली,की त्यानंतर भारतात OTT ने जम बसवला. Youtube तर होतंच. डब मूवी च्या
नावाखाली जिथे सेट मॅक्स वर नागार्जुनचा 'मेरी जंग: One Man Army', 'Don No. 1' यासारखे मोजके चित्रपट बघायला मिळायचे, त्या जागी आता बरेच मूळ चित्रपट,मग ते दाक्षिणात्य असोत किंवा जगभरातील कोणतेही चित्रपट उपलब्ध होऊ लागले. माझ्या मते शेवटचा सुपरहिट ठरलेला रिमेक 'Simba' आहे.