#Statue_Of_Unity
७५००० क्युबिक मीटर काँक्रीट, १८००० मेट्रिक टन स्टील, ५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील, क्लॅडिंगसाठी २२५०० ब्राँझ शीट्स एवढं मटेरियल वापरून २४० मीटर उंच बेस स्ट्रक्चर असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातला सर्वात उंच पुतळा
गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर उभारण्यात आलाय आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी त्याचं लोकार्पण करीत आहेत.
यातील चीनच्या एका कंपनी कडून घेतलेले ब्राँझ शीट्स सोडले तर बाकी सर्व मटेरियल हे आपल्या भारत देशातच उत्पादन करून वापरण्यात आलंय.
१ क्युबिक मीटर काँक्रीट करण्यासाठी सरासरी ९ सिमेंट बॅग वापरल्या असं समजलं तर एकूण कामासाठी ६ लाख ७५ हजार सिमेंट बॅग वापरल्या आहेत, त्याचबरोबर १ क्युबिक मीटर काँक्रीट करायला सरासरी ०.७०० क्युबिक मीटर खडी आणि वाळू लागते म्हणजे साधारण पणे ५२५०० क्युबिक मीटर खडी
या कामात वापरण्यात आली आहे.
१८००० मेट्रिक टन रिबार्स वापरले आहेत. १ मेट्रिक टन स्टील बांधायला साधारणपणे ७ किलो बाइंडिंग वायर लागते म्हणजे जवळपास १ लाख २६ हजार किलो बाइंडिंग वायर या कामात वापरण्यात आली आहे.
५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील च्या प्रमाणात वेल्डिंग राॅड, कटिंग साठी गॅस वापरले आहेत.
म्हणजे बघा २०१४ ला सुरू झालेल्या या कामासाठी हे सर्व मटेरियल भारतात उत्पादित करून आज पर्यंत वापरलं आहे.
उत्पादनांच्या ठिकाणाहून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी त्याची वाहतूक करण्यात आली आहे.
हे उत्पादन करण्यासाठी आणि किती मनुष्य बळ लागले असेल याची कल्पना येवू शकते.
काम सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जवळ पास ३५०० लोक काम करीत होते.
भारतातील एक अग्रगण्य कन्स्ट्रक्शन कंपनी एल अँड टी ने हे सर्व काम पूर्ण केलं म्हणजे या कामामुळे
भारतातल्याच या ३५०० कामगारांशिवाय सर्व मटेरियल उत्पादन करणा-या कारखान्यातील हजारो कामगारांचे संसार यातून निश्चितच उभे राहिले आहेत.
हया प्रकल्पामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आता कायमचा रोजगार उपलब्ध होणार आहे. जगाच्या नकाशावर एक अग्रगण्य
पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर आता पुढे येणार आहे.
या प्रकरणी राजकारण करणारे हे विसरतात कीं या पुतळ्यामुळे लाखो लोकांचे संसार उभे राहतील.
मा. मोदींनी खरोखरच हा पुतळा उभा करून लाखो लोकांचे आशिर्वाद मिळवले आहेत हे निश्चित.
तसंही विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी लोकहिताची कामं करताना मोदीजी विरोधकांना धूप घालत नाहीत आणि तेही एक अक्षर न बोलता.
सारंग प. चपळगांवकर,
नवी मुंबई.