#अपेक्षित_दुर्दैव
... समीर वानखेडे... आर्यन खानच्या अटकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाव... समीर वानखेडे IRS अधिकारी आहेत... नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB चे क्षेत्रीय संचालक आहेत... आदरणीय नवाब मलिक साहेबांनी तर त्यांच्याविषयी आपल्याला इत्यंभूत माहिती दिलेली आहे... Image
त्याच्या खरे खोटेपणाची चर्चा करण्याची आवश्यकता नाही...
... मात्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री असलेले नवाब मलिक यांनी जेव्हा समीर वानखेडेंवर सोशल मीडिया व पत्रकार परिषदांमधून आरोप करायला सुरुवात केली तेव्हा... आपल्या बचावासाठी समीर वानखेडे यांनी देखील पत्रकार परिषदा आणि पत्रकारांची
औपचारिक बातचीत याचाच आधार घेतला...
... वास्तविकतः समीर वानखेडे हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या सेवेत आहेत... आणि NCB ही थेट गृह खात्याच्या अखत्यारीत येते म्हणजे... परोक्ष अपरोक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हेच त्यांचे निर्णायक सर्वेसर्वा ठरतात... अमित भाई म्हणजे ११० टक्के
विश्वास... मग समीर वानखेडे यांना आपला बचाव करण्यासाठी पत्रकार परिषदा अथवा पत्रकारांशी औपचारिक बातचीत करण्याची काय गरज होती?...
... नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकार मधील एक मंत्री आहेत... त्यांचा समीर वानखेडे यांच्या कार्य क्षेत्राशी दुरान्वयेही संबंध नाही... नवाब मलिक यांच्या
आरोपांना समीर वानखेडे यांनी उत्तर देण्याची काहीही गरज नव्हती... NCB चा एखादा वरिष्ठ अधिकारी किंवा प्रवक्ता त्याबाबतीत बोलला असता तर आपण समजू शकलो असतो... परंतु नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसल्यामुळे समीर वानखेडे यांनी आपल्याला आरोपी आणि नवाब मलिक यांना फिर्यादी,
फिर्यादीचे वकील आणि अघोषित न्यायाधीश हा दर्जा देऊन टाकला... शिवाय सगळे प्रकरण न्यायालयात होते... न्यायालयाच्या अधीन असलेल्या प्रकरणात मी काहीही बोलणार नाही असे म्हणून समीर वानखेडे यांनी बाजूला व्हायला हवे होते... त्यांची बचाव करण्याची कार्यपद्धती निदान माझ्यासाठी तरी अनाकलनीय
होती...
... जात आणि धर्माचा मुद्दा निघाला तेव्हा तर समीर वानखेडे यांची धावपळ प्रश्नचिन्ह उभी करणारी होती... वानखेडे कुटुंबीयांचे सोशल मीडियावर चे फोटो टाकून नवाब मलिक त्यांना कोंडीत पकडून बघत होते... नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या जातीविषयक आरोपावरून समीर वानखेडे
केंद्रिय मागास वर्ग आयोगाला दिल्लीत जाऊन भेटले... कशासाठी? या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर "अनाकलनीय" असंच देता येईल... जी काही जात पडताळणी ची अधिकृत छाननी करायची असेल आणि निर्णय घ्यायचा असेल त्यासाठी NCB चे दक्षता (व्हिजिलन्स) खाते समर्थ होते... या एकाच मुद्द्यावर
... नवाब मलिक यांच्या आरोपात तथ्य आढळल्यास... समीर वानखेडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते...
... बाकी लाचखोरी पासून... समीर वानखेडे यांच्या बुटाच्या किमती पर्यंतचे सर्व आरोप हे व्हाणेची किंमत देण्याच्याही लायकीचे नव्हते... मात्र आपल्या पॅन्ट ची किंमत नवाब मलिक एक लाख रुपये
सांगतात ती कुठल्यातरी लोखंडवाला मार्केटमध्ये अतिशय स्वस्तात मिळते असा खुलासा समीर वानखेडे यांनी केला... कशासाठी?... समीर वानखेडे काय खुलासा करत आहेत याच्यापेक्षा ते का करताहेत हा माझ्यासाठी आजही एक गहन प्रश्न आहे... आपल्या जावयाच्या अटकेने आणि आठ महिन्यांचा कारावासाने पिसाळलेले
नवाब मलिक आर्यन खान च्या आडून समीर वानखेडेवर वार करत होते... मात्र त्याच्यावर सफाई देता देता समीर वानखेडे आपल्याच विश्वासार्हतेवर रोज नवीन प्रश्नचिन्ह लावत होते... कशासाठी?... एका केंद्रीय तपास यंत्रणेतील क्षेत्रीय संचालक पदावर असलेल्या अधिकाऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मंत्री कोण
लागून गेला?... अमित भाई शहांनी बघून घेतलं असतं ना...
... समीर वानखेडे यांच्या खुलाशामुळे नवाब मलिकांना अधिकच चेव चढत गेला... मूळ केस आणि तपास राहिला बाजूला आणि नको त्या गोष्टीनी या सगळ्या प्रकरणाला रंग चढला... समीर वानखेडे यांसाठी लावलेला तो एक सापळा होता आणि त्यात समीर वानखेडे
अलगद अडकले...
... भाजपचे नेते एडवोकेट आशिष शेलार यांनी अचूक आणि मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली... समीर वानखेडे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे हे भाजपचे काम नाही... समीर वानखेडे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्याचे काम NCB आणि गृह खात्याचे आहे... केवळ तेच प्रमाणपत्र अधिकृत
आहे... कोणत्याही राजकीय सामाजिक अथवा प्रतिष्ठानाचे हे काम नाही... त्याला कवडी ची किंमत देखील नाही...
... आपल्या पुराव्या बद्दल एवढीच खात्री असेल तर नवाब मलिक यांनी सरळ न्यायालयात जावे... न्यायव्यवस्थेच्या वर तर केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा नाहीत... न्यायालयात दूध का दूध पानी का
पानी होईल... न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल... न्यायालयाकडून मिळालेले प्रशस्तीपत्र हे समीर वानखेडे यांच्या शिरपेचात ला सर्वोत्कृष्ट मानाचा तुरा असेल... अथवा त्यांच्याकडून झालेल्या नियम भंगा बद्दल त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षाही मिळू शकते...
... समीर वानखेडे कडून आर्यन खान
प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे की नाही हा मुद्दा दुय्यम आहे... घेतला असेल तर कदाचित येणारा नवीन अधिकारी हा समीर वानखेडे परवडले पण संजय सिंग नकोत असाही असू शकेल... आणि जर तपास काढून घेतला नसेल तर नवाब मलिक नव्या जोमाने नव्या आरोपांचा सह सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत गरळ ओकायला
सुरुवात करतील... पुन्हा त्याच्यावर खुलासे देता-देता समीर वानखेडे एका नव्या सापळ्यात अडकतील...
... सामान्य माणसाला या प्रकरणाचा निर्णायक निकाल लागलेला बघायची उत्कंठा आहे... मग तो समीर वानखेडेनी लावो अथवा संजय सिंग यांनी...
... प्राप्त परिस्थितीत समीर वानखेडे यांच्या हातात हा
तपास राहिला नसावा असा माझा वैयक्तिक कयास आहे... मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आहेत... दोघे निकाल तर लावणारच...
...
...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Surya🇮🇳🚩

Surya🇮🇳🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Surya_20111988

7 Nov
ज्या मुंबई बॉम्ब स्फोटात तीनशेहून अधिक माणसे मारली गेली आणि हजारो लोक कायमचे अपंग झाले या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या अतिरेक्यांचा वकील माजीद मेमन याला पवार साहेबांनी तीन वेळा राज्यसभेचे खासदारकी दिली. स्टॅम्प घोटाळा करणारा अब्दुल करिम तेलगी हाही दाऊदचा निकटवर्ती. त्यानेही
नार्को टेस्ट मध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांची नावे घेतली होती. अनेक बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी अबू जिंदाल याला राष्टावादीच्या मोहसिना खान यांनी आमदार निवासात लपवले. त्याच बाईना शरद पवारांनी राज्यसभेवर पाठवले. दाऊद याने पवार साहेबांना हिंदू धर्म फोडण्यासाठी ब्राह्मणांना अलग
पाडा, बदनाम करा आणि मराठा आणि ब्राह्मण यांच्यात जास्तीत जास्त कटुता निर्माण करा असा आदेश दिला. त्यासाठी घसघशीत रक्कमही दिली मग पवार साहेबांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, पुरुषोत्तम खेडेकर यांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचे
Read 11 tweets
5 Nov
या दोन ओळीतच “दुध का दुध” अन “पानी का पानी” होते. 👇🏻👇🏻👇🏻
आजपर्यंत केंद्र सरकारला दुषणं देऊन देऊन थकलेले नालायक राज्य सरकार केंद्राने व्यवस्थित एक्सपोज केलेय. ताकाला जाऊन भांडे लपवता येत नाहीय यांना आता. हे म्हणजे बापाला भिक मागायला बदनाम करून पोरगा गावभर गाड्या उडवत उंडरणार असे Image
झाले. पण बाप बाप होता है. मागे पेट्रोल डिझेल जिएसटीच्या कक्षेत आणायचा विषय निघाला होता तेव्हाच हे अर्धे एक्सपोज झाले होते. आता केंद्राने संपुर्ण नागडे केलेय. परंतु “शेतीसाठी डिझेलवर सबसिडी द्या” असे म्हणणारे यांचे जातसमर्थक शेतकरी देखील आता “विकास कामाला पैसा लागतो” असे म्हणत
भक्तांच्या पंक्तीत येऊन बसलेत. इंधनावरील करामध्ये राज्याचा एकुण वाटा ६४% असतो. तरीही यांची जी बोंब चालु होती ती उघडी पाडतांना केंद्राने यांची अवस्था “ आई जेऊ घालीना, बाप भिक मागु देईना” अशी करून ठेवलीय. यांचे निर्लज्ज जातसमर्थक आता काय काय समर्थन करतील ते पाहणे मात्र मनोरंजनाचे .
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(