@Nilesh_P_Z @Chav0_
@bhiku_07 @hemant_mahakal
@Leo07_07_07_07 @BrotherToGod @NmNSpeaksXOXOXO
@SavgaonkarPatil @jivikau

चाळीतली दिवाळी (आठवणीतली)🪔🎉*

वयाची बरीच वर्ष चाळीतच गेली. आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद!
असो ... तर, चाळीची मज्जाच और होती. एका मजल्यावर १४ खोल्या, दोन मजल्यांची चाळ. समोरासमोर ७ खोल्या, पुढे गॅलरी, मध्ये (open common) पॅसेज. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा-बारा वाजताच बंद व्हायचे.
कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. इतर जाती-धर्माची कुटुंब असूनही शाकाहारी-मासाहारी असा भेदभाव नव्हता. घरातील पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटुंब!
चाळीत सर्व सण अगदी धूमधडाक्यात साजरे व्हायचे. आणि दिवाळी म्हणजे तर आठ दिवस अक्षरशः चंगळजत्रा असायची.

शाळेची सहामाही परीक्षा संपलेली असायची. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच आईची वेगवेगळी पिठे, मसाले, रवा, मैदा, तेल, तूप, डालडा इत्यादी पदार्थांबरोबर घनघोर लढाई चालू असायची.
बेसन, रवा, मैदा निवडणे चाळणे, अशी काम चालू व्हायची. इतर घरातून मुली-बायका येऊन करंज्या लाटायच्या. शंकरपाळ्या कापून भाजून देणे. बेसनचे, रव्याचे लाडू वळून देणे.साच्यातून शेव, चकल्या काढणे,भाजणे वगैरे सर्व प्रकार दुपारच्या जेवणानंतर चालू व्हायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत चालू असायचे.
प्रत्येकाच्या घरात आलटून-पालटून हाच कार्यक्रम असायचा. सर्वांच्या घरात दणकावून दिवाळीचे पदार्थ बनवले जायचे. या सर्व पदार्थांना कोकण, पुणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, गुजराती अशा वेगवेगळ्या चवी असायच्या. प्रत्येक घरातले पदार्थ चवीला वेगवेगळे व रुचकर लागायचे.
तोपर्यंत पुरुष मंडळी घराला रंग काढणे, कंदील बनवणे, कंदील लावणे, तोरणे लावणे अशा कामांना हातभार लावायचे. त्याच दरम्यान नवीन कपडे, रांगोळी, उटणे, कारेटी वगैरे घरात यायची. आणि मग आतुरता असायची दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाची ...
दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात आधी उठून चाळीच्या खाली येऊन कोण फटाके लावतो ह्याची स्पर्धा असायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी पहाटे तीन-चार वाजताच कोणीतरी रशीबार पेटवायचं. त्यावेळी चौकोनी खोक्यातला कॅप्टन नावाचा मोठा बार आणि हिरव्या सुतळीचा रशीबार मिळायचा.
#धड्डड्डम्म्म्म् करून मोठा आवाज व्हायचा आणि आमची चाळ अर्धवट झोपेतून जागी व्हायची. या फटाक्यांच्या आवाजाच्या आधीच आमच्या मातोश्री उठलेल्या असायच्या. मग आमची लगबग चालू व्हायची. घाई असायची खाली जाऊन इतर मुलांबरोबर फटाके उडवण्याची. आईने उटणे तयार करून मोरी मध्ये ठेवलेलं असायचं ...
पटापट दात घासायचे आणि आंघोळ करायची यासाठी घाई गडबड व्हायची. मोती साबण वगैरे असली थेरं त्यावेळी नव्हती. आधी अंगाला उटणं लावायच, मग साबण लावून, भसाभसा अंगावर पाणी ओतून घ्यायचो. की झाली आमची पहिली आंघोळ. दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या बाजूला कारेटं चिरडलं की दिवाळीला सुरुवात व्हायची.
पुन्हा घरात येऊन फटाके निवडणे, मोठ्या माळा सोडवणं असा प्रकार असायचा. लवंगी, लाल फटाकडीची माळ सोडून एक एक लवंगी, लाल फटाकडी वेगळी करायची. लक्ष्मी बारचं पाकीट सोडून पाच लक्ष्मी बार वेगवेगळे करायचे आणि मग हे सर्व फटाके, एक माचीस आणि एक-दोन उदबत्या घेऊन चाळीच्या खाली यायचं.
गॅलरीतून डोकावून एक-दुसऱ्याला पाहून भरभर सर्व मुलं आपापले फटाके घेऊन चाळीच्या खाली यायचे. आणि मग दीड-दोन तास अखंड फटाक्यांचा कडकडाट चालू राहायचा. मध्येच कोणीतरी कानाचे पडदे हलवणारा रशीबार लावायचा. तोपर्यंत लख्खं उजाडलेला असायचं. हाताला फटाक्यांच्या पावडरचा चंदेरी चढलेला असायचा.
मग पुन्हा घरात येऊन, हात पाय धुवायचे आणि फराळ करायला बसायचं. सकाळी साधारण नऊ दहा वाजता संपूर्ण चाळ लखलखीत सजलेली असायची. सर्वांच्या दरवाजात मुली आणि बायका रांगोळी घालत असायच्या. लाडू, करंजी, शंकरपाळे, शेव, चिवडा, अनारसे यांनी भरलेली ताटं या घरातून त्या घरात पोचती केली जायची.
संध्याकाळ होताच कंदील, दिवे, आणि रंगीबेरंगी तोरणांनी आमची चाळ उजळून निघायची. एखाद दुसरा कंदील वेगळा असायचा, नाही तर आमच्या चाळीमध्ये एकाच प्रकारचे कंदील आणले जायचे. दिवाळीच्या दिवसात आमच्या चाळीतील दिव्यांचा लखलखाट मन वेधून घेतो. इतकं सुंदर दिवाळीच दृश्य असायचं आमच्या चाळीचं!
सायंकाळी गॅलरीमध्ये पुन्हा मुली आणि बायका नव्याने रांगोळी काढायला बसायच्या. विविधरंगी दिव्यांनी आणि कंदिलांंच्या उजेडात आमची गॅलरी आणि संपूर्ण चाळ उजळून निघालेली असायची. अंधार पडल्यानंतर पुन्हा एकदा चाळीच्या खाली आमच्या मुलांत फटाके उडवण्याची स्पर्धा लागायची.
अभ्यंगस्नान, पहिली आंघोळ, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज या सर्व दिवसात, दिवसभराचा कमी-अधिक प्रमाणात हाच कार्यक्रम असायचा. आमच्या घरात पाहुण्या-रावळ्यांची अखंड ये-जा असायची. आमच्या संपूर्ण परिसरात, सर्वच चाळींमध्ये अशीच दणदणीत दिवाळी साजरी व्हायची.
प्रत्येकाच्या घरातून दिवाळीचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असायचा. दिवाळीचा हा आनंद आठ-दहा दिवस अखंड ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लखलखत असायचा. दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती या आमच्या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची.
घरात वडील एकटे कमावणारे होते. विशेष म्हणजे त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्यावेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा. आजही आम्ही चाळीतील दिवाळीच्या आठवणीत सहज रममाण होतो. कारण ...
... आता आमच्या दिवाळीच्या आनंदाला ती अज्ञानाची आणि निरागसतेची सोनेरी किनार नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यासाठी जो बाळबोध मेंदू लागतो तो आता दुनियादारी मुळे बधीर झाला आहे. फटाक्यांच्या मोठाल्या आवाजामुळे आता कानाला त्रास होतो.
आता लहान कुटुंबात दोघेजण कमावणारे असून देखील दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी आता वेळही नाही आणि खाण्याची फारशी इच्छाही नाही. मुख्य म्हणजे आईच्या हाताची चव नाही. नवीन कपड्यांचं अप्रूप राहिलं नाहीये. आता फक्त मला दिवाळीतील दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट आवडतो.
बंदिस्त फ्लॅटमध्ये बसून डोक्यात वेगवेगळे विचार येत राहतात आणि मग हमखास आठवते ती आम्ही लहानपणी साजरी केलेली चाळीतली दिवाळी.

अक्षरश: दिवाळीचे दिवस होते ते ...
आता उरल्यात फक्त आठवणी ...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajan Shridhar Mhapsekar

Rajan Shridhar Mhapsekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(