ओंकार Profile picture
Nov 10, 2021 50 tweets 19 min read Read on X
#मासळी #धागा
माशांची नावे सांगणारा एखादा धागा लिहावा असे वाटले, म्हणून हा प्रयास करीत आहे.

मुख्यतः समुद्री माशांची नोंद घेतलेली आहे.

१) तेली बांगडा (Indian Mackerel): चवीला उग्र असतो पण कोकणी वाटणात उत्तम बनतो. या माश्याला खोबरे,तिखट,तेल आणि आंबसूल(कोकम) लागते मगच चव भारी येते ImageImage
२) काठी बांगडा (Horse Mackerel): हा तेली बांगडयांपेक्षा आकाराने किंचित मोठा आणि चंदेरी असतो. तेली बांगड्यात असलेली पिवळी छटा याला नसते. हा चवीला कमी उग्र असतो ImageImage
३) जिताडा मासा (Barramundi fish ): हा काहीसा महाग मिळणारा पण मोठ्या प्रमाणात पसंत केला जाणारा मासा आहे. याची मत्स्यशेती देखील केली जाते. हा मासा मोठ्या आकारातही सापडतो. ImageImage
४) पापलेट (Pomfret): विपुल प्रमाणात खाल्ला जाणारा मासा. पापलेट हे मत्स्यशेतीमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेत आणि त्यांची रया गेली आहे. सागरी पापलेटांना शेतीतल्या पापलेटपेक्षा तुलनेत जास्त चव असते. Image
५) खापरी पापलेट : या पाप्लेटावर एक काळी काया असते. साध्या पापलेटपेक्षा हे चावीला अधिक चांगले समजले जातात. यांना Chinese Pomfret असेही म्हणतात. ImageImage
६) हलवा / सरंगा मासा (Black Pomfret): नावाप्रमाणे हे काळे पापलेट आहे. याची चव आणि गंध उग्र असतो. पापलेट पेक्षा अंगात अधिक तेल असल्याने चवीला राकट असतो. लहान-मोठ्या आकारात विकायला असतात. किंमत आकारावरून ठरते. ImageImageImage
७) सौदाळी (ButterFish) : हा काहीसा आकाराने पापलेट सारखाच असतो पण ही वेगळी प्रजाती आहे. ImageImage
८) मोरी / मुशी मासा (Spadenose shark): हे लहान आकाराचे शार्क मासे असतात. यांच्या मध्यभागी एक काटा असल्यानी खायला सोपे असतात. सांधेदुखी बरी करण्यासाठी चांगले मानले जातात. ImageImage
९) बोंबील (Bombay Duck) : हे मासे मुंबई नजीक मुबलक मिळतात म्हणून याला Bombay Duck म्हणतात. तळुन यापेक्षा कोणताही मासा उत्तम लागणे अशक्यप्राय. जनतेचे आवडीचे खाणे. ImageImage
१०) कुपा मासा (Yellow Fin Tuna): हा बऱ्याच लोकांचा आवडता मासा आहे. Tuna Fish प्रकारातला मासा असून ते मोठ्या आकारात सापडतात. मास किलोवर कापून विकले जाते. ImageImage
११) तिसऱ्या (Clams) : हे शिंपल्यातील जलचर, सार करून खाल्ले जातात. शिंपल्याच्या आतील मांस खाल्ले जाते. Image
१२) वाम मासा (Monster Eel): मोठ्या आकाराचा असून किलोवर विकले जातात . Image
१३) शिंगाडा / शिंगाळा मासा (Catfish) : मोठ्या आकाराचा असून किलोवर विकले जातात. खाऱ्या / सुकवलेल्या शिंगाड्याना शेंगटा म्हणतात. Image
१४) सकला / सकळा मासा: Image
१५) ढोमा मासा (Dhoma Fish): हे लहान आकाराचे मासे असून. यांना गंध असतो. Image
१६) तांबी मासा (Finned Bulleye Fish): हे लहान आकाराचे मासे असून, मुबलक प्रमाणात खाल्ले जातात. ImageImage
१७) राणी मासा (Japanese Threadfin Bream) : हे लहान आकाराचे मासे असून, मुबलक प्रमाणात खाल्ले जातात. ImageImage
१८) टोळ / टोकेरी मासा (Garfish/Needle Fish) : हे टोक असलेले लांब मासे असतात. चवीला छान लागतात. ImageImage
१९) पाला मासा (Hilsa fish) : हिल्सा माशाला मराठीत पाला मासा म्हणतात. Image
२०) ताड मासा (Indian Sailfish): टोक असलेले हे मासे, मोठ्या आकाराचे पकडून किलोवर विकले जातात. Image
२१) तारली मासा (Indian Oil Saradine): नावात सांगितले आहे तसे माशात भरपुर तेल असते. सोबत मुबलक काटे असतात आणि त्या सोबत मुबलक चवही असते. कालवण चांगले होते. मासे स्वस्त असतात आणि चकचकीत व आकर्षक असतात. या माशांना बराच तीव्र गंध असतो त्यामुळे ते गृहीत धरुन आणावेत. Image
२२) मूडशी मासा (Lady Fish): हे लहान आकाराचे मासे असून, मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. Image
२३) माकूळ (Squid) : माकूळ हा एक जलचर असून. त्याचे गोलाकार काप करून सार किंवा फ्राय बनवले जाते. Image
२४) तामोशी (Mangrove Red Snapper Fish) : हे लालसर आणि मध्यम आकाराचे मासे असून, मुबलक प्रमाणात खाल्ले जातात. Image
२५) सुरमई (Seer Fish) : इंग्रजीत King Mackerel म्हणतात. यांची चव उच्चकोटीची असते. दर्प कमी असतो. किलोला किमान ८०० रुपये या भावाने ते विकले जातात. बाजारात मोठे मासे आणतात (४-६ फूट) आणि तुकडे करुन विकतात. Image
२६) भिंग मासा (Herring Giant) : हा एक मध्यम आकाराचा चविष्ट मासा आहे. Image
२७) घोळ मासा (JewFish) : घोळ मासे महाग आणि चवीला अप्रतिम असतात. Image
२८) कालवं (Oysters): हे एक खडकाला चिकटलेले जलचर असून त्याच्या आतील मांसल भाग खाल्ला जातो. Image
२९) करली मासा (Silver Bar Fish / Belt Fish) : हा मासा चपटा व लांब असतो यालाही भरपुर काटे व भरपुर चव असते. Image
३०) कोलंबी आणि झिंगे: कालवणासाठी आणतो. आंबसूल टाकून सार बनवले की हवा तेवढा भात खाता येतो (कोकणात: वरपता येतो). कोळंबी आणि झिंगे वेगवेगळे असतात. Image
३१) मांदेली (Golden Anchovy): मस्त तळून खाल्ला जाणारा हा मासा म्हणजे पर्वणीच. मोठ्या प्रमाणात सर्व स्थरावरील लोक घेतात. ImageImage
३२) रावस मासा (Indian Salmon): तळून, तिखट करून किंवा सार करून मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा मासा. रावस हे लहान आणि मोठ्या आकाराचे सापडतात. मोठे रावस किलोवर विकले जातात. खवलेदार आणि चवीला अतिउत्तम असणारा मासा म्हणजे रावस. Image
३३) हेकरू मासा (Reef Cod Fish): लहान-मध्यम आकाराचा मासा. ImageImage
३४) भाकस मासा (Indian Halibut Fish): मध्यम आकाराचा मासा. Image
३५) चोर बोंबील मासा (Greater Lizard Fish): लहान-मध्यम आकाराचा मासा. भरपूर खवले आणि चिकचिकीत मांसल असा मासा. Image
३६) कोंकर मासा (Longfin trevally): या माशाचे इतर काही नाव असल्यास कळवावे. लहान-मध्यम-मोठ्या सर्व आकारात सापडतो. बऱ्याचदा खापरी पापलेट सांगून हे विकायचा प्रयत्न होतो. चमकणारी कांती आणि पातळ असा मासा. ImageImage
३७) चांद मासा: इंग्रजीत बहुतेक Moonfish म्हणतात. मध्यम-मोठ्या आकाराचा मासा. सहसा बाजारात दिसत नाही. ImageImage
३८) काळुंदर मासा (Pearl Spot Fish): लहान ते मोठ्या आकारात सापडतो. मध्यम ते मोठ्या आकारात शक्यतो खाल्ला जातो. ImageImage
३९) वाकटी / वापटी / बले मासा (Ribbon Fish): हे पातळ माझे रिबिनी सारखे लांब असतात. खारवलेले मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. खारवलेल्या माश्याचा फोटो देखील जोडत आहे. ImageImage
४०) मोदकं मासा (Whiting Fish): हे लहान आकाराचे मासे आवडीने खाल्ले जातात. खारवलेले मासे देखील मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. ImageImage
४१) तार मासा (Sword Fish): पुढे टोक असलेले हे मासे मोठ्या आकारात पकडले जातात. SwordFish अणि SailFish (ताड मासा) यात फरक आहे. ImageImage
४२) पाकट मासा (Stringray): हा एक सागरी जलचर आहे. याला बनवण्याची पद्धती निराळी आहे. Image
४३) तारा मासा (Star Fish) Image
४४) लेप मासा (Sole Fish): हा एक वेगळा दिसणारा मासा आहे. लहान आकारात सापडतो. ImageImage
४५) Lobsters ला मराठीत शेवंड म्हणतात. ImageImage
Stingray ला वाघोळे किंवा वाघोळी पण म्हणतात.
४६) Mussels ना कोंकणी (गोवा) भाषेत शिण्याणो म्हणतात. कोकणात कालवे म्हणतानाच ऐकले आहे . Image
४७) Crab म्हणजे खेकडे. कोकणात यांना कुर्ली किंवा चिंबोरी पण म्हणतात. Image
४८) नारबा मासा (Giant Trevally) ; अंगापिंडाने मजबूत आणि घट्ट असा हा मासा मध्यम आकारात सापडतो. Image
४९) हळद्या नारबा (Yellow Spotted Giant Trevally): नारबा माशाचा हा पिवळ्या रंगाचा प्रकार आहे. ImageImage

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ओंकार

ओंकार Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Rokhthok_Onkar

Sep 25, 2021
E-SIM काय असते?

SIM म्हणजे Subscriber Identification Module.ही चिप आपला नेटवर्क प्रोव्हाडयर आपणास देतो जी मोबाईल मध्ये समाविष्ट केल्यानंतर आपण त्यांच्या नेटवर्कशी संलग्न होऊ शकतो व त्याच्या सुविधा वापरू शकतो.

सध्या ४ प्रकारचे Sim उपलब्ध आहेत
1.Normal
2.Micro
3.Nano
4.E-Sim

१/७
E-Sim ही एक सिलिकॅान चिप असते जी सध्याच्या नॅनो सिम पेक्षा दसपटीने लहान असून, ती मोबईल उत्पादक मदरबोर्डवर जोडून देतो.

आकाराने कमालीने लहान असलेली ही चिप अत्याधिक सुरक्षा व कार्यक्षमता पुरवते.

E-Sim हे Operating System च्या सुरक्षेत कटिबद्ध असते.

२/७
E-Sim हे सुक्ष्म आणि मदरबोर्डसोबत जोडलेले येत असल्याने ते बऱ्याच डिव्हाईस मध्ये सहज पुरवता येते. जसे की,
१.मोबाईल फोन
२.स्मार्ट वॅाचेस
३.लॅपटॅाप
४.GPS
५.कार
६.स्मार्ट मीटर
Read 7 tweets
Sep 20, 2021
IP Rating म्हणजे काय?

हल्ली मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना IP प्रमाणपत्र पुरवले जाते.

IP म्हणजे Ingress Protection म्हणजे बाहेरून आत येणाऱ्या कणांविरूद्ध सुरक्षा.

फोनची IP rating ही वापरानुसार कमी होत जाते. आज आपण त्याविषयीची अधिक माहिती घेऊया १/५
IP67 या प्रमाणपत्रात 6 अंक हा सॅालिड प्रोटेक्शन (स्थायू कणांविरूद्ध सुरक्षा) आणि 7 अंक हा लिक्विड प्रोटेक्शन (द्रव सुरक्षा) दर्शवतो.

धुळ व माती वगैरे कणांविरूद्ध सॅालिड प्रोटेक्शन मोजण्यात येते. ही गुणवत्ता 1 ते 6 च्या श्रेणीत मोजण्यात येते. इथे 6 ही सर्वोच्च गुणवत्ता आहे. २/५
द्रव/लिक्विड प्रोटेक्शन हे पाणी किंवा इतर द्रवांविरूद्ध सुरक्षा दर्शवते. इथे श्रेणी ही 1-8 अशी आहे. 8 अंक म्हणजे कमाल सुरक्षा आणि 1 म्हणजे किमान सुरक्षा.

7 रेटिंगचे फोन हे १ मीटरपेक्षा कमी खोल पाण्यात ३० मिनिट तग धरू शकतात व 8 रेटिंगचे फोन ३० मिनिटाहून अधिक काळ तग धरू शकतात. ३/५
Read 5 tweets
Jul 3, 2021
फणसपुराण

फणसावर काहीतरी लिहावे असे बरेच दिवसांपासून मनात होते म्हणून हा प्रयास

आंबा व फणस ही कोकणातील मुख्य खाण्याची फळे.भारतात पुराव्याने फणस हा ६व्या शतकापासून आहे

फणस म्हंटले की मला आठवते ते लांबच्या वाडीतुन डोक्यावर फणस घेऊन आलेले तात्या.त्यांनी दारात येऊन फणस ठेवावा

१/१७
आणि ठेवणीतली साद द्यावी "वैनीनू फणस आणलाय लेकरांसाठी, वाईस पाणी देवा".

फणसाच्या प्रत्येक भागास विशिष्ठ नावे आहेत,माहितीसोबत फणसाचे भाग खालील चित्रात अधोरेखित करत आहे.

१)जो गर खाल्ला जातो ते गरे
२)बियांना आठळ्या म्हणतात
३)गऱ्यांच्या आजूबाजूच्या तंतूंना चिवर/पाती म्हणतात

२/१७
४)बाहेरच्या काटेरी सालास चारखांड म्हंटले जाते
५)मधला जो दांडा असतो त्याला पाव म्हणतात
६)फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गऱ्याला टेंबळी म्हणतात.
७)छोट्या कच्च्या फणसाला कुयरी म्हणतात.

३/१७
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(