#मासळी #धागा
माशांची नावे सांगणारा एखादा धागा लिहावा असे वाटले, म्हणून हा प्रयास करीत आहे.
मुख्यतः समुद्री माशांची नोंद घेतलेली आहे.
१) तेली बांगडा (Indian Mackerel): चवीला उग्र असतो पण कोकणी वाटणात उत्तम बनतो. या माश्याला खोबरे,तिखट,तेल आणि आंबसूल(कोकम) लागते मगच चव भारी येते
२) काठी बांगडा (Horse Mackerel): हा तेली बांगडयांपेक्षा आकाराने किंचित मोठा आणि चंदेरी असतो. तेली बांगड्यात असलेली पिवळी छटा याला नसते. हा चवीला कमी उग्र असतो
३) जिताडा मासा (Barramundi fish ): हा काहीसा महाग मिळणारा पण मोठ्या प्रमाणात पसंत केला जाणारा मासा आहे. याची मत्स्यशेती देखील केली जाते. हा मासा मोठ्या आकारातही सापडतो.
४) पापलेट (Pomfret): विपुल प्रमाणात खाल्ला जाणारा मासा. पापलेट हे मत्स्यशेतीमुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेत आणि त्यांची रया गेली आहे. सागरी पापलेटांना शेतीतल्या पापलेटपेक्षा तुलनेत जास्त चव असते.
५) खापरी पापलेट : या पाप्लेटावर एक काळी काया असते. साध्या पापलेटपेक्षा हे चावीला अधिक चांगले समजले जातात. यांना Chinese Pomfret असेही म्हणतात.
६) हलवा / सरंगा मासा (Black Pomfret): नावाप्रमाणे हे काळे पापलेट आहे. याची चव आणि गंध उग्र असतो. पापलेट पेक्षा अंगात अधिक तेल असल्याने चवीला राकट असतो. लहान-मोठ्या आकारात विकायला असतात. किंमत आकारावरून ठरते.
७) सौदाळी (ButterFish) : हा काहीसा आकाराने पापलेट सारखाच असतो पण ही वेगळी प्रजाती आहे.
८) मोरी / मुशी मासा (Spadenose shark): हे लहान आकाराचे शार्क मासे असतात. यांच्या मध्यभागी एक काटा असल्यानी खायला सोपे असतात. सांधेदुखी बरी करण्यासाठी चांगले मानले जातात.
९) बोंबील (Bombay Duck) : हे मासे मुंबई नजीक मुबलक मिळतात म्हणून याला Bombay Duck म्हणतात. तळुन यापेक्षा कोणताही मासा उत्तम लागणे अशक्यप्राय. जनतेचे आवडीचे खाणे.
१०) कुपा मासा (Yellow Fin Tuna): हा बऱ्याच लोकांचा आवडता मासा आहे. Tuna Fish प्रकारातला मासा असून ते मोठ्या आकारात सापडतात. मास किलोवर कापून विकले जाते.
११) तिसऱ्या (Clams) : हे शिंपल्यातील जलचर, सार करून खाल्ले जातात. शिंपल्याच्या आतील मांस खाल्ले जाते.
१२) वाम मासा (Monster Eel): मोठ्या आकाराचा असून किलोवर विकले जातात .
१३) शिंगाडा / शिंगाळा मासा (Catfish) : मोठ्या आकाराचा असून किलोवर विकले जातात. खाऱ्या / सुकवलेल्या शिंगाड्याना शेंगटा म्हणतात.
१४) सकला / सकळा मासा:
१५) ढोमा मासा (Dhoma Fish): हे लहान आकाराचे मासे असून. यांना गंध असतो.
१६) तांबी मासा (Finned Bulleye Fish): हे लहान आकाराचे मासे असून, मुबलक प्रमाणात खाल्ले जातात.
१७) राणी मासा (Japanese Threadfin Bream) : हे लहान आकाराचे मासे असून, मुबलक प्रमाणात खाल्ले जातात.
१८) टोळ / टोकेरी मासा (Garfish/Needle Fish) : हे टोक असलेले लांब मासे असतात. चवीला छान लागतात.
१९) पाला मासा (Hilsa fish) : हिल्सा माशाला मराठीत पाला मासा म्हणतात.
२०) ताड मासा (Indian Sailfish): टोक असलेले हे मासे, मोठ्या आकाराचे पकडून किलोवर विकले जातात.
२१) तारली मासा (Indian Oil Saradine): नावात सांगितले आहे तसे माशात भरपुर तेल असते. सोबत मुबलक काटे असतात आणि त्या सोबत मुबलक चवही असते. कालवण चांगले होते. मासे स्वस्त असतात आणि चकचकीत व आकर्षक असतात. या माशांना बराच तीव्र गंध असतो त्यामुळे ते गृहीत धरुन आणावेत.
२२) मूडशी मासा (Lady Fish): हे लहान आकाराचे मासे असून, मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
२३) माकूळ (Squid) : माकूळ हा एक जलचर असून. त्याचे गोलाकार काप करून सार किंवा फ्राय बनवले जाते.
२४) तामोशी (Mangrove Red Snapper Fish) : हे लालसर आणि मध्यम आकाराचे मासे असून, मुबलक प्रमाणात खाल्ले जातात.
२५) सुरमई (Seer Fish) : इंग्रजीत King Mackerel म्हणतात. यांची चव उच्चकोटीची असते. दर्प कमी असतो. किलोला किमान ८०० रुपये या भावाने ते विकले जातात. बाजारात मोठे मासे आणतात (४-६ फूट) आणि तुकडे करुन विकतात.
२६) भिंग मासा (Herring Giant) : हा एक मध्यम आकाराचा चविष्ट मासा आहे.
२७) घोळ मासा (JewFish) : घोळ मासे महाग आणि चवीला अप्रतिम असतात.
२८) कालवं (Oysters): हे एक खडकाला चिकटलेले जलचर असून त्याच्या आतील मांसल भाग खाल्ला जातो.
२९) करली मासा (Silver Bar Fish / Belt Fish) : हा मासा चपटा व लांब असतो यालाही भरपुर काटे व भरपुर चव असते.
३०) कोलंबी आणि झिंगे: कालवणासाठी आणतो. आंबसूल टाकून सार बनवले की हवा तेवढा भात खाता येतो (कोकणात: वरपता येतो). कोळंबी आणि झिंगे वेगवेगळे असतात.
३१) मांदेली (Golden Anchovy): मस्त तळून खाल्ला जाणारा हा मासा म्हणजे पर्वणीच. मोठ्या प्रमाणात सर्व स्थरावरील लोक घेतात.
३२) रावस मासा (Indian Salmon): तळून, तिखट करून किंवा सार करून मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा मासा. रावस हे लहान आणि मोठ्या आकाराचे सापडतात. मोठे रावस किलोवर विकले जातात. खवलेदार आणि चवीला अतिउत्तम असणारा मासा म्हणजे रावस.
३३) हेकरू मासा (Reef Cod Fish): लहान-मध्यम आकाराचा मासा.
३४) भाकस मासा (Indian Halibut Fish): मध्यम आकाराचा मासा.
३५) चोर बोंबील मासा (Greater Lizard Fish): लहान-मध्यम आकाराचा मासा. भरपूर खवले आणि चिकचिकीत मांसल असा मासा.
३६) कोंकर मासा (Longfin trevally): या माशाचे इतर काही नाव असल्यास कळवावे. लहान-मध्यम-मोठ्या सर्व आकारात सापडतो. बऱ्याचदा खापरी पापलेट सांगून हे विकायचा प्रयत्न होतो. चमकणारी कांती आणि पातळ असा मासा.
३७) चांद मासा: इंग्रजीत बहुतेक Moonfish म्हणतात. मध्यम-मोठ्या आकाराचा मासा. सहसा बाजारात दिसत नाही.
३८) काळुंदर मासा (Pearl Spot Fish): लहान ते मोठ्या आकारात सापडतो. मध्यम ते मोठ्या आकारात शक्यतो खाल्ला जातो.
३९) वाकटी / वापटी / बले मासा (Ribbon Fish): हे पातळ माझे रिबिनी सारखे लांब असतात. खारवलेले मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. खारवलेल्या माश्याचा फोटो देखील जोडत आहे.
४०) मोदकं मासा (Whiting Fish): हे लहान आकाराचे मासे आवडीने खाल्ले जातात. खारवलेले मासे देखील मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
४१) तार मासा (Sword Fish): पुढे टोक असलेले हे मासे मोठ्या आकारात पकडले जातात. SwordFish अणि SailFish (ताड मासा) यात फरक आहे.
४२) पाकट मासा (Stringray): हा एक सागरी जलचर आहे. याला बनवण्याची पद्धती निराळी आहे.
४३) तारा मासा (Star Fish)
४४) लेप मासा (Sole Fish): हा एक वेगळा दिसणारा मासा आहे. लहान आकारात सापडतो.
४५) Lobsters ला मराठीत शेवंड म्हणतात.
Stingray ला वाघोळे किंवा वाघोळी पण म्हणतात.
४६) Mussels ना कोंकणी (गोवा) भाषेत शिण्याणो म्हणतात. कोकणात कालवे म्हणतानाच ऐकले आहे .
४७) Crab म्हणजे खेकडे. कोकणात यांना कुर्ली किंवा चिंबोरी पण म्हणतात.
४८) नारबा मासा (Giant Trevally) ; अंगापिंडाने मजबूत आणि घट्ट असा हा मासा मध्यम आकारात सापडतो.
४९) हळद्या नारबा (Yellow Spotted Giant Trevally): नारबा माशाचा हा पिवळ्या रंगाचा प्रकार आहे.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.