स्टॉक मार्केट मध्ये कोणता आणि किती पैसा टाकावा ?

प्रश्न जरी साधा असला तरी त्याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे..तरी मी साधारण idea देण्याचा व एखादी गोष्ट का करावी हे सांगण्याचा प्रयत्न करेन ज्याने निर्णय घेणे सोपे होईल.

#stockmarketअभ्यास #म #मराठीत
"MF investments are subject to market risk, read the offer document carefully before investing" हे खूप महत्त्वाचे वाक्य आपण #mutualfund च्या जाहिरातीत खूपदा ऐकले असेल.

पण ह्याचा अर्थ असा असतो की मार्केट मधून मिळणारा परताव्याची गॅरंटी नाहीये.तो दिवसागणिक बदलू शकतो.
आज मार्केट मध्ये असणाऱ्या १ लाखाची किंमत उद्या मार्केट पडले तर ५०हजार किंवा वाढले तर २ लाखही होईल.सतत होणारा चढउतार हा मार्केटचा पहिला आणि शेवटचा नियम आहे.
म्हणूनच आपल्याला कधीही लागू शकतो असा पैसा मार्केट मध्ये टाकणे तोटा होण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरते. हा धोका कमी करण्यासाठी
काही उपाय करता येतात -

१.Term Insurance - मार्केट मधे टाकलेला पैसा वाढायला काही वेळ द्यावा लागतो पण तो वेळ देण्या आधीच जर आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले ह्या धोक्यापासून सुरक्षा देण्यासाठी Pure Term insurance (PTi) घ्यावा लागतो. बरं ,लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हा इन्शुरन्स
लाईफ इन्शुरन्स(Li) म्हणजेच LIC किंवा तत्सम इन्शुरन्स पेक्षा फार वेगळा आहे.ढोबळ फरक 👇

प्रीमियम - (२५-३० वयाकरिता)
Li - ५० हजार/वर्ष
PTi - १० हजार/वर्ष

इन्शुरन्स कव्हर - म्हणजेच आपल्याला काही झाल्यास घरच्यांना मिळणारे पैसे

Li - २ ते ५० लाख (वयानुसार वाढत जाते)
PTi - १ कोटी
परतावा - इन्शुरन्स ची गरज न पडल्यास मिळणारे पैसे

Li - पॉलिसीत ठरल्याप्रमणे ६० वर्षांनंतर ठराविक रक्कम

PTi - काहीही नाही.

आणि ह्या परताव्याचा ठिकाणीच आपण फसतो..मुळात इन्शुरन्स घेताना परतावाचा विचारच करायलाच नको.

#personalfinance #आर्थिकसाक्षरता
कारण आपल्याला काही झाले तर Li चे ५०हजार देऊनही मिळणाऱ्या काही लाखापेक्षा PTi चे १०हजार(? वाया जाणारे !!) देऊन मिळणाऱ्या १ कोटी मध्ये आपले कुटुंब निदान पैशाची तरी चिंता न करता जगू शकते. म्हणून वर्षाचे १०हजार असे ३०-३५ वर्ष प्रीमियम भरून(३-३.५ लाखात)आपण आपल्या जीवनातील एक
खूप मोठी अनिश्चितता कमी करू शकतो.आता आपण दुसऱ्या अनिश्चिततेसाठी नियोजन बघू व यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे -

२.हेल्थ इन्शुरन्स- व ही अनिश्चितता म्हणजे आजारपण /तसाच काही आरोग्याचा विषय..आजकाल आपल्याला अत्यंत अत्याधुनिक आरोग्यविषयक सेवा उपलब्ध आहेत.ह्या सर्वच आरोग्य सेवा आपल्याला
गरज पडल्यास परवडतील असे नाही.पण आपल्याला हेल्थ इन्शुरन्स नक्की परवडू शकतो.म्हणून शक्य असल्यास घरातील सर्वांचा,नसल्यास कमीत कमी ४०च्या वरील सर्वांचा हेल्थ इन्शुरन्स काढायचा असतो.म्हणजे ऐनवेळी आलेल्या खर्चाने आपले अर्थिक गणित चुकत नाही.

अशा प्रकारे आपण आपल्या जीवनातील सर्वात
जास्त महत्वाच्या अनिश्चिततेचे नियोजन करू शकतो.आता राहिल्या बाकी temporary गोष्टी जसे आर्थिक मंदी किंवा जॉब सोडणे/जाणे इ इ..अशा छोट्या मोठ्या अडी अडचणीसाठी आपण -

३.F.D. - करावी. ही एफडी साधारणपणे आपल्या कुटुंबाचा एका वर्षाचा संपूर्ण खर्च भागवू शकेल एवढ्या रकमेची असावी.
ही एफडी कोणत्याही पतसंस्था किंवा लोकल बँक अशा ठिकाणी न करता SBI,BOB,Kotak,HDFC,ICICI अशा मोठ्या व सुरक्षित बँकात करावी.कारण ह्या एफडी चे काम परतावा देणे कमी आणि गरज लागल्यास खात्रीशीर हाताशी असलेली रक्कम म्हणून जास्त आहे.

हे झाले जीवनात +/- येणाऱ्या सर्व अनिश्चितता यांचे नियोजन
आता वळू कराच्या नियोजनाकडे - जे लोक ३०% वर्गात येतात त्यांनी ८०c व ८०ccd ह्या कलम अंतर्गत येणारे २ लाख वाचवणे अनिवार्य आहे.गुंतवणूक करून नंतर मिळणाऱ्या १०-१५% परताव्यापेक्षा आता हातात असलेल्या पैशातले २०-३०% वाचवणे कधीही चांगले.
ह्यासाठी PPF,NPS आणि ELSS हे ३ पर्याय आहेत.
१.ज्यांना धंद्यात किंवा काही कारणाने कर्ज उचलावे लागते त्यांच्यासाठी PPF हा पर्याय सर्वोत्तम आहे.कारण कायद्यानुसार,कर्ज बुडविल्यास बँका कर्जदाराची सर्व मालमत्ता,पैसे,शेअर्स,सोने नाणे सर्व सर्व गोष्टी जप्त करू शकतात पण बँकेत असलेल्या PF च्या रुपयालाही ही हात लावू शकत नाही.
२.NPS हा पर्याय सहसा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उत्तम आहे कारण त्यांना सरकारी नोकरीप्रमाणे पेन्शनचा पर्याय नसतो.

३.ELSS - हा पर्याय सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरतो कारण त्यांना मिळणारी पगारवाढ ही निश्चित नसते तसेच त्यांना नोकरी संपल्यानंतर पेन्शन
नसल्याचा विचार करावा लागत नसल्याने सरकारी कर्मचारी वरील २ पर्यायांपेक्षा थोडी जास्त जोखीम घेऊन अधिकच्या परताव्यासाठी ELSS चा पर्याय सहज निवडू शकतात.

अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचे नियोजन पूर्ण झाल्यावर उरणारा जो काही पैसा आहे तो आता आपण बिनधास्तपणे गुंतवू शकतो.
शेअर मार्केट जिथे सर्वांना पैसे कमविण्याची घाई असते तिथे आर्थिक नियोजन केल्यानंतर आलेला Patience हीच superpower ठरते..!

वरील गोष्टींचे नियोजन पक्के न करता गुंतवणूक केल्याने मला १-२ वेळेस वेळे आधी पैसे मार्केट मधून काढावे लागले आहेत.. व असे जेव्हा जेव्हा करावे लागते तेव्हा तेव्हा
तुम्हाला एकतर तोटा सहन करावा लागतो किंवा कमी नफा तरी चालवून घ्यावा लागतो. अशा माझ्या सारख्या चुका तुमच्या होऊ नये म्हणून नियोजनाचा एक ढोबळ आराखडा देण्याचा हा प्रयत्न..🙏

@trumptatya64 @MJ__Speaks @PaisaPani @Rajgurunagar
@MarathiRojgar @marathibuffett
@DrTirupathi_

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ajay

Ajay Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(