'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'
(२)
कुणाची आहे माहित नाही पण भावली मनाला..
'प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला'.
त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? 'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली.
(३)
'मोकळा' झाला पण रिता झाला असेल का खरंच ? मला नाही तसं वाटत ! 'रित' होण्यासाठी 'रिकामं' असावं लागतं मुळात. प्राजक्ताकडे हे रिकामपण नक्कीच नाही. . तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला. उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय....फुलांना फुलवायचंय..
(४)
प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवायचीये ...शिवाय देठादेठात केशर ! मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला...तो काही माणूस नाही न..
जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात,
(५)
तत्क्षणी तो त्या फुलांवरचे, सारे हक्कही सोडतो. आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो. गुंतत नाही तो त्या फुलांमध्ये. म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही आणि म्हणूनच रितेपणाची भावना मुळ धरत नाही.
(६)
तो अनुभवतो ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान..आपल्यालाही, आयुष्य असंच जगता आलं तर ? तो तो क्षण, वर्तमानाला अर्पण करून टाकायचा आणि मोकळं व्हायचं त्या क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा नवा क्षण खुलवायला...फुलवायला...
(७)
नव्याने सज्ज व्हायचं. फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करायचं.
गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचीच प्रिय देवता आहे.. श्री गणेशास अथर्वशीर्षाचे आवर्तन करून अभिषेक करण्यात येतो. येत्या मंगळवारी चतुर्थी आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला "अंगारकी चतुर्थी" असे म्हटले जाते. त्यानिमित्त अथर्वशीर्षाचे महत्त्व सांगणारा हा एक लेख प्रपंच..
*अथर्वशीर्ष म्हणजे कांय...?*
*अथर्वशीर्ष*
थर्व म्हणजे हलणारे आणि
अथर्व म्हणजे ' न हलणारे
शीर्षम् ' !!
सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे
अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी
असलेलं मस्तक...!!
अथर्वशीर्षाचं पठण केलं, की
बुद्धी आणि मन स्थिर होतं, अशी
गणेश उपासकांची श्रद्धा असते.
स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं
कांम हे नेहमी यशस्वी होतं.
आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस
नम्र होतो. असा माणूस मग
अडचणींमध्येही संधी शोधू
लागतो, अशी गणेश उपासकांची
श्रद्धा असते.
(२)
स्वर्गाच्या महाद्वारा जवळ आज पहाटे साक्षात शिवप्रभू शिवराय स्वतः उभे होते!
सूर्योदय ही अजून झाला नव्हता, महाराज आज आनंदी होते आणि किंचित दु:खी ही!
त्यांचा अत्यंत आवडता मावळा, जिवा शिवाशी मीलन झाले असा जिवाचा जीवलग आज स्वर्गारोहण करीत होता
(१)
कुंकम रांगोळ्यांचे सडे त्यांच्या स्वागतासाठी घातले गेले होते. आयुष्यभर फक्त एकच नाम घेऊन जिवाचा शिव झालेला, महारांजाच्या नावाने उभ्या जगतामधे हलकल्लोळ करणारा वीर होता शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य बळवंत मोरेश्वर पुरंदरे!
स्वर्गाच्या महाद्वारात तुतार्या वाजल्या
(२)
सनई चोघड्यांच्या मंगल स्वरात महाराजांनी स्वतः बाबासाहेबांचे स्वागत केले! बाबा! काय घाई मला भेटण्याची? तुमची गरज होती पृथ्वीतलावर! रहायचं की अजून काही दिवस!
महाराज, गेली ऐंशी वर्षे फक्त तुमचे गुणगान केले, तुमचाच ध्यास घेतला, इतके पोवाडे लिहिले
(३)