#विंचूकडा#लोहगड#Sanket_Jagtap
सह्याद्रीत दिसायला लोहगडाचा कडा रांगडा, भयाण अगदी पण त्याच्या काळ्या कातळावर अंग पसरतो तेव्हा प्रेमळ व्यक्ती आहे हा असा सुखद अनुभव नक्कीच येतो, असा हजारो वर्ष अभेद्य उभा आहे निसर्गात तडाखे झेलत वर्षानुवर्ष अविरत झटणारा हा कडा जसेच्या तसे आजही
अभंग अडग म्हणजेच...,
“विंचवाच्या नांगी सारखा असणारा शत्रुंना यमसदनी पाठवणारा ऐतिहासिक विंचुकडा....”🚩
डोंगर नैसर्गिक दृष्टीनेच किती दुर्गम संरक्षीत आहे गडाचे कडा नैसर्गिकच चखोट आहेत किल्ला बांधण्यापुर्वी केलेली तिथल्या ठिकाणची पाहणी आणि गड बांधण्यास भौगोलिक दृष्ट्या
तिथली योग्य असणारी वास्तुस्थापत्य विंचुकडा :
कैद्यांना, फितुरांना, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी गडावरील एक राखीव जागा कडा शिक्षा सुनाविल्यानंतर कैद्यांचा अशा ठिकाणाहून कडेलोट केले जात...
“भटकंती तळपत्या ऊन्हातून केलेल्या तांगडतोडी नंतरचा असा नजारा नकळत भटक्यांच्या मनाच्या हिंदोळ्यांवर कायमचा कोरला जातोच.....
जय शिवराय 🚩🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१४ जानेवारी इ.स.१६४१
शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र
शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१६४८
कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी
आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१६५८
स्वराज्याचे रोपटे पळापळाने वाढत होते.पुरंदरावर महाराजांनी फत्तेखानाचा दारुण पराभव केला होता.स्वराज्याची राजधानी म्हणुन रायगडाची निवड केली होती.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१६८५
छत्रपती संभाजी महाराजांनी शहाबुद्दीनचा पराभव केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१४ जानेवारी इ.स.१७६१ #मराठा_शौर्यदिन - #पानिपतची_तिसरी_लढाई
हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
#धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेला ही अद्भुत नळदुर्ग - रणमंडळ जोडगोळी. सोलापूरहून ४८ तर तुळजापूरहून ३२ किलोमीटरवर हा नळदुर्ग आहे. मोठा आकार, प्रेक्षणीय अशा अनेक वास्तू आणि मुख्य म्हणजे पाणीमहालाचे गूढ सौंदर्य
या साऱ्यांमुळे हा किल्ला पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांना सतत खुणावत असतो.
१२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.
नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती आहे पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी
पुराणातील राजा नल आणि दमयंतीपर्यंत नेऊन भिडवतात. चालुक्यांनंतर इथे बहमनी राजवट आली. या बहमनी राजवटीचे तुकडे झाल्यावर पुढे तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. या राजवटीतच सुलतान अबुल मुजफ्फर अली आदिलशाह पहिला याने इ.स. १५६० मध्ये गडाला आजचे हे आक्रमक रूप दिले.
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१३ जानेवारी इ.स.१६८०
संभाजीराजे व शिवाजी महाराज यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१३ जानेवारी इ.स.१६८५
मराठ्याचा पुण्यावर मारा व इतर भागात हालचाली, कोथळीगडाजवळ ७०० मराठी स्वार, १००० मराठा सैनिक शिरवळ भागात तर
नवलाख उंब्रे येथे मराठी फौजेच्या हालचाली
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१३ जानेवारी इ.स.१७०९ किंवा १७१०
छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर जीवाजी महाले (संकपाळ) यांचा पुण्यदिन आहे.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
१३ जानेवारी इ.स.१७६१
डिसेंबर-जानेवारी मधे अन्नाविना मराठ्यांची बरीच जनावरे, घोडे मेले. १३ जानेवारी रोजी उपाशी पोटी सर्व सैन्य रनांगणावर लढाईसाठी उतरले. सैन्य पूर्ण खचलेले होते.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
#सरदार_पुरंदरे#गढी#सासवड #Sanket_Jagtap
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ऐतिहासिक नगरीत शनिवारवाड्याचा जुळा भाऊ म्हणून ओळख असलेली पुरंदरे गढी आहे. सासवड हे गाव पुणे शहरापासून ३० कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य दगडी बुरूज आणि त्याचे भव्य सागवानी प्रवेशद्वार
शनिवारवाड्याची आठवण करून देते. वाड्याची संपूर्ण तटबंदी असलेली भिंत आजही मजबूत आहे. आतमध्ये तशी बर्यापैकी पडझड झालेली आहे. तरी आतील वाड्याचे भव्यपण आजही टिकून आहे. बाहेर वाड्याच्या तटाशी गणेश मंदिर आहे. हा द्विभुज गणेश आहे.
शके १६२५ (इ.स. १७०३) मधील एका पत्रात 'कसबे सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले' अशी नोंद आहे. 'शके १६१४ (इ.स. १६९२) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे', अशी एका
१२ जानेवारी इ.स.१७०५
छत्रपती शाहु महाराजांनी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जानेवारी इ.स.१७०८ #छत्रपती_शाहु_महाराज_राज्याभिषेकदिनमराठा साम्राज्याचा सुवर्ण काळ गनला जाणारा सातरावे शतक, या कलखंडा मध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा मोगल्यांच्या राज्यात धुमाकुळ घालु लागल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१२ जानेवारी इ.स.१८६३ #स्वामी_विवेकानंद_जन्मदिवसकोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. ते पुढे स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जावू लागले त्यांचा आज जन्मदिवस.भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी
#बदलापूर : चावीच्या आकाराची प्राचीन विहीर #Sanket_Jagtap
पर्यटकांचं आकर्षण; दुष्काळातही पाणी
इतिहासाच्या शेकडो खाणाखुणा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. बदलापूर (Badlapur) शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे (Antiquarian) नमुने बदलापुरात आढळतात.
त्यातील देवळोली गावातील (Devloli village) चावीच्या आकारातील (key shape) प्राचीन विहीर (Ancient well) पर्यटकांना (Tourist Attraction) भुरळ घातली आहे. ही विहीर शिवकालीन असून तिचे पाणी दुष्काळातही (Water in drought also) आटत नाही, असे येथील गावकरी सांगतात.
(Tourist attraction of Ancient well in key shape at badlapur devloli village)
बदलापूर पश्चिम शहरी भागापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर देवळोली हे गाव आहे. सुमारे ६० घरे असणारे हे गाव ऐतिहासिक प्राचीन शिल्पांनी नटलेले आहे. या ठिकाणी सगळ्यात आकर्षण असणारी वास्तू म्हणजे प्राचीन