#सरदार_पुरंदरे#गढी#सासवड #Sanket_Jagtap
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ऐतिहासिक नगरीत शनिवारवाड्याचा जुळा भाऊ म्हणून ओळख असलेली पुरंदरे गढी आहे. सासवड हे गाव पुणे शहरापासून ३० कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य दगडी बुरूज आणि त्याचे भव्य सागवानी प्रवेशद्वार
शनिवारवाड्याची आठवण करून देते. वाड्याची संपूर्ण तटबंदी असलेली भिंत आजही मजबूत आहे. आतमध्ये तशी बर्यापैकी पडझड झालेली आहे. तरी आतील वाड्याचे भव्यपण आजही टिकून आहे. बाहेर वाड्याच्या तटाशी गणेश मंदिर आहे. हा द्विभुज गणेश आहे.
शके १६२५ (इ.स. १७०३) मधील एका पत्रात 'कसबे सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले' अशी नोंद आहे. 'शके १६१४ (इ.स. १६९२) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे', अशी एका
पत्रात नोंद आढळते. यावरून असे म्हणता येईल की, पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीचीच असल्याचे दिसते. शके १६१४ मध्ये पुरंदरे मराठ्यांचे साक्षात नोकर होते. शके १६२४ मध्ये ते सुखवस्तू रचत आहेत. सासवड गाव कधी
मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके १६२३ मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदन्यांचा दृढ परिचय होता. या घराण्यातील 'हेरंब' नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक अंबाजी
त्र्यंबक या बंधुव्दयाखेरीज त्यांचे चुलतभाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी विश्वनाथ व भाऊचंद चिंतो महादेव पुरंदरे हेसुद्धा आपल्या बकूबाप्रमाणे राजकारणात वावरत होते. सेनापाती धनाजी जाधवरावांच्या कृपेने यांना थोर पद प्राप्त झाले.
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावांस छ. शाहूमहाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंवरे मुतालिक म्हणून सातार्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत.इ.स.१७३७ मध्ये अंबाजीपंत, पिलाजी जाधव व
राणोजी भोसले आणि आनंदराव पवार यांनी माळव्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केले. इ.स. १७३१ मध्ये कोल्हापूरकर संभाजीराजे यांच्या व शाहूमहाराजांच्या भेटीच्या प्रसंगी जाखणवाडी गावच्या मैदानात अंबाजीपंत होते.
उमाबाई दाभाडे यांच्या भेटीसाठी शाहूमहाराजांनी काही महत्त्वाची मंडळी पाठवली होती. त्यांत अंबाजीपंत होते.
जय शिवराय 🚩🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
१२ जानेवारी इ.स.१७०५
छत्रपती शाहु महाराजांनी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जानेवारी इ.स.१७०८ #छत्रपती_शाहु_महाराज_राज्याभिषेकदिनमराठा साम्राज्याचा सुवर्ण काळ गनला जाणारा सातरावे शतक, या कलखंडा मध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा मोगल्यांच्या राज्यात धुमाकुळ घालु लागल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१२ जानेवारी इ.स.१८६३ #स्वामी_विवेकानंद_जन्मदिवसकोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. ते पुढे स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जावू लागले त्यांचा आज जन्मदिवस.भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी
#बदलापूर : चावीच्या आकाराची प्राचीन विहीर #Sanket_Jagtap
पर्यटकांचं आकर्षण; दुष्काळातही पाणी
इतिहासाच्या शेकडो खाणाखुणा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. बदलापूर (Badlapur) शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे (Antiquarian) नमुने बदलापुरात आढळतात.
त्यातील देवळोली गावातील (Devloli village) चावीच्या आकारातील (key shape) प्राचीन विहीर (Ancient well) पर्यटकांना (Tourist Attraction) भुरळ घातली आहे. ही विहीर शिवकालीन असून तिचे पाणी दुष्काळातही (Water in drought also) आटत नाही, असे येथील गावकरी सांगतात.
(Tourist attraction of Ancient well in key shape at badlapur devloli village)
बदलापूर पश्चिम शहरी भागापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर देवळोली हे गाव आहे. सुमारे ६० घरे असणारे हे गाव ऐतिहासिक प्राचीन शिल्पांनी नटलेले आहे. या ठिकाणी सगळ्यात आकर्षण असणारी वास्तू म्हणजे प्राचीन
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
११ जानेवारी इ.स.१६६६
मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
११ जानेवारी इ.स.१६८०
रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
११ जानेवारी इ.स.१६८८
मातबरखानाने पट्टा गड जिंकला१६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
११ जानेवारी इ.स.१७१७
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
सरदार #पानसे#मल्हार_गड#सोनोरी (सरदार पानसे) #Sanket_Jagtap
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला मल्हारगड पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे.
पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१० जानेवारी इ.स.१६६४
शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७२४
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३०
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३४
बाजीरावाविरुद्ध लढताना सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखाली पराभव होऊन मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३९
इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.केळवे पाणकोटा प्रमाणे
महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले #चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन
प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते.
१७ व्या शतकानंतर याचे महत्व कमी होत गेले.
चौल हा पुर्वी 15 पाखाडयामध्ये विभागलेला होता, या 15 पाखाडयापैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर आहे.
चौलचे श्री रामेश्वर मंदिर फार वर्षापुर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो.