कोणत्याही ब्रिजचे ढोबळमानाने भाग करता येतात ते साॅलिड ऍप्रोचेस आणि व्हायाडक्ट.
व्हायाडक्ट मध्ये असतं फाऊंडेशन, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर.
सुपरस्ट्रक्चर हे साधारणपणे दोन पियरमधल्या अंतरावर अवलंबून असतं. दोन पियर मध्ये अंतर कमी असेल तर तिथे शक्यतो +
प्रीकास्ट आय गर्डर किंवा कास्ट इन सिटू बाॅक्स गर्डर किंवा साॅलिड स्लॅब असतात. आय गर्डर हे जमीनीवर तयार करून नंतर क्रेनच्या सहाय्याने उचलून पियरवर ठेवले जातात.
पियर्स मधलं अंतर म्हणजे स्पॅन लेंग्थ जर जास्त असेल तर आय गर्डरचं वजन वाढतं आणि मग ते उचलून ठेवणं शक्य होत नाही.+
आमच्या वर्सोवा क्रिक ब्रिजमध्ये जमीनीवरचे जे स्पॅन आहेत त्यात जास्तीत जास्त स्पॅन लेंग्थ जवळपास ३८.५० मीटर आहे. यात गर्डरचं वजन १२५ टनापर्यंत आहे. आम्ही ३५० टनांच्या २ क्रेन वापरून या गर्डरचं लाॅंचिंग करत आहोत. +
ज्या ठिकाणी स्पॅन लेंग्थ जास्त आहे आणि खालून सपोर्ट लावून सुपरस्ट्रक्चर तयार करणं शक्य नाही त्याठिकाणी सर्व काम वरचेवर करावं लागतं. उदाहरणार्थ शहरात जे जंक्शन असतात त्याठिकाणी, नदी किंवा समुद्रात हे शक्य नसतं.
अशा ठिकाणी मग प्रीकास्ट पीएससी बाॅक्स गर्डर +
किंवा इन सिटू बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर किंवा केबल स्टेड सुपरस्ट्रक्चर वापरलं जातं
यात जे कन्स्ट्रक्शन असतं ते सेगमेंट मध्ये केलं जातं. स्पॅन लेंग्थ चे तुकडे करून ते जोडले जातात आणि त्यानंतर त्यात स्टील वायर टाकून त्या खेचल्या जातात.+
वर्सोवा क्रिक ब्रिजचे खाडीवर जे स्पॅन आहेत त्यातले ३ स्पॅन हे ११४.७० मीटर्सचे आहेत आणि २ स्पॅन हे ८६ मीटरचे आहेत. बोटींची ये जा याठिकाणी चालू असल्याने मेरीटाईम बोर्डाच्या आदेशानुसार ही स्पॅन लेंग्थ ठेवणं आवश्यक आहे.+
बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर करताना प्रथम पियर उभा झाल्यानंतर त्यावर पियर हेड ठेवला जातो, तो प्रीकास्ट असु शकतो किंवा इन सीटु असतो. पियर हेड ठेवल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला फाॅर्म ट्रॅव्हलर वापरून पहिला सेगमेंट कास्ट केला जातो.+
पियर हेड बरोबर प्रिस्ट्रेसिंग करून हे सेगमेंट जोडल्यानंतर दोन्ही बाजूचे फाॅर्म ट्रॅव्हलर पुढे सरकवून दुसरे सेगमेंट कास्ट केले जातात. याच पद्धतीने पियर च्या दोन्ही बाजूंना स्पॅन च्या मध्यापर्यंत सेगमेंट कास्ट केले जातात.+
त्याच वेळी दुसऱ्या पियर वरून याच पद्धतीने सेगमेंट मध्यापर्यंत आणले जातात. दोन्ही कडून आलेल्या सेगमेंट मध्ये जो गॅप उरतो तो शटरिंग लावून भरला जातो, त्याला स्टिच काँक्रीट म्हणतात.
अशा रितीने सर्व स्पॅन एकमेकांशी जोडले कीं झालं सुपरस्ट्रक्चर तयार. +
सुपरस्ट्रक्चर तयार झालं म्हणजे ब्रिज तयार झाला असं नसतं तर त्यानंतर बरीच कामं असतात ती म्हणजे साईडचे क्रॅश बॅरियर्स तयार करणं, एक्सपान्शन जाॅईंटस् लावणं, वेयरिंग कोर्स टाकणं म्हणजे वरचा रस्ता तयार करणं आणि बरंच काही. +
मी आतापर्यंत बांद्रा वरळी सी लिंक, गणेशखिंड रोड पुणे, मिहान नागपूर, पनवेल बस स्टँड समोर, इस्टर्न फ्रीवे मुंबई याठिकाणी सेगमेंटल पीएससी बाॅक्स गर्डर पद्धतीने ब्रिजचं काम केलं पण बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हरचं काम मी केलं नव्हतं ते मला वर्सोवा क्रिक ब्रिजवर करायला मिळत आहे. +
आमच्या ब्रिजच्या बाजूला जे ब्रिज आहेत ते याच पद्धतीने बांधलेले आहेत.
आता थोडं स्पाईन आणि विंग्ज बद्दल : बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर मधे एक एक संपुर्ण सेगमेंट हा पुढे पुढे जातो. सेगमेंटची रूंदी किती ठेवायची यावरून सिंगल सेल की डबल सेल ठरवलं जातं. आमचा ब्रिज हा चार लेनचा आहे. +
चार लेन, फुटपाथ मिळून याची रूंदी १९.८५ मीटर आहे. यातला ११ मीटरचा भाग ज्याला स्पाईन म्हणतात. स्पाईनचं कॉंक्रिट हे इन सिटू म्हणजे पियरवरच केलं जातं. उरलेल्या ८.८५० मीटरमधले ३.८२५ मीटरचे दोन भाग हे कास्टिंग यार्डमध्ये प्रिकास्ट कॉंक्रिटने करून बार्जवरून पियरजवळ आणले जातील, +
यांना विंग्ज म्हणतात. हे विंग्ज स्पाईनच्या दोन्ही बाजुंना जोडले जातील. स्पाईन आणि विंग मध्ये उरलेला ६०० मिमीचा गॅप कॉंक्रिट टाकुन भरला जातो. ब्रीजच्या रूंदीइतक्या लांबीच्या केबल त्यानंतर स्ट्रेस केल्या जातात म्हणजे पुर्ण सेगमेंट एकसंध होईल. +
याला सपोर्ट करण्यासाठी स्ट्रट दिले जातात. सोबतच्या चित्रात सर्व गोष्टी समजू शकतील.
माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा हा भारतातील पहिला ब्रीज आहे.
✍️रंगा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Statue_Of_Unity
७५००० क्युबिक मीटर काँक्रीट, १८००० मेट्रिक टन स्टील, ५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील, क्लॅडिंगसाठी २२५०० ब्राँझ शीट्स एवढं मटेरियल वापरून २४० मीटर उंच बेस स्ट्रक्चर असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातला सर्वात उंच पुतळा
गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर उभारण्यात आलाय आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी त्याचं लोकार्पण करीत आहेत.
यातील चीनच्या एका कंपनी कडून घेतलेले ब्राँझ शीट्स सोडले तर बाकी सर्व मटेरियल हे आपल्या भारत देशातच उत्पादन करून वापरण्यात आलंय.
१ क्युबिक मीटर काँक्रीट करण्यासाठी सरासरी ९ सिमेंट बॅग वापरल्या असं समजलं तर एकूण कामासाठी ६ लाख ७५ हजार सिमेंट बॅग वापरल्या आहेत, त्याचबरोबर १ क्युबिक मीटर काँक्रीट करायला सरासरी ०.७०० क्युबिक मीटर खडी आणि वाळू लागते म्हणजे साधारण पणे ५२५०० क्युबिक मीटर खडी