#भक्तीसाठी_बळी
सध्या सगळ्यांना देशभक्ती मध्ये तोलून ठरवलं जातं की कोण देशभक्त आणि कोणाला पाकिस्तानचा विसा द्यायचा. अशी ही देशभक्ती म्हणजे सरकारवरच एकतर्फी प्रेम ज्याच्यात तरुण पोरं स्वत:ला हीरो समजून एक पाय घासत #श्रीवल्ली म्हणल्यासारखं घसा ताणून #श्रीराम म्हणत आहेत.
मुलांना लहानपणीच ट्युशन लावणारे, अभ्यासासाठी वेगळी रूम बांधणारे, कॉम्प्युटर्स घेऊन देणारे, पैसे भरून मुलांना चांगल्या कॉलेजला पाठवणारे, नौकरीसाठी सोनं मोडून पैसे देणारे, खोटी प्रमाणपत्र तयार करणारे, सरकारी नौकरीवाला जावई शोधणारे लोकं नौकऱ्या नाही तरी पण ढिम्म?
घरी पार्किंगपेक्षा जास्त गाड्या घेऊन घरातल्या प्रत्येकाची सोय होईल हे पाहणारे पेट्रोल डिझेलचे दर वाढले तरी बोलायला तयार का नाही ? कुटुंबासोबत फिरायला जाणं कमी झालं आहे, वाढदिवसाच्या पार्ट्या आता कमी लोकांत होतात, करोनामुळे लग्न खर्च तरी कमी झाला त्याचंच काय समाधान आहे.
आयुष्यभर व्याजाच्या अपेक्षेने पोस्ट, पीपीएफ, पीएफ जमा करणारे, व्याजदर कमी झाले, withdrawal हा taxable झाला तरी शांतपणे पाहत आहेत. प्रत्येक खरेदीवर indirect taxes वाढले पण तरी direct tax स्लॅब मध्ये बदल झाला नाही म्हणून खूष होत आहेत ? घरातलं इतकं साधं गणित कळत नसेल?
आपल्या ओळखीच्या लोकाचे धंदे बुडाले आहेत, कर्ज फेडायला पैसा नाही, नवीन कर्ज सहज मिळत नाही तर कर्जाचं डोंगर झालेले लोकं फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करत आहे पण आपली माणुसकीचं मेली आहे त्यामुळे तर दुसऱ्याच्या मरणाचं दुःख कसं करणार ?
अर्थात हे डोक्यावर घर, बसायला किमान दुचाकी गाडी आणि एखादी नौकरी असणाऱ्या लोकांबद्दल झालं. पण ज्यांना स्वतःच घर नाही, कायम नौकरी नाही अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांची अमानवीय दैना झाली आहे. आयुष्यात खूप मोठ्या अपेक्षा न ठेवता पोटासाठी मिळेल ते काम हे लोकं करू शकतात कारण जगायचं आहे.
या गोष्टींतून सुद्धा लक्षात आलं नसेल तर साधी गोष्टी आहे ती म्हणजे मध्यमवर्गीय हा गरीब होतोय आणि उच्चवर्गीय हा मध्यमवर्गीय होतोय. ही तुमची गोष्ट नाही, देशभरात हेच हाल आहेत. याच खापर करोणावर फोडू शकत नाही कारण आपली स्थिती ही २०१९ पर्यंतच अत्यंत खराब झाली होती.
नोटबंदीमुळे तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या बाईची, बांधकामावर मजूर असणाऱ्या लोकांची, हातगाडी वाल्याची आणि ओळखीचा #रिक्षावाला असेल त्याची परिस्थिती काय झाली बघून घ्या. त्यांनी कुठल्या स्वप्नांना ठेऊन दिलं ते बघा म्हणजे कळेल की त्यांच्यात आणि तुमच्यात खूप फरक नाही.
सर्वात जास्त नौकऱ्या निर्माण करणाऱ्या MSME या बंद होत आहेत तर सरकारी कंपन्या या प्रायव्हेट होत आहेत. पुढं नवीन रोजगार संधी मिळवण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यापेक्षा सरकारचा भर हा त्यांच्या पक्षाला सोईचा इतिहास लिहून घेण्यावर आहे. यामुळेच हिजाब ला विरोध म्हणून भगवे उपरणं ?
या सनातन धर्माच्या सामाजिक रचनेत खालच्या स्तरावर जास्त लोकं असायला हवी. तुम्हाला जातीने खाली ठेवता येत नसेल तर गरिबीने ठेवता आलं की मग हवं ते काम करायला भाग पाडलं जाऊ शकत. मधल्या स्थारतल्या लोकांना "मानसन्मान" आणि सवलती दिल्या की मग वरच्या स्थारतले लोकं राज्य करायला मोकळे.
आपण सगळे मिळून हे घडवून आणू कारण दुबळ्याचा बळी देऊन देवाच्या भक्ती सिद्ध करावी लागते हे धर्म पंडित सांगतात. आपल्या या "देवा" साठी आपण आपल्याच "पुढच्या पिढीच्या भविष्याचा" बळी देत आहोत यासारखं पुण्याचं काम अजून काय असू शकतं ?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’.
#भारतीय_राष्ट्रीय_कांग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात भारतात लोकशाही किती टिकेल याबाबत डॉ आंबेडकर साशंक होते. अर्थात ही साशंकता ही त्यांनीच तयार केलेल्या संविधनावर नव्हती तर इथल्या समाजव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास सांगत होता. धार्मिक,जातीय आधारावर विखुरलेला समाज हा हजारो वर्षांच्या
गुलामीच्या जोखडाला बांधलेला होता.आपले काही अधिकार आहेत हे समजण्यासाठी पुरेसं शिक्षण बहुतेकांना नव्हतं. भाषा, प्रांतात विखुरलेल्या ह्या भारत देशात मागच्या ६० वर्षात लोकशाही फक्त टिकली नाहीच तर जगाला संविधानाच्या आधारावर यशस्वी ठरलेल्या लोकशाहीचा परिपाठ घालून दिला ते काँग्रेस या
देशात होती म्हणून.स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लीग आणि जनसंघ यांचे धर्माधिष्ठित उद्योग बघून त्यांच्या हातात सत्ता न देणं हेच योग्य हे जनतेने समजलं होतं. पण समाजाला विज्ञानासोबताच इतिहास योग्य प्रकारे शिकवण्यात तत्कालीन सरकार मागे पडली शेवटी कट्टर सनातनी जनसंघ हळूहळू विषारी