"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’.
मी म्हणालो, ‘‘साहेब, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही, तुम्ही राज्यकर्ते आहात. तुमच्याकडे आज घडीला 20,000 माध्यमिक शाळा आहेत. 80,000 प्राथमिक शाळा आहेत. 2,200 कॉलेजेस आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या शिक्षकांची संख्या 6 लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 कोटी 10
लाख आहे. कॉलेजमध्ये 10 लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ 1 लाख प्राध्यापक आहेत.या सगळ्यांच्या अभ्यासक्रमात, मूल्यशिक्षणात, तसंच भारतीय संविधानातही ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा’ असं लिहिलेलं आहे. यातलं काहीच तुम्ही करत नाही, म्हणून आम्हाला करावं लागतं.’’
दाभोलकरांनी आपल्या राजकीय नेत्यांना हा दाखवलेला आरसा आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री आमच्या घरातला गणपती दूध पितो म्हणाले होते आणि दुसऱ्या एका मुख्यमंत्र्यांने तर आपली खुर्ची टिकावी म्हणून शासकीय निवासस्थानी अघोरी पूजा केली होती.
याच मुख्यमंत्र्याने पहिल्या शपथविधीला मंचावर ढीगभर बाबाबुवा बसवले होते. सत्यसाईबाबाच्या कार्यक्रमाला अधिवेशन सोडून जाणारे मुख्यमंत्री पण याच महाराष्ट्रातले. त्या बाबाचे भक्त असणारे पिता पुत्र सुध्दा याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. याव्यतिरिक्त अनेक बाबाबुवांना
राजकीय मंच देणाऱ्या राजकारण्यांची राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कमी नाही. देशाचे आजी आणि माजी प्रधानमंत्री ज्यांच्या समोर नतमस्तक होऊन नाचले, गोडवे गायले असा एक बापू अनैतिक कामामुळे अनेक वर्ष जेल मध्ये आहे. मतांच्या जोगवा मागायला अशा बाबांची सुद्धा मदत होते हे सुद्धा सत्यच.
राज्यकर्त्यांनी समाजातली चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी सरकारी, निमसरकारी आणि सामाजिक संस्थांचा वापर करावा पण सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही पक्षाचं सरकार हे अशा समाज बदलासाठी तयार दिसत नाही. त्यामुळे गंडे, धागे दोरे घालणारे नेते वेगवेगळ्या पूजापाठ करण्यात व्यस्त आहे. दाभोलकर आज
आपल्यात नाही पण त्यांनी दाखवलेली दिशा ही येणाऱ्या काळाची नांदी आहे. आज नाही तर उद्या आपण पाळत असणाऱ्या भाकड समजुती सोडून देऊ हे नक्की. पण या गोष्टी समाजात लवकर व्हाव्या म्हणून राजकारण्यांनी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. बाकी वेळ लागेल पण सुधारणा त्या होणारच.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#भक्तीसाठी_बळी
सध्या सगळ्यांना देशभक्ती मध्ये तोलून ठरवलं जातं की कोण देशभक्त आणि कोणाला पाकिस्तानचा विसा द्यायचा. अशी ही देशभक्ती म्हणजे सरकारवरच एकतर्फी प्रेम ज्याच्यात तरुण पोरं स्वत:ला हीरो समजून एक पाय घासत #श्रीवल्ली म्हणल्यासारखं घसा ताणून #श्रीराम म्हणत आहेत.
मुलांना लहानपणीच ट्युशन लावणारे, अभ्यासासाठी वेगळी रूम बांधणारे, कॉम्प्युटर्स घेऊन देणारे, पैसे भरून मुलांना चांगल्या कॉलेजला पाठवणारे, नौकरीसाठी सोनं मोडून पैसे देणारे, खोटी प्रमाणपत्र तयार करणारे, सरकारी नौकरीवाला जावई शोधणारे लोकं नौकऱ्या नाही तरी पण ढिम्म?
घरी पार्किंगपेक्षा जास्त गाड्या घेऊन घरातल्या प्रत्येकाची सोय होईल हे पाहणारे पेट्रोल डिझेलचे दर वाढले तरी बोलायला तयार का नाही ? कुटुंबासोबत फिरायला जाणं कमी झालं आहे, वाढदिवसाच्या पार्ट्या आता कमी लोकांत होतात, करोनामुळे लग्न खर्च तरी कमी झाला त्याचंच काय समाधान आहे.
#भारतीय_राष्ट्रीय_कांग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात भारतात लोकशाही किती टिकेल याबाबत डॉ आंबेडकर साशंक होते. अर्थात ही साशंकता ही त्यांनीच तयार केलेल्या संविधनावर नव्हती तर इथल्या समाजव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास सांगत होता. धार्मिक,जातीय आधारावर विखुरलेला समाज हा हजारो वर्षांच्या
गुलामीच्या जोखडाला बांधलेला होता.आपले काही अधिकार आहेत हे समजण्यासाठी पुरेसं शिक्षण बहुतेकांना नव्हतं. भाषा, प्रांतात विखुरलेल्या ह्या भारत देशात मागच्या ६० वर्षात लोकशाही फक्त टिकली नाहीच तर जगाला संविधानाच्या आधारावर यशस्वी ठरलेल्या लोकशाहीचा परिपाठ घालून दिला ते काँग्रेस या
देशात होती म्हणून.स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लीग आणि जनसंघ यांचे धर्माधिष्ठित उद्योग बघून त्यांच्या हातात सत्ता न देणं हेच योग्य हे जनतेने समजलं होतं. पण समाजाला विज्ञानासोबताच इतिहास योग्य प्रकारे शिकवण्यात तत्कालीन सरकार मागे पडली शेवटी कट्टर सनातनी जनसंघ हळूहळू विषारी