छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
होय, मी पण एक कट्टर शिवभक्त आहे.फक्त मला शिवजयंतीला लावलेले डीजे,लाऊडस्पिकर,धांगड धिंग्यात काढलेल्या मिरवणूका आवडत नाहीत.त्या पेक्षा वर्षातले ३६५ दिवस सकाळी दिवस सुरू होताना महाराजांचं केलेलं स्मरण जास्त भावते. 1/n @LetsReadIndia
मला पुतळ्यातले महाराज कधीही पटले नाहीत. काही चौरस मीटर च्या चौथऱ्यावर वसलेल्या त्या पुतळ्यापेक्षा पुस्तक रुपात आबालवृद्धां पर्यंत पोहचलेले माझ्या राजांचे विचार मला जास्त भावतात. 2/n
मला माझ्या राजाच्या मोठ्या स्मारकाची आशा कधीच नव्हती. उलट, वर्षाचे इतर ३६४ दिवस धुळीत माखलेल्या त्या पुतळ्याची जागा, मनातील धूळ नाहीशी करणारी वाचनालये कधी घेतील याची आशा कायम मनाला लागलेली असते. 3/n
महाराजांनी खानाचा वध केला, महाराज अग्ऱ्यावरून निसटले, शाहिस्त्याला नडले, सिद्ध्याला नडले..केवळ या व अशा अनेक घटना चित्रपटात पाहून किंवा कल्पना करून, काहीएक तास अथवा काहीएक दिवस छाती फुगुवून मिरवण्यात मला रस नाही. त्या उलट महाराजांनी रुजवलेली मूल्ये जोपासण्याचा माझा कयास असतो. 4/n
आजच्या धार्मिक अंधकारात महाराजांनी रुजवलेल्या सर्वधर्मसमभावाचा प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. स्त्रियांना कमालीचं असुरक्षित वाटणाऱ्या वातावरणात महाराजांनी घालून दिलेली स्त्रियांच्या सन्मानाची शिकवण जोपासायचा माझा प्रयत्न असतो. 5/n
आजच्या जातीय राजकरणात, महाराजांनी सांगितलेलं सर्वसमावेशकतेचं तत्व मी प्राणपणाने पाळतो. मला माझा राजा कोणत्याच बॅनर वर नको, मोठ्या फ्लेक्स वर नको,तर समाजातील प्रत्येकाच्या बुद्धीपटलावर, मनःपटलावर माझा राजा विराजमान झाला पाहिजे हीच माझी मनापासून इच्छा आहे. 6/n
मला झेंडे मिरवणारे मावळे नकोत, तर राजाचं कर्तृत्व अभ्यासून, ते आत्मसात करून समाजकार्याची पताका उंचवणारे शिलेदार हवेत. हीच खरी शिवजयंती !! 7/n
माझ्यासारखा शिवभक्त आजच्या घडीला वेडसर वाटेलही.. परंतु एक मात्र नक्की.. लवकरच या एकाचे शंभर होतील, हजार होतील, लाख होतील, करोड होतील.. हे कार्य अखंड आहे.. ते वाढतच जाईल. महाराजांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांची मूल्ये अशीच सर्वदूर पोहचत राहील.. हीच राजांना मानवंदना !! 8/n