एअर इंडियाने युक्रेनचे २३ हजारेचे तिकीट आता ५५ हजाराला केलं आहे. बाक्की तुम्ही व्हाट्सएपच्या थेरीज वाचून खाजगीकरणाला पाठींबा देत रहा. #टाटाच्या_नावानं_चांगभलं
अकबराचा इतिहास सांगताना दुर्गावतीने त्याला तीन वेळा हरवले असा उल्लेख कुणीही इतिहासकार करत नाही. पराक्रमी, कुशल योद्धा आणि दक्ष प्रशासक म्हणून राणी दुर्गावतीची ओळख आपल्याला असायलाच हवी! भारतीय इतिहासातील ही खरीखुरी दुर्गा! १४ वर्षे मध्य भारतावर तिने राज्य केले. 👇🏾
१४ वर्षात ५१ वेळा तिच्या राज्यावर हल्ले झाले. त्या सर्व युद्धांमधे दुर्गावती जिंकली. अकबराला तिने तीन वेळा पळवून लावले. माळव्याचा सुलतान बाज बहादुर, बंगालचा नवाब ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान यांनी गोंडवाना प्रांत जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. 👇🏾
अकबराचा दरबारी लेखक अबुल फजलने लिहिले आहे, "राणी दुर्गावती कुशल योद्धा आहे. सत्तर हजार सैन्य, वीस हजार घोडदळ, एक हजार हत्ती यांची अत्यंत चतुराईने ती रचना करते".. 👇🏾