जुलै - ऑगस्ट 2006:- इस्राएल आणि लेबनाॅन यांच्यातील संघर्ष (युद्धमय परिस्थिती) - इस्राएलच्या फौजा जेव्हा लेबनाॅन मध्ये घुसल्या तेव्हा सुमारे 20,000 भारतीय लेबनाॅन मध्ये होते
. त्यामधील 2,000 भारतीयांच्या जीवाला धोका आहे हे कळल्यानंतर लगेचच डॉ मनमोहन सिंग सरकारने आपल्या नौदला बरोबर ऑपरेशन सुकून (Operation Sukoon) नावाचा प्लॅन तयार केला. यामध्ये सुवेझ कालव्यापाशी असलेल्या भारतीय नौदलाच्या INS मुंबई, INS ब्रह्मपुत्रा, INS बेतवा आणि INS शक्ती यांना तातडी
लेबनाॅनला रवाना करण्यात आले.
या युद्धनौकांनी लेबनाॅन मधून जीवाला धोका असलेल्या भारतीय लोकांची सुटका केली आणि त्यांना सायप्रस येथे हलविण्यात आले.
सायप्रसच्या विमानतळावर एअर इंडियाच्या विमानांनी सर्व भारतीयांना सुखरूप मुंबईला परत आणले
. त्यावेळी, भारताला श्रीलंका आणि नेपाळ यांनी सुद्धा विनंती केली होती की त्यांच्या नागरिकांना सुद्धा भारत सरकारने लेबनाॅन मधून सोडवावे.
डॉ मनमोहन सिंग सरकार आणि भारतीय नौदल यांच्या उत्कृष्ट समन्वयाने ही सुद्धा कामगिरी आपण पार पाडली.
फेब्रुवारी 2011:- लिबीया मध्ये Civil War चालू झाले. डॉ मनमोहन सिंग सरकार आणि भारतीय नौदल यांनी तातडीने Operation Safe Homecoming हा प्लॅन आखला. या प्लॅन नुसार INS म्हैसूर, INS आदित्य, आणि INS जलाश्व या मुंबईहून ट्रीपोली (लिबियाची राजधानी) इकडे रवाना झाल्या
. MV स्कोटिया प्रिन्स आणि ला सुपर्ब या दोन चार्टर्ड शिप इटलीच्या सिसीली येथून लिबीयाकडे रवाना झाल्या.
लिबीया मधील भारतीय नागरिकांना इजिप्तच्या Alexandria पोर्ट वर सुखरूपपणे आणले गेले. तेथून एअर इंडियाने त्यांना मायदेशी आणले.
जेव्हा लिबीया सरकारने त्यांच्या विमानतळावर भारतीय विमानांना उतरण्याची परवानगी दिली तेव्हा एअर इंडिया आणि इतर प्रायव्हेट कंपन्यांनी इतर सर्व भारतीयांना घरी आणले. सुमारे 15,000 भारतीय सुखरूप घरी परत आले.
कोणतेही आणि कोणाचेही सरकार असले तरी अशा संकटसमयी भारताने उत्तम कामच केले आहे. कुवेत युद्ध आणि तेथे अडकलेल्या भारतीयांची सुटका हे Legendary आहे आणि सर्वांना माहित आहे. त्याचप्रमाणे आता चालू असलेले ऑपरेशन गंगा हे सुद्धा युक्रेन मध्ये यशस्वी होवो हीच इच्छा.
सध्याचा सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे पाठिराखे यांचा बर्याच वेळेस असा सूर दिसतो की अशा तर्हेची ऑपरेशन्स भारतात यापुर्वी कधी विशेष झालीच नाहीत.
जगात घडणारी प्रत्येक घटना आणि त्यावर मोदी सरकारचे उत्तर यावर प्रत्येक वेळेस एक इव्हेंट तयार केला जातो आणि त्यात 70 वर्षाचा जमाखर्च मांडला जातो.
यूपीए/कॉंग्रेसला आपण केलेली चांगली कामे लोकांपुढे आणता येत नाहीत हे खरोखरीच दुर्दैवी आहे.
मंदार केळकर जोशी
हे अगदी खरे आहे ... आपण #UPA नि केलेली उतकृष्ट कामगिरी का लोकांना सांगत नाही ... गप्प का ..
बोला कृपा करून बोला
जितेंद्र आव्हाड #copied
हे अगदी खरं आहे की आपण advertising मध्ये कमी पडतो कारण आपण लोकांसाठी काम करतो.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh