नागराज चा झुंड व मराठीत आलेला लांजेकरांचा पावनखिंड ह्यात नेटकऱ्या मध्ये चांगलीच जुंपली आहे.
त्या निमित्ताने काही गोष्टी लक्षात येतायत. म्हणताय की लांजेकर यांनी 15 वर्ष अभ्यास केला आज 28 दिवसात चित्रपट बनवला!! असेल बाबा!
पण मला मुळात दिगपाल लांजेकर साहेब स्वतः गोधळलेले वाटतात.
म्हणतात की मी शिव अष्टक करतोय आणि
चित्रपट चा क्रम जीवन क्रमाशी सुसंगत ठेवत नाही.???
शेरशिवराज हा अफजल खान स्वारी च्या प्रकरणाचा चित्रपट त्यांनी फर्जंद, लाल महाल आक्रमण, पावनखिंड ह्या घटना क्रमा नंतर घेतलाय.
जर आधीच प्लॅन केलेला तर मग क्रमाने सांगायला काय प्रॉब्लेम आहे?
मला वाटते इथे क्रम असा असावा पाहिले फर्जंद त्यांनी चित्रपट बनवला नंतर तो यशस्वी झाला त्या नंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली , ते प्रकरण खूप गाजले त्यातून प्रेरणा घेऊन इतिहासातील पहिली सर्जिकल स्ट्राईक असे मार्केटिंग बिरुद लावून फतेशीकस्त आला
कारण वातावरण तस होत!
त्या नंतर मग पावनखिंड असावा!! माझा आपला तर्क!
फतेशीकस्त मध्ये पावनखिंडी चा सिन आहे त्यात बाजी प्रभू देशपांडे वेगळे आणि रेफरन्स वेगळा आणि पावनखिंड सिनेमात वेगळा?
हे कोणतं प्लानिंग आहे?
फतेशीकस्त मधील तानाजी मालुसरे नची भूमिका करणारे इथे बाजी प्रभू करतायत??
हे प्लॅनिंग आहे का?
अंकित मोहन
फर्जंद मध्ये कोंडाजी फर्जंद
फतेशीकस्त मध्ये येसाजी कंक
पावनखिंड मध्ये रायाजी बांदल
का??
बर हा व्यक्ती अमराठी आहे त्यानि मराठी चा प्रयत्न केलाय पण हा व्यक्ती का घ्यावी वाटली?
ह्या व्यक्ती च्या तोंडी गावरान भाषा म्हणजे अतिशय टुकार वाटते.
इथे मराठी अभिनेता घेता आला असता ना?
कोणी इथे बॉडी बिल्डिंग बद्दल बोलत असेल तर,
पाहिले म्हणजे हे निकष लावून अभिनेता निवडणे किती योग्य आहे?
दुसरं म्हणजे जर तसाच अभिनेता घायचा होता तर
ग्रीष्म महाजनी काय वाईट आहे मग,
15 वर्ष रिसर्च???
दुसरं मला खटकत ते ह्या आणि इतर ऐतिहासिक चित्रपटात व सीरिअल मध्ये जिजाऊ महाराज ह्यांच्या तोंडी पुणेरी प्रमाण (?) भाषा का टाकतात?
व इतर सरदारांच्या तोंडी गावरान पण तीही एक सूरी भाषा का? भाषा तर दर 20-25 km वर बदलते ना?
बर सरदार जर गावरान भाषा बोलत असतील तर मग जिजाऊ सरदारांच्या कन्या होत्याना ना?
बुलढाणा जिल्ह्यातील ते गाव मग त्यांच्या बोलण्याचा लहेजा पुणेरी कसा??
आणि पेशवे कालीन भाषा कशी ?
15 वर्ष रिसर्च??
बर दरवेळी नवीन नवीन पात्र लांजेकर साहेब टाकतात.
ह्याला आधार काय? ते ते सांगत नाहीत. असतील तर उत्तम!!! अन्यथा कालांतराने हे चित्रपट हेच खरं मानून लोक ह्या पत्रांना पण खरे मानू लागतील.
ज्या प्रमाणे मदारी म्हैतर नावाचे पात्र सांगितलं जाते त्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.
कोणत्याही कथा सांगताना ती अति रंजित करण्या साठी कल्पनेचा आधार घेतला जातो पण ते इतिहासाला मारक असते.
उदा. कल्याणच्या सुभेदाराच्या सुने चा प्रसंग ह्यात दोषी सरदार च नाव मी बऱ्याच लोकं कडून वेग वेगळ ऐकलंय
हिरोजी फर्जंद हे जास्त वेळ ऐकलं.
पण हिरोजी हे महाराजांच्या अंत काळी रायगड वर होते.
असे अनेक गोष्टी आहेत
महाराज मुळात इतके महान आहेत की त्यांना आशा कोणत्याही कल्पना रंजनाची गरज नाही त्यामुळे सदरकर्त्यांनी स्वतः च्या कल्पना ना बांध घालावा किंवा कादंबरी तील महाराज न पाहता ऐतिहासिक दस्तऐवज मध्ये महाराज पाहावे.
मला वाटते कसं आहे सद्या च्या तरुणाई मध्ये महाराजां बद्दल जर जास्तच प्रेम आले आहे
जे खरंतर चांगलाच आहे !!
फक्त महाराजांचा अनुयायी म्हणून मिरवताना त्यांच्या विचारावरून चालणे म्हणजे तारे वरून चालणे असते!!
तो विषय नाही आता,
पण कसे महाराजां बद्दल प्रेम चे खूप भरते तरुणाई ला आले आहे तर ती प्रसिद्धी पैशाच्या स्वरूपात पकडणे हा उद्देश ठेवून सद्या असे प्रोजेक्ट बरेच हाती घेतले जातायत.
सुरवात" राजा शिव छत्रपती, star pravah" पासून झाली
नवीन चॅनल लोकां पर्यंत पोचावे म्हणून घेतलेला तो व्यावसायिक निर्णय होता
त्या नंतर लोकप्रिय झालेल्या डॉ अमोल कोल्हे (अभिनय उत्तमच केला आहे) नी या लोकप्रियते चा पुरेपूर वापर केला.
मग छत्रपती संभाजी महाराजां ची मालिका झी मराठी सारख्या लोकप्रिय चॅनल नि उचलली.
ह्यात कौटुंबिक कलह दाखवता येण्या सारखे होते ते सारे दाखवले,
पण संभाजी महाराजांनी केले ल्या अचुक लढाया, त्याचे विस्तृत वर्णन , चित्रण आले नाही.
या नंतर तरुणाईला छत्रपती संभाजी महाराजांचे वेड लागले.
पण बहुत करून ते tiktok, reels पुरताच.
ह्या मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतींनी मराठा स्माराज्य स्वतः आलमगीर दक्षिणेत आलेला असताना 9 वर्ष कसं शिताफीने टिकून धरलं हे कोणी अभ्यासल नाही.
प्रतिकूल परिस्थितीत टिकून कसं राहावं हे आत्मसात केले नाही. ही समस्या आहे.!!
आत्ताच रवी जाधव यांनी बाल शिवाजी घोषित केला आहे.
अभिजित देशपांडे नि पण एक सिनेमा घोषित केला .
ह्या सगळ्या इतिहासाचा फक्त आणि फक्त मार्केटिंग मध्ये वापर करून आंधळ्या श्रद्धेतून पैसे कमावले जातायत. जे विकल जातंय ते विकतात आपल्या श्रद्धा पण!!
आता नागराज सुद्धा महाराजांवर चित्रपट बनवणार आहे तर मग तेव्हा हेच लोक त्यावेळी काय करतील ते उत्सुकतेच आहे.
खरंतर लोकांनी ह्या विषयां कडे मनोरंजन म्हणूनच पाहिलं पाहिजे , भावनिक होता कामा नये.
महाराजां बद्दल आस्था असेल तर त्यांना देव करून त्यांच्या कार्याला दैवी कार्य सांगून, अवतारच अस करू शकतात असे बोलून, आपल्या जबाबदाऱ्या झटकू नये.
महाराज किंवा संभाजी राजे हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्ती असून त्यांनी असामान्य कृत्य - कर्म करून गेले आणि महान झाले असे मानून त्यांच्या आयुष्याचा काही अंश आणि जमलं तर सगळे चांगले गुण अंगी कारणे ही खरी ह्या महान विभूतींची भक्ती होईल.
बाकी नागराज यांच्या बाबतीत ते हिंदीत गेल्याने जे होतंय ते एका मराठी म्हणी ला सार्थक ठरवणारे ठरत आहे, नाही तर ज्या पोट तिडकीने पावनखिंड सिनेमा बद्दल लोकांचं झुंड च्या विरोधात बोलणं चाललंय ते च नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लक डाउन' बद्दल का बोलत नाही!!
"मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जाऊ देत नाही तो दुसऱ्या चे पाय खेचतो च!!!"
खास करून जे लोक हर्षद मेहता स्कम बघून मार्केट मध्ये नशीब अजमवायला उतरले त्यांना मार्केट नी एक रिऍलिटी शॉक दिला.
पण एक चांगल दिसलं की मराठी माणसा मध्ये गेल्या लॉकडाऊन च्या काळात ह्या शेर मार्केट च्या क्षेत्रात बरीच जागरूकता तयार झाली.
त्यातील बरेच लोक मार्केट ला सट्टा न समजता एक अभ्यासाचा भाग म्हणून घ्यायला लागले.
त्यामुळे ह्या ऑनलाइन क्लास घेणाऱ्यांचे फावले ते सोडा पण, या तुन जर कोणी मराठी राकेश झुंझुंवला किंवा रामकृष्ण दमनी तयार झाले तर चांगलाच आहे.