#Thread_१ - भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके.
१) पोथी पुराणात भटांचे माहात्म्य प्रचंड गुळपाक घालुन तयार केले आहे की कल्पना केलेली बरी. आता भटी टाळक्यातुन निघालेली कथा वाचा > सरस्वती नदीवर सगळे गंजड गोसावडे ऋषी मुनी बसले होते ब्रम्ह, तप, ज्ञान, योग,कर्म या वादविवादाच्या सनाळ्या ठोकत..
२) त्यांच्यात चर्चा सुरू झाली त्रिदेवांपैकी
नक्की कोण श्रेष्ठ ? ब्रम्हा, विष्णु की महेश.
मग त्यांच्यात एक अतिमहान तपस्वी होते, त्यांच नाव भृगू हे एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा, कृत्रिम रीत्या अग्नी निर्माण करण्याचा शोध प्रथम यानीच लावला. एवढे ते थोर शास्त्रज्ञ होते.
३) पहिला मनुने तयार केलेल्या कोणीतरी प्रजापतीचं वीर्य म्हणे अग्नीत पडलं आणि हे लगेच चमत्कारिकरित्या जन्मले, ( असा याचा जन्म ) भृगू साहेब हे स्वायंभुव मनुचे जावई, शिवशंकराचे साक्षात साडु व दक्षाच्या दोन कन्यांचे पतीराज असल्याचे, महाउल्लेखनीय उल्लेख आहे ग्रंथ गाठोड्यात.
४) आता यांचा बायोडाटा आधार विथ पॅनकार्ड वरून आपल्याला कळलं असेल किती तेजस्वी होते. कथेकडे परत येऊ - यांनी ठरवलं की तिन्ही देवांची परीक्षा घेऊ, मग हे भृगु ऋषी गेले अखंडसृष्टीनिर्माते श्री ब्रह्मदेवाकडे, तिथं गेल्यावर मोठा मग्रूर तोरा दाखवला, ब्रम्हदेवाला साध नमन सुध्दा नाही केलं.
५) मान्य हा फार मोठा ऋषी लागून गेला पण ब्रम्हांडधिपतीला नमस्कार पण नाही केला राग तर साहजिक. ब्रम्हदेव क्रोधाने लालबुंद झाले ,पण स्वतःला आवरत म्हणाले जाऊदे आपलाच पुत्र आहे. परीक्षा घेण्याच्या नादात काय घोर गाढवपणा करत होता भृगुला याची जराही कल्पना तर सोडा अक्कल सुध्दा नव्हती.
६) मग हे महाशय त्रिनेत्रधारी महादेवाकडे गेले,
शंभूदेवांनी त्याना बघताच आनंदाने उठून आलिंगनाला उभे राहिले पण ऋषींनी त्याना साफ नकार दिला व निर्भत्सना करत म्हणाले
तुम्ही सदासर्वदा वेदशास्त्र आणि धर्माचा अपमान करत आला, दुष्ट हरामखोर पापी लोकांना आणि राक्षसानां वरदान देतात.
७) तुमच्या मुळेच जीवसृष्टीवर अमाप संकटे येतात, यामुळे मी तुमचं आलिंगन स्वीकार करणार नाही, हे ऐकून महादेव क्रोधीत झाले नेहेमीप्रमाणे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली व त्यानी त्रिशूळ काढुन भृगुच्या अंगावर धावून गेले , तेवढ्यात माता पार्वतीने त्याना अडवलं, म्हणुन हा जिवंत वाचला.
८) मग हे विष्णुदेवाकडे निघाले तिथं पोहचले तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात माता लक्ष्मीच्या मांडीवर डोकं ठेऊन मस्त आराम करत होते, तेवढ्यात हा हुशार तिथे गेला आणि सरळ विष्णुच्या छातीवर लाथ घातली, आणि काय तो ह्या भटाचा महिमा, विष्णु ताडकन उठले, ह्याला वाटलं आता सुदर्शन फेकतात नरड्यावर
९ ) पण तस ना करता, विष्णुनी सरळ प्रणाम करत त्याच्या श्रीचरणावर आपला हात फिरवत म्हणाले मुनिवर आपल्या पायाला लागलं तर नाही ना, आपण इथे बसून विश्राम करा, मला कल्पना नव्हती आपण इथे येणार आहात, त्यामुळे मी आपल स्वागत करू शकलो नाही. आणि आज तुमच्या चरणाना हात लावण्याच भाग्यही मिळालं.
१० ) अहाहा केवढा तो आदर आणि काय ते महिमामंडन, एवढा ढोंगीपणा आणि नाटकीपणा मी आयुष्यात पहिला नाही, श्रीविष्णु सर्व जगाचा पितापालनकर्ता आणि या चिलम चटपटी गांजा लटपटी, धतुराभांगग्रस्त ऋषीची लाळघोटी-पायचाटी करेल का ? ऐकुन वाचून तुम्हाला तरी भरवसा होईल का हो ?
अस हे भटाळस्तोम..
११) भृगु आणि इतर मुनीमंडळींनी नंतर विष्णूने केलेली नोकरहमाली बघुन ते विष्णुवर खुश झाले. आणि त्यानी विष्णुला शंभर पैकी शंभर मार्क देऊन त्याचा बोर्डात पहिला नंबर लावला.
भटभिक्षुक कसे सर्वश्रेष्ठ त्यांचापुढे स्वर्गलोकचे देवही झुकतात वाकतात नव्हे ते तर आपल्या पायाची मालिशही करतात.
१२) हेच सांगण्याचा सुमार नाटकीछाप प्रयत्न आहे,जो या कथेतून झाला, पण ती कथा आम्ही सत्यशोधकी महात्मा फुले आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या गुरकृपाशीर्वादाने त्यांच्याच शैलीत लिहण्याचा प्रयत्न केला. हा थ्रेड इतरांना पाठवा त्यानाही हे थोतांडमय भटी माहात्म्य कळू द्या.
जय शिवराय.🚩
#अवतार
हिंदुस्थानात ईश्वर-अवतारा विषयी एवढा गाढव-गोंधळ आहे की नुसती कल्पना केलेली बरी. तस पाहिले तर महान चरित्र आपल्याकडे अनेक वर्षांनी जन्म घेतात, आणि त्यातली सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेल्या महान विभुतींना आपण मनाच्या देव्हाऱ्यात बसवुन त्यांच्यावर अमर्याद प्रेमाचा वर्षाव करतो.
एखादा थोर सदाचारी पुरुष दिसला की, लगेच त्याला कंठ कोरडाठाक पडेपर्यंत धजन्या-भजन्यात धन्यता मानली जाते. नंतर अतिशयोक्तीचा मिष्टक्रुर कहर करून त्याना आपल्या 'प्राणप्रिय त्रिदेवा पैकी कोणत्याही देवाच्या समतुल्य मानून, हे मत सरळसोटपणे ठोकून दिले जातं. हा बलिशपणा इथवर थांबत नाही.
पुढे मग त्या महाविभुतीला त्याच्या मोक्षकार्या नंतर ग्रांथिक स्वरूपात प्रस्तुत केलं जातं,आणि मग इथुन सुरू होते अवताराची विचका वाटणारी शिमगा-धुळवड, मग अवताराला आलय दिलं जातं, सध्या त्याला देवालय म्हणतो आपण. चिकित्सक वृत्तीचा संन्यास हा नैतिकरित्या मनुष्याला खिळखिळा करतो.
तू प्रथम क्रमांकाचा भक्त दिसतोय.काय मनोरंजक कथा रंगवली,तू इथं ट्विटरवर काय करतोस ? बॉलिवूड मध्ये जा..तिथं जाऊन मोठा कथालेखक होशील..
अरे बंद करा हे लोकांना भडकवायचे रिकामे धंदे ,जीवनमरणाचा प्रश्न आहे इथं लोकांना महागाई मुळे जीव मेटाकुटीला आला आहे,
आणि तुझ्या फालटू स्टोरीमुळे.🤣😬
या महाप्रचंड हुशाराने,कथेची सुरवात थेट दंगलमय केली, जाळीदार टोपी आणि टिळा.
आणि मुख्य म्हणजे संघी-भटाळ लोकांच्या लेखी, यांचा खलनायक हा जाळीदार टोपी वाला असणार हे त्रिकालबाधित सत्य असल्याने,या कुकथेला बुद्धीहीन भक्ताड टोळीमध्ये जाणूनबुजून कौतुकास पात्र बनवून प्रसिध्दी देण्यात आली.
याची बनवाबनवी इथेच पकडली गेली की आमच्या हिंदू तरुणी ह्या टिळा लावल्याने समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात ठार वेड्या होतात,
इथे असंख्य हिंदू तरुण टिळा लावतात,आणि असंख्य तरुण टिळे लावत नाही, मग अनेकांना प्रश्न पडला आहे की टिळे लावल्याने तरूण मुली आपल्यावर मोहित होतात का ?