महाभारताबद्दल माझ्या वाचण्यात आलेला हा सुंदर तर्क..
महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला.
त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली? हे सगळे खरंच झाले आहे की मला तसा भ्रम होतोय??
"तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!", एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला. साधू हलक्या आवाजात परत म्हणाला, "मला माहित आहे तू इथे कुरुक्षेत्राचे युद्ध खरंच झाले आहे का ते पाहायला आला आहेस.
परंतु तुला ह्या युद्धाबद्दल सत्य कधीच समजणार नाही जोपर्यंत तुला खरे युद्ध कसले होते ते कळणार नाही."
संजय म्हणाला, "म्हणजे??"
साधू म्हणाला, "महाभारत हे एक महाकाव्य आहे - एक वास्तविकता आहे परंतु त्यापेक्षा अधिक ते एक तत्वज्ञान आहे." आणि एवढे सांगून तो हसू लागला.
साधूचे हसणे पाहून संजय अजून जास्त भ्रमित झाला आणि विनंती करू लागला की, "मला तुम्ही ते तत्त्वज्ञान सांगू शकतात का?"
साधू ते तत्वज्ञान सांगू लागला, पांडव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपले ५ ज्ञानेंद्रिये आहेत.
आणि कौरव म्हणजे १०० दुर्गुण (विषये) आहेत जे दररोज ह्या ५ पांडवांवर आघात करतात. पण आपण ह्या आघातापासून आपल्या ५ पांडवांचे रक्षण करू शकतो. साधू म्हणाला, "संजय, तुला सांगता येईल ह्यांचे रक्षण करणे कधी शक्य होईल?"
"जेव्हा आपल्या रथाचे सारथी - ह्या ५ पांडवांचे मित्र भगवान श्रीकृष्ण असतील तेव्हा????". साधू उत्तर एकून खूप खुश झाला. तो म्हणाला, "अगदी बरोबर!! श्रीकृष्ण म्हणजे आपल्या आतला आवाज, आपला आत्मा, आपला पथदर्शी प्रकाश.
जर श्रीकृष्णचे आपण ऐकतोय तर आपल्याला चिंता करायची काहीही आवश्यकता नाही."
संजयला बराच मतितार्थ आता कळला होता. तरी त्याने परत प्रश्न केला, "मग जर कौरव हे दुर्गुणच होते तर त्यांच्या बाजूने गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म लढले त्याचा काय अर्थ होतो??"
"त्याचा असा अर्थ होतो की, जसे तुम्ही लहानाचे मोठे होत जातात तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांबद्दल असलेला तुमचा दृष्टीकोन बदलत जातो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला ते एकदम परिपूर्ण वाटतात परंतु जेव्हा आपण मोठे होऊन जातो तेव्हा आपल्याला त्यांच्यात त्रुट्या दिसायला सुरु होतात
आणि एकदिवशी आपल्याला ठरवावे लागते की आपण ह्या मोठ्यांचे ऐकायचे की नाही, ह्यांनी आपले ठरवायचे की आपण स्वतःच स्वतःसाठी निर्णय घ्यायचा!!! म्हणून अशा धर्मसंकटात श्रीमद् भगवत गीतेचे उपदेश महत्वाचे ठरतात."
संजयला आता सगळेच कळले होते. त्याने शेवटचा प्रश्न केला, "मग कर्णहा पांडव असून त्यांच्याच विरोधात का??"
"अरे हा!! कर्ण हा, ५ ज्ञानेंद्रियेसारखाच आपला असतो. तो आपलाच एक भाग असतो परंतु साथ देतो त्या १०० दुर्गुणांची!! हा कर्ण दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या स्वतःच्या वासना असतात.
हे आपल्याच असतात परंतु त्यांची मैत्री १०० दुर्गुणांशी असते. कर्णाला सारखा पश्चात्ताप होत असतो आणि तो दुर्गुणांची साथ का देतोय त्याचे सतत कारणे देत राहतो. आपली वासनापण अशीच असते - पश्चात्ताप करते आणि परत तिथेच जाते.!!"
संजयच्या डोळ्यातून अश्रू येत असतात.
त्याला जगातले सगळ्यांत मोठे महाकाव्य "महाभारत" खऱ्या अर्थाने समजलेले असते. तो दूरवर पसरलेल्या कुरुक्षेत्राला पाहत उभा असतो. तो साधूला नमन करण्यासाठी मागे वळतो आणि पाहतो तर त्या जागी कोणीच नसते - तो साधू दिसेनासा होतो परंतु एक गहन तत्वज्ञान तिथे ठेवून जातो.
१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!"
२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, "एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची."
३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं," या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?" तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला. म्हणाला, "वेडा रे वेडा !!"
स्वछंद जगण्यासाठी, वयाची मर्यादा नसते,
अहो संपत आलेल्या चिवड्यात देखील, मीठ जास्त असते || ध्रु ||
Maturity च्या नावाखाली, आपण करतो मिश्किल स्वभावाचा त्याग,
आतल्या आत झुरत राहते, ह्या विरहाची आग,
केवळ लोक लज्जेखातर, मनातली इच्छा मारायची नसते,
अहो संपत आलेल्या चिवड्यात देखील, मीठ जास्त असते || 1 ||
मनसोक्त हसणारा तू आज, फक्त गालातल्या गालातच हसतो,
सुरांच्या मैफिली बसवणारा तू आज, फक्त घरातच गुणगुणत बसतो,
मनात वळवळणाऱ्या किड्याची वळवळ, कोणाकारता थांबवायची नसते
अहो संपत आलेल्या चिवड्यात देखील, मीठ जास्त असते || 2 ||
Qपुणेरी पाट्या - वाइन स्पेशल
१. मुलांना वाइन हवी असल्यास फोटो आधार कार्डची कॉपी आणि आई वडिलांकडून लेखी पत्र त्यांच्या मोबाईल नंबर सकट लागेल. आम्ही नंतर कधीही त्यांना व्हिडिओ कॉल लाऊन तुमचा फोटो दाखवून खात्री करून घेऊ.
२. आमच्या कडे द्राक्ष उरली आहेत त्याची वाइन करून मिळेल का असे प्रश्न विचारल्यास तुमचा फोटो दुकानाबाहेर लाऊन "वायनरी मध्ये नोकरी साठीचे उमेदवार" असा उद्धार करण्यात येईल.
३. कालची वाइन जरा गोड होती अस म्हणल्यावर बेडेकर मिसळ मध्ये जाऊन तुमची मिसळ गोडसर आहे म्हणाल्यावर जसा अपमान होतो तसा केला जाईल.