Discover and read the best of Twitter Threads about #वाचलेले

Most recents (12)

♦️ विचारपुष्प♦️

🌹ऋण🌹

ऋण फेडता आले पाहिजे.
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,
तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,
पण पाणी कोठेच मिळेना.
सर्वत्र जंगलच दिसत होते.
तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की,
जेथे कोठे पाणी असेल,
तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.
तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला,
व श्रीरामास म्हणाला,
येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.
चला मी आपणास दाखवतो.
पण तिथे मी उडत उडत जाईन,
आणि आपण चालत येणार,
त्यामुळे चुकामूक होऊ शकते.
म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.
त्यामुळे आपणास मार्ग सापडेल
व आपण जलाशया जवळ पोहचाल.

आपणास माहिती आहे की,
मयूर पंख, हॆ एक विशेष काळी,
व एक विशेष ऋतुमध्ये पंख तुटून पडतात.
पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील,
तर त्याचा मृत्यु होतो.
आणि तेच झाले.
त्याचे पंख निघत होते,
त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता.
Read 10 tweets
आतून तुटलेली माणसं मनाने अतीशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, त्यांच इमोशनल होण कालांतराने बंद होत जात.
आतून तुटलेली माणस फारशी व्यक्त होत नाहीत,त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
२+२=५ कुणी म्हणाल तरी ते "it's okay"
म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात,माणसांशी बोलणं टाळतात.एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो.समोरचा माणूस किती खरं बोलतोय,किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येत.काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात.
आणि यातच
खरा शहाणपणा असतो.
थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interfare नको असतो कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ dependent होतात.
आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते,
संकटांची काळजी नसते
Read 4 tweets
आतून तुटलेली माणसं ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, इमोशनल होणं बंद होत जातं कालांतराने.

आतून तुटलेली माणस व्यक्त होत नाहीत फारशी, त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
+
2+2=5 कुणी म्हणालं तरी ते "it's okay man" म्हणून निघून जातात.

ती माणसं वाद टाळतात, माणसांशी बोलणं टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येत.
+
काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात.
आणि यातच खरा शहाणपणा असतो.

थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interfare नको असतो कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ dependent होतात.

+
Read 5 tweets
मी खूप चिंतेत आहे, देशाची स्थिती वाईट आहे, अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे......

वाहनांच्या शोरूममध्ये जा, नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सुरू आहे, ग्राहकांना सहा महिने वाहनांची प्रतीक्षा करावी लागेल.... 😎
रेस्टॉरंट्समध्ये एकही टेबल रिकामे नाही, अनेक रेस्टॉरंट्सवर रांग! 😎
दारुच्या दुकानांवर लाईन तुटत नाही, जेवणात चिकन लेगपेक्षा कमी मागणी नाही.

शॉपिंग मॉल पार्किंगसाठी जागा नाही, इतकी गर्दी.......😎

अनेक मोबाईल कंपन्यांचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक आहेत,
ऍपल लॉन्च होताच स्टॉक संपत आहे......😎
ऑनलाइन शॉपिंगच्या काळात कामाच्या दिवसातही संध्याकाळी बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याने ठप्प अशी परिस्थिती रोजच निर्माण होते! 😎

ऑनलाइन शॉपिंग उद्योग तेजीत आहे....😎

मात्र पेट्रोलचे दर वाढवून त्यांचे कंबरडे मोडल्याचे लोक सांगत आहेत
Read 10 tweets
पुणेरी ताट

पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी "पुणेकरास" मेनू विषयी त्याचं मत मागितल... त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर...

"मेनू साधारण असा असावा"

१. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू - त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण.
२. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक...

३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.
६. "ओल्या नारळाची" कोथिंबीरीची चटणी, काकड़ी- शेंगदाणे कूट आणि दही घातलेली कोशिंबीर.

७. चवी पुरतं पंचामृत.

८. गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

९. मठ्ठा.

"आता काही सूचना.... लक्ष्य पूर्वक वाचा.."

आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
Read 11 tweets
🍃🌾😊

महाभारताबद्दल माझ्या वाचण्यात आलेला हा सुंदर तर्क..
महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला.
त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली? हे सगळे खरंच झाले आहे की मला तसा भ्रम होतोय??
"तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!", एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला. साधू हलक्या आवाजात परत म्हणाला, "मला माहित आहे तू इथे कुरुक्षेत्राचे युद्ध खरंच झाले आहे का ते पाहायला आला आहेस.
Read 13 tweets
*नाती*
नाती पाकात मुरलेल्या गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही. खरंतर ती तशी गोड असूच नयेत.
ती टपरीवरच्या कांदाभजीसारखी असावीत अगदी साधी पण हवीहवीशी. कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी.
नाती असावीत गरमागरम चहासारखी, एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करुन देणारी.
(१)
नाती असावीत साध्या वरणासारखी, नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत. ती जितकी मक्याच्या लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात.
नाती सीताफळा सारखी असू नयेत. समज कमी नि गैरसमज जास्त. एकवेळ ती फणसासारखी असतील तरी चालेल. वरुन काटेरी आतून रसाळ.
(२)
नाती असावीत सुधारसा सारखी, आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पक्वान्न खाल्ल्याचं समाधान देणारी.
नाती कडूही असावीत पण कारल्याइतकी असू नयेत. ती मेथीच्या भाजी इतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणाही जीभेला चव आणणारा असावा.
(३)
Read 7 tweets
लिमिटेड होतं तेच बरं होतं...

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा.....

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.... 😊😃😁
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा... 😄

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....😉
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 💪👍

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची...... 👏💞
Read 9 tweets
🌹महाभारताचे "नऊ सार सूत्र" 🌹

१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"... - कौरव.

२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील"... - कर्ण.
३) "मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत, स्वत:चा नाश करून घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देतील".... - अश्वत्थामा.

४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका की, तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल" ... - भीष्म पितामह.
५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्मविनाशाचे दर्शन घडविते"... - दुर्योधन.

६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते"... - धृतराष्ट्र.
Read 7 tweets
*विस्मरणात चाललेले ग्रामीण मराठी शब्द*

मराठी भाषेला समृध्द करणारे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरले जाणारे व काळाच्या ओघात काहिसे विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, संकल्पनांचा मागोवा...
जसजसे शेतीबाडीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, गावगाड्याला नागरीकरणानं भरकटून टाकल. गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली.- मग ओटा,
पडवी,
न्हाणीघर,
माजघर,
शेजघर,
माळवद,
धुराडे-धारे वासं-आडं,
लग,
दिवळी,
खुंटी,
फडताळ,
परसदार,
पोत्यारं,
चावडी,
चौक,
पार,
पाणवठा,
उंबरठा,
कडी कोंडी,
खुराडं,
उकीरडा,
हे शब्द विस्मरणात गेले.

बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं
औत,
रूमणं,
चाडं,
लोढणा,
वेसण,
झूल,
तिफण,
जू,
वादी,
कासरा (लांब दोर),
दावं (लहान दोरखंड),
चराट (बारीक दोरी)
Read 13 tweets
आनंदाश्रू

सकाळी सातची वेळ, शांताराम अण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.

अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे.
ओव्हरटाईमकरुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.

आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला.
शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,"रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?" काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या
Read 22 tweets
सोनियाजींना शिव्या देणं सोपं आहे..

अगदी “साडी घातली म्हणून भारताची नाडी ओळखता येत नाही” म्हणणाऱ्या सिंगलहड्डीपासून ते जर्सी गाय, कॉंग्रेसकी विधवा म्हणणाऱ्या छप्पन इंची गाढवापर्यंत सर्वांनी त्यांच्यावर कुत्सित टीका केली आहे...
पण जिच्या मांडीवर गोळ्यांनी चाळण झालेल्या सासूने जीव सोडला.. जिच्या नवऱ्याच्या शरीराचे अवशेष प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरावे लागले, ती स्त्री राजकारणात येते.. उत्तरेतल्या परदा संस्कृतीतल्या तथाकथीत मर्दांना आपल्या राजकीय हुशारीच्या जोरावर लगाम घालते,
नागपुरातले चड्डीधारक मापात ठेवते, आपल्याला विदेशी म्हणून पक्ष सोडून गेलेल्याना पुन्हा आपल्याच आघाडीत येण्यासाठी तिष्ठत ठेवून, केंद्रात सहाव्या क्रमांकाचं मंत्रिपद देते .. आणि त्यावर कडी म्हणजे अनेकांनी ज्या पदाची सहा दशकं स्वप्न पाहिली ते पंतप्रधानपद नाकारते..
Read 11 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!